Pages

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

अर्थसाक्षर





*_टर्म इन्शुरन्स’ : आदर्श ‘कवच’ किती रकमेचे?_*



कुटुंबासाठीच्या आर्थिक नियोजनांतील विमा ही अतिशय महत्त्वाची व पहिली पायरी मानली जाते. विमाधारक निश्चित स्वरूपाचा प्रीमिअम ठरावीक मुदतीसाठी भरतो आणि या काळात आकस्मिक मृत्यू ओढवल्यास त्याच्या कुटुंबासाठी मोठय़ा रकमेची तरतूद करतो, असा आयुर्विम्याचा एक अतिशय सोपा प्रकार म्हणजे ‘टर्म इन्शुरन्स’ होय. हा शुद्ध व निखळ स्वरूपाचा विमा प्रकार असून, अत्यंत कमी हप्त्यात, मोठय़ा रकमेचे विमा संरक्षणाचे कवच यातून मिळविता येते.

*_टर्म इन्शुरन्स कशासाठी?_*

विमाधारकाचा मृत्यू झाल्यास माझ्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळेल. यामध्ये, गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज आदी जबाबदाऱ्यांना कवच दिले जाते. त्यामुळे विमाधारक अर्थात घरातील कर्त्यां व्यक्तीचा मृत्यू झाल्यास विम्याच्या दाव्याचा उपयोग त्याच्या अपूर्ण जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी केला जाईल. तसेच, सध्याचे टर्म इन्शुरन्स योजना या आरोग्य (गंभीर आजार व अपंगत्व) आणि अपघाती मृत्यू यापासूनही संरक्षण देतात.

*_विमा संरक्षण विकत घेण्याचे काय फायदे आहेत?_*

भारतीयांची जीवनशैली बदलते आहे व यामुळे लहान वयात जीवनशैलीविषयक आजार वाढत आहेत. मी घरातील कमावती व्यक्ती असल्यास आणि मला गंभीर आजाराचे निदान झाल्यास माझ्या कुटुंबावर परिणाम होऊ शकतो. गंभीर आजारापासून आर्थिक संरक्षण देणाऱ्या प्लानमुळे, अतिरिक्त आर्थिक भार न पडता माझ्या कुटुंबाला वैद्यकीय उपचारांचा अतिरिक्त भार न पडता त्यांची नियमित जीवनशैली कायम राखणे शक्य होईल.

सध्या, विमा कंपन्या विम्याच्या दाव्याची रक्कम नियमित उत्पन्न म्हणून मिळण्याचा पर्याय वारसांना देतात. यामुळे कुटुंबांना त्यांच्या अर्थकारणाचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येते.

*_आदर्श कवच कोणते?_*

एक उदाहरण विचारात घ्या. मी ३० वर्षीय विवाहित, मूल असलेला पुरुष असून माझे मासिक उत्पन्न २५,००० रुपये आहे आणि गृहकर्ज म्हणून बँकेकडून घेतलेल्या कर्जापैकी रु. १० लाखांची परतफेड बाकी आहे. निवृत्तीचे वय ५८ वर्षे धरल्यास, मी आणखी २८ वर्षे काम करणार आहे. तर माझ्यासाठी आदर्श कवच पुढील प्रकारे मोजले जाईल : रु. २५,००० ×१२ महिने× २८ वर्षे + रु. १०,००,००० = ९४,००,००० रुपये. आदर्श कवचामध्ये सर्व जबाबदाऱ्या विचारात घ्याव्यात आणि हे कवच निवृत्तीच्या वयापर्यंत सुरू ठेवावे.




*_टर्म इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी कोणते मुद्दे विचारात घ्यावेत?_*

’ लवकर कवच घेणे : लवकर योजना खरेदी करणे म्हणजे कमी प्रीमिअममध्ये कवच निवृत्तीपर्यंत कायम राखणे.

’ क्लेम सेटलमेंट रेशो : विमा कंपनीने सातत्याने क्लेम सेटलमेंट रेश्यो उच्च राखला असल्याची, तसेच विनासायास क्लेम सेटलमेंट केल्याची खात्री करा.

’ नॉमिनेशन : योजनेसाठी वारस ठरवा, हा वारस योजनेचा लाभार्थी असेल.

’ सत्यनिष्ठता : स्वत:विषयी, प्रामुख्याने वैद्यकीय माहितीबाबत सर्व खरी माहिती द्या. यामुळे क्लेम सेटलमेंट सुलभ होईल.

’ आरोग्यविषयक दक्षता : वैद्यकीय चाचणीतून एखादी व्याधी व आरोग्यविषयक समस्या पुढे आल्यास, विम्यासाठी अधिक प्रीमिअम भरावा लागू शकतो. याचा अर्थ असा की, तुमच्या आरोग्याच्या प्रश्नांमुळे तुमच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होऊ नये म्हणून तुम्हाला आपोआपच आरोग्याबाबत अधिक सजगता व दक्षतेची गरज भासेल.
सौजन्य... टिम लोकसत्ता






*_टॅक्स सेव्हिंग योजनेचे फायदेच फायदे_*

जर तुम्हाला आयकर कलम ८०-सी अंतर्गत, रु.१.५० लाखापर्यंत गुंतवणूक करुन करबचत करावयाची असेल, तर म्युच्युअल फंडाच्या करबचतीच्या योजनेत गुंतवणूक करावी. हे करणे अन्य सर्व आयकर कलम ८०-सी खालील गुंतवणूक पर्यायांपेक्षा खूपच फायदेशीर असते, ते कसे ते आता समजून घेऊया.

भारतीय करकायद्या अंतर्गत करबचतीसाठी अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत. असे असुनही फारच थोडया व्यक्ती उपलब्ध असणा-या सर्व पर्यायांचा तुलनात्मक अभ्यास करुन त्यांच्या करबचतीसाठी करावयाच्या गुंतवणुकीचा निर्णय घेत असतात. ब-याचश्या व्यक्ती करबचतीसाठी कोणताही विचार न करता कोणत्यातरी दीर्घ मुदतीच्या साधनात पैसे गुंतवण्याऐवजी खरे म्हणजे अडकवत असतात. महागाईचा विचार केल्यास अशा साधनातून काहीच फायदा हाती लागत नाही. जेव्हा हे पैसे त्याच्या हातात परत मिळतात, तेव्हा त्या पैशांची खरेदीची क्षमता नगण्य झालेली असते.

उदा. जेव्हा तुम्ही करबचतीसाठी एखादी विमा योजना विकत घेता, तेव्हा त्यातील सर्वाधिक फायदा हा विमा एजंट कमिशनच्या स्वरुपात खाऊन टाकत असतो. तुम्हाला काय मिळते? तर अत्यल्प विमा संरक्षण. जर तुमचे काही बरे वाईट झाले, तर मिळणारी तुटपुंजी रक्कम तुमच्या वारसाची गरज भागवू शकणार नाही. तसेच मुदतपूर्तीनंतर मिळणारी तुटपुंजी रक्कम तुमची भविष्यातील आर्थिक गरजहि भागवू शकणार नाही. पारंपरिक विमा साधनातून मिळणारा परतावा हा, वार्षीक चक्रवाढीने ५% पेक्षा जास्त कधीच मिळत नाही. युलीपमध्ये पैसे गुंतवणे म्हणजे अधिक नुकसान करून घेण्यासारखे आहे.

जर तुम्ही बँकेच्या पांच वर्षाच्या ठेवीत गुंतवणूक करत असाल तर, एक तर तुमचे पैसे ५ वर्षे अडकून रहातात, व दुसरे म्हणजे जे काही व्याज ६% च्या दरम्याने मिळते तेही करपात्र असते. आणि उरलेल्या लाभातून महागाईचा दर वजा केल्यास खरे म्हणजे तुम्ही तुमचे पैसे सुरक्क्षित ठेवण्यासाठी, मिळणा-या अतिरिक्त फायद्यावर पाणी सोडत असता. अत्यंत थोड्या व्यक्ती कर बचतीसाठी म्युच्युअल फंडाच्या इक्वीटी लिंक सेव्हिंग स्किमचा, गुंतवणुकीसाठी विचार करतात.

हे असे का घडते? सर्वसाधारणपणे याचे एक प्रमुख कारण म्हणजे करबचत व गुंतवणूक याबाबत असणारा गोंधळ किंवा अज्ञान किंवा दुर्लक्ष करणे हेच आहे. सर्वसामान्य गुंतवणुकदार याबाबतचा निर्णय उशीरा म्हणजे अगदी मार्च महिना संपत आला की घेतो ते सुध्दा, जर त्याच्या कर सल्लागाराने सांगितले तर. किंवा एखादा एजंट त्याच्या हे गळी उतरवतो की “बाबारे, आता वर्ष अखेर आलेली आहे तेव्हा मी सांगतो त्याच साधनात (बहुतांशी विमा योजना) तू आता गुंतव”. तेव्हा तो याबाबतचा निर्णय घेतो. म्हणजेच आपण कोणत्यातरी कर बचतीच्या साधनात गुंतवणूक करुन मोकळे होतो व जेव्हा केव्हा पैसे परत मिळण्याची वेळ येते तेव्हा लक्षात येते की आपण फक्त कर बचतच केली बाकी हाती उरले एक मोठे शून्य.

हा परिणाम असतो कर व गुंतवणूक यातील वैचारिक गोंधळाचा. त्यामुळे होत काय, की विचारपूर्वक निर्णय न घेतल्यामुळे तो हमखास चुकीचा घेतला जातो. जेव्हा आपण कर बचतीसाठी किंवा अन्य कोणत्याही उद्दिष्टांसाठी गुंतवणूक करतो तेव्हा त्या साधनाची आपण परिपुर्ण माहीती करुन घेतली पाहिजे.

यासाठी आपण गुंतवणूक कशासाठी करणार आहोत? त्याचे प्रमुख कारण काय? यातून मिळणारा फायदा किती? मिळणारा फायदा करपात्र आहे की करमुक्त आहे? पैसे किती काळ अडकून रहाणार आहेत? गुंतवणुकीसाठी किती पर्याय उपलब्ध आहेत? व यातील मला कोणता पर्याय योग्य आहे? जर एजंट मार्फत गुंतवणूक करणार असाल तर त्याला किती कमिशन मिळते? ते कमिशन वाजवी आहे का? जाणारे कमिशन तुमच्या गुंतवणुकीची रक्कम कमी करते काय? ही सर्व माहिती विचारपूर्वक मिळवून, लागल्यास त्यासाठी यातील खरोखर जाणकार असणा-या व्यक्तीची मदत घेऊन जर तुम्ही गुंतवणुकीचा निर्णय घेतलात तर तुमच्यावर पश्चातापाची वेळच येणार नाही.

त्याचप्रमाणे करबचतीचा व गुंतवणुकीच्या निर्णयाची चाल ढकल करु नका. वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्हाला खरं म्हणजे माहीत असते की या वर्षी माझे एकूण उत्पन्न किती होणार आहे व यावर किती कर देय होणार आहे? जर आवश्यक असेल तर कर बचतीसाठी किती गुंतवणूक केली पाहीजे याचे नियोजन वर्षारंभीच करुन, तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचा निर्णय करु शकता.

म्युच्युअल फंडाच्या इक्वीटी लिंक सेव्हिंग स्किम हा अतिशय उत्तम पर्याय करबचतीसाठी आहेच पण गुंतवणूक करण्यासाठी सुध्दा आहे. जर तुम्ही या योजनांचा पुर्वेतिहास पाहीला तर या योजनेत एसआयपीव्दारे गुंतवणूक करणे हे नेहमीच फायदेशीर ठरलेले आहे. यातील प्रमुख फायदे म्हणजे लॉक-इन पिरिअड फक्त ३ वर्षे असतो. पहिली तीन वर्षे सलग गुंतवणूक करुन, त्यातूनच नंतर पैसे काढून पुनर्गुंतवणुकीचाही फायदा घेता येतो. गुंतवणूक करताना कोणतेही चार्जेस वजा होत नाहीत. त्यामुळे संपूर्ण रक्कम गुंतवली जाते. शेअर बाजारातील चढ उतार हे जोखीम न समजता संधीच समजली पाहीजे. चढ उतार आहेत म्हणूनच जास्त उत्पन्न मिळते. गेल्या २० वर्षात अशा योजनांनी वार्षिक सरासरी २०% चक्रवाढ पध्दतीने परतावा दिलेला आहे. हा परतावा पूर्णपणे करमुक्त असतो. निवृत्तीपर्यंत नियमितपणे या योजनेत (ग्रोथ ऑप्शनमध्ये) गुंतवणूक करत राहून, नंतर डिव्हिडंड पेआऊटचा पर्याय स्विकारुन, कायम स्वरुपी वार्षिक/मासिक कर मुक्त आकर्षक परतावाही मिळवू शकता. या योजनेतून मिळणारा डिव्हिंडंड वार्षिक सरासरी १२% किंवा अधिक मिळत असतो. यातील काही योजनांमध्ये ज्यानी २० वर्षापूर्वी गुंतवणूक केली आहे, त्याना गेले ७ ते ८ वर्षे दरवर्षी वार्षीक सरासरी ७०% या दराने लाभांश मिळत असून मुद्दलातही जवळपास ७ ते ८ पट वाढ झालेली आहे. गरज आहे ती चांगल्या योजनेची काळजीपूर्वक निवड करुन, त्या योजनेत नियमितपणे दरमहिना एसआयपी माध्यमातून दीर्घ काळासाठी विश्वासपूर्वक गुंतवणूक करत रहाण्याची.

तुम्ही निवडत असलेले गुंतवणुकीचे साधन हे प्रथम योग्य गुंतवणूक साधनच असले पाहिजे. म्हणजेच करबचतीच्या लाभाचा पर्याय नसला तरी गुंतवणूक करावी असे ते प्रभावी साधन असले पाहीजे. नंतर त्यात जर कर बचतीच्या लाभाचाही समावेश असेल तर तो दुग्ध-शर्करा योग समजला पाहीजे. आणि हे सर्वच म्युच्युअल फंडाच्या इक्वीटी लिंक सेव्हिंग स्किम ला लागू पडत असते.

म्हणूनच प्रत्येक करदात्याने आयकर कलम ८०-सी अंतर्गत करबचतीसाठी म्युच्युअल फंडाच्या इक्वीटी लिंक सेव्हिंग स्किम योजनांचा वापर केला पाहीजे. सोबतच टर्म इन्शुरन्सव्दारे जास्तीत जास्त जेवढे विमा संरक्षण मिळू शकत असेल तेवढे अवश्य घ्यावे. २८ वर्षाच्या व्यक्तीला मासिक साधारण रु.५०० ते ६०० म्हणजे दिवसाला २० रु. पेक्षाही कमी (२० रुपयात आजकाल एक कप चहाही मिळत नाही) भरुन एक कोटी रुपयाचे विमा संरक्षण मिळते. यासोबत थोडा जास्त हप्ता भरुन तुम्हाला जास्तिचे अपघात विमा संरक्षण, कायम स्वरुपी अंपगत्व संरक्षण इ. घेता येते. तसेच हा टर्म इन्शुरन्स नवरा व बायको या दोघांच्या नांवे संयुक्त घेता येतो, ज्यात एकाचा मृत्यु झाल्यास त्याच्या विम्याची रक्कम मिळून उरलेल्या जोडिदाराचे विमा संरक्षणही पुढे चालू राहू शकते. परत टर्म इन्शुरन्सचा हप्ताही कलम ८०-सी अंतर्गत वजावटीस पात्र असतो.




*_गुंतवणुकीचा श्रीगणेशा …_*

नोकरी, व्यवसायाद्वारे कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या तरुण, तरुणींना बचत व गुंतवणुकीबाबत फारशी माहिती नसते.

*_अशा नवगुंतवणूकदारांनी पुढील गोष्टी लक्षात घेऊन बचतीचा श्रीगणेशा करावा._*

*_खर्चाचा आढावा_*

आपल्या खर्चांवर नियंत्रण राखण्यासाठी व खर्चांचा मागोवा घेण्यासाठी बजेट निश्चित करणे आवश्यक असते. आपला सरासरी मासिक खर्च किती आहे व त्यातील किती रक्कम अनावश्यकपणे खर्च झाली आहे हे त्यातून लक्षात येते. सध्याच्या आधुनिक काळात यासाठी स्मार्टफोनमधील अॅप्सचाही वापर करता येतो.

*_२० टक्के बचत_*

एकूण उत्पन्नाचा पाचवा भाग म्हणजे २० टक्के रकमेची बचत करण्याचा प्रयत्न करा. हे प्रमाण अनेकांना मोठे वाटेल. मात्र कारकिर्दीच्या सुरुवातीला कौटुंबिक जबाबदारी व खर्चांचे प्रमाणही कमी असते. त्यामुळे दरमहा एवढी रक्कम जमा होत गेल्यास काही वर्षांनी भरीव निधी निर्माण होईल. या निधीच्या साह्याने आपत्कालीन निधी, गुंतवणूक निधी, कर्जहप्त्यांसाठीची तरतूद करणे शक्य होईल. एवढेच काय, यातून विदेशी ट्रिपचेही नियोजन तुम्ही करू शकाल. दरमहा विशिष्ट रकमेची बचत केल्याने तरुणपणी आर्थिक शिस्तही लागते.

*_कर्जाची परतफेड_*

शैक्षणिक कर्ज अथवा क्रेडिट कार्डचे पेमेंट बाकी असेल तर त्याची लवकरात लवकर परतफेड करा. नियमित बचत, अनावश्यक खर्चांना फाटा, तसेच, काही अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न यामुळेही कर्जांची लवकर परतफेड होऊ शकते.

*_आपत्कालीन निधी_*

कारकिर्दीच्या सुरुवातीपासून आपत्कालीन निधी निर्माण करण्यासाठी नियमित बचत करा. अचानक नोकरी गमावणे, अनपेक्षित कौटुंबिक खर्च यावेळी हा निधी उपयोगी पडतो. हा निधी निर्माण करण्याचा सर्वांत सोपा उपाय म्हणजे आपल्या बचत खात्यामध्ये एकूण मासिक खर्चाच्या तीनपट रक्कम राखून ठेवणे.

*_गुंतवणूक_*

प्रत्यक्ष गुंतवणुकीस सुरुवात करण्यापूर्वी आधी सांगितल्यानुसार बचतीचा पाया भक्कम करा. कमी वयापासून केलेली गुंतवणूक दीर्घकाळात अतिशय फायदेशीर ठरते. कारकिर्दीच्या सुरुवातीला जोखीम घेण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे खात्रीशीर व पूर्वेतिहास चांगला असणाऱ्या *_म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करा_*. यासाठी पुरेशी माहिती नसल्यास अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्या. याशिवाय, रिकरिंग, मुदत ठेवी, पीपीएफ, एसआयपी (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) हे गुंतवणूक पर्यायही उपयुक्त आहेत.

*_करनियोजन_*

केवळ बचत व गुंतवणूक करू नका. या संबंधी प्राप्तिकराचे काय नियम, तरतुदी, वजावटी आहेत याचीही माहिती घ्या. करबचत करण्यासाठी कुठे व किती गुंतवणूक करणे आवश्यक आहे, याची माहिती यातून तुम्हाला मिळेल. इंटरनेट अथवा मोबाइल अॅप्समध्ये टॅक्स कॅलक्युलेटरही उपलब्ध आहेत. त्यांच्या साह्याने आपल्या उत्पन्नावर किती कर आकारला जाऊ शकतो याचा आढावा घ्या.
धनलाभ....


*_योगेश पवार_*
सान्वी इंन्वेस्टमेंट
नेप्ती नाका , अहमदनगर
84 84 84 32 26

वाचन करा📕📗📘
व्यायाम करा💪💪💪
अर्थ साक्षर व्हा💸💸💸

*_पोस्ट आवडल्यास शेअर नक्की करा_*

















निवृत्तीपश्चात सुरक्षित मुद्दल आणि नियमित उत्पन्न देणाऱ्या योजना

http://bit.ly/2Zm3SSR
 1,592
Print Friendly, PDF & Email
मागच्या लेखात आपण निवृत्तीनंतर गुंतवणूक करताना कसा विचार करायला हवा, ते बघितले. भविष्यातील कालावधीचा कप्प्या-कप्प्यांमध्ये विचार केल्यामुळे योग्य गुंतवणूक धोरण ठरवून रास्त पर्याय निवडण्यास मदत होते. गुंतवणुक करताना आपल्यासाठी प्राधान्यक्रम हा मुद्दलाची सुरक्षितता, रोखता आणि नियमित उत्पन्न अशा प्रकारे असतो. त्याशिवाय चलनवाढीला तोंड देण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूकदेखील करावी लागते आणि इन्कम टॅक्स देखील कमीत कमी बसेल हे पाहावे लागते. मात्र ‘आखूड शिंगी बहुदुधी’ अशी सर्वगुणसंपन्न गुंतवणूक योजना कुठलीच नसते. विविध प्रकारच्या गुंतवणूक पर्यायांमध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात आणि त्यांची एकत्र मोट बांधून, पोर्टफोलिओ बनवून आपल्याला मार्ग काढावा लागतो.
हे रिटायर्ड लोकांना माहिती असलेच पाहिजेत असे विविध गुंतवणूक पर्याय कुठले आणि त्यांचे गुणधर्म काय हे आपण आज पाहू. मात्र प्रत्येक पर्यायात किती रक्कम गुंतवावी हा प्रत्येकाच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.
वरिष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizens Saving Scheme):– 
  • या योजनेत मुद्दलाची सर्वाधिक सुरक्षितता आणि नियमित उत्पन्न मिळते. वयाची साठी उलटलेल्या कुठल्याही व्यक्तीला यात गुंतवणूक करता येते. स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्यांना ५५व्या वर्षीदेखील या योजनेत सामील होता येऊ शकते. 
  • या योजनेत रू १५ लाखापर्यंत गुंतवणूक करता येते. सध्या त्यावर ८.६% व्याजदर मिळतो आहे. बहुतांश बँकांच्या मुदत ठेवीवरील व्याजदरांपेक्षा हा जास्त आहे. या योजनेला ५ वर्षांची मुदत आहे, आणि नंतर अजून ३ वर्षांसाठी ती वाढवता येऊ शकते. 
  • गुंतवणूक करताना असणारा व्याजदर मुदतपूर्तीपर्यंत कायम राहणार आहे. मात्र यात हवं तेव्हा पैसे काढून घेण्याची मुभा नाही. जर मुदतपूर्व पैसे काढून घ्यायची वेळ आली तर १.५% दंड भरावा लागतो. 
  • सरकारी पाठिंबा आणि बँकांपेक्षा जास्तीचे व्याजदर यामुळे ही योजना वरिष्ठ नागरिकांत फार लोकप्रिय आहे. व्याज त्रैमासिक किंवा वार्षिक मिळते आणि त्यावर टॅक्स लागू होतो.
  • भारतीय आयुर्विमा निगमच्या (LIC) माध्यमातून राबवलेल्या या योजनेतून आपली दरमहा नियमित उत्पन्न मिळण्याची निवृत्तीवेतन किंवा पेन्शनची  गरज भागू शकते. 
  • यात जास्तीत जास्त पंधरा लाखापर्यंत गुंतवणूक करता येते आणि त्यातून दरमहा रू १०,०००/- उत्पन्न मिळते, म्हणजेच वार्षिक व्याजदर ८% मिळतो. या योजनेला १० वर्षांची मुदत आहे. त्यानंतर गुंतवलेली रक्कम परत मिळते. 
  • आकस्मिक संकटाच्या प्रसंगीच मध्ये पैसे काढायला मुभा मिळू शकते. त्यामुळे या योजनेत रोखता किंवा तरलता अजिबात नसते. दरमहा मिळणाऱ्या या निवृत्तीवेतनावर टॅक्स लागू होतो.
पोस्ट ऑफिस मासिक आय योजना (POMIS):– 
  • पोस्ट ऑफिसांमधून मिळू शकणाऱ्या या योजनेत सध्या वार्षिक ७.७% परतावा मिळतो आहे. दर तीन महिन्यांनी त्याचा दर कमीजास्त होत राहतो. 
  • एक व्यक्ती जास्तीतजास्त रू ४.५ लाख त्यात गुंतवू शकते. जॉईंट अकाउंट (संयुक्त खाते) मध्ये ९ लाख ठेवता येतात. हिची मुदत ५ वर्षांची असते आणि व्याज दरमहा मिळत राहते. यात देखील मुद्दलाची सुरक्षा आणि नियमित उत्पन्न या गरजा भागतात.
बँकांच्या मुदतठेवी (Bank FD):- 
  • सर्वच बँका मुदतठेवी स्वीकारतात. यात १ वर्ष ते ५ वर्ष मुदतीसाठी वरिष्ठ नागरिकांना सध्या ७.२५% ते ८.२५% पर्यंत व्याजदर मिळू शकतो. 
  • मुदतीनंतर पुन्हा ठेवींचे नूतनीकरण करायचे झाल्यास तत्कालीन व्याजदर स्वीकारावा लागतो. त्यामुळे गुंतवणुकीतील रोखता राखण्यासाठी कमी मुदतीच्या ठेवी काढून नियमितपणे नूतनीकरण करणे हे फायद्याचे ठरत नाही. 
  • मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक व्याज घेऊ शकतो. बऱ्यापैकी सुरक्षित मुद्दल आणि नियमित उत्पन्न या गरजा भागतात, मात्र मधेच ठेव मोडायची वेळ आल्यास १%-१.५% दंड भरावा लागतो. 
वरील सर्व योजनांमधून नियमित परतावा मिळतो, तसेच मुद्दल सुरक्षित राहते. मात्र या सगळ्यांतील उत्पन्नावर टॅक्स लागू होतो.  त्यामुळे ज्यांचे या व इतर मार्गांनी वार्षिक उत्पन्न ५-६ लाखापर्यंत आहे अशांनाच हे गुंतवणूक पर्याय पुरेसे ठरू शकतात. 
ज्यांना वार्षिक उत्पन्नावर २०% किंवा ३०% टॅक्स लागतो, त्यांच्यासाठी या योजना अकार्यक्षम ठरतात. त्यांना पुढील पर्याय उपयुक्त ठरतात.
म्युच्युअल फंडातील लिक्विड योजना:-
  • म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही जोखमीची असते, मात्र लिक्विड प्रकारच्या योजनांमधील जोखीम कमीत कमी असते. त्यातून मुदत ठेवींप्रमाणे ७%-८% वार्षिक परतावा मिळू शकतो आणि कधीही कितीही रक्कम कुठल्याही प्रकारचा दंड न भरता काढण्याची मुभा राहते. 
  • यातील जमा होणाऱ्या परताव्याचे स्वरूप ‘भांडवली नफा’ असे असल्याने टॅक्स कमी पडतो. ३ वर्षांपेक्षा अधिक काळ यात ठेवलेली रक्कम काढताना नफ्यावर जास्तीतजास्त १०%च टॅक्स भरावा लागतो. त्यामुळे मुद्दलाची सुरक्षा, नियमित परतावा सोबत टॅक्स कमी आणि कधीही काढण्याची मुभा या पर्यायात मिळतात. आकस्मिक निधी उभारायला देखील या योजना उत्तम ठरतात.
टॅक्स-फ्री बॉण्ड्स:- 
  • अनेक सरकारी कंपन्यांनी काही वर्षांपूर्वी टॅक्स-फ्री बॉण्ड्स विकले होते. आता जरी असे नवीन बॉण्ड्स बाजारात येत नाहीत, तरी मागे इशु केलेले हे बॉण्ड्स NSE किंवा BSE वरून आपण आधीच्या गुंतवणूकदारांकडून विकत घेऊ शकतो. 
  • या बॉण्ड्सवर मिळणारे व्याज करमुक्त असते. त्यामुळे जास्त टॅक्स भरणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी यावरील परतावा मुदतठेवींपेक्षा आकर्षक ठरतो. मात्र यात जास्त खरेदी-विक्री होत नसल्याने योग्य किमतीत आणि ठराविक वेळेत हे बॉण्ड्स आपण मिळवू शकू याची शाश्वती नसते. 
  • तसेच मिळालेले बॉण्ड्स त्यांच्या १०-१५ वर्षांनंतर असणाऱ्या मुदतपूर्ती पर्यंत बाळगण्याची तयारी ठेवावी लागते. यात नियमित उत्पन्न मिळते, मुद्दल देखील सुरक्षित असते, टॅक्स वाचतो, पण हवे तेव्हा पैसे काढून घेण्याची मुभा नसते.
*_नियमित गुंतवणूक फायदे_*


सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP):


 हा एक बॅंकेचे रिकरींग डिपॉझिटला अतिशय चांगला पर्याय आहे. तसेच ज्या व्यक्ती पिग्मिमध्ये गुंतवणूक करतात त्यांनाही हा चांगला पर्याय आहे. नियमित ठरावीक मुदतीने एकाच चांगल्या स्कीम मध्ये गुंतवणूक करीत राहणे फारच उत्तम. ठरावीक मुदत ही शक्यतो दर महा, दर तीन महिन्यांनी अथवा वार्षिक आपल्या सोयीने ठरवता येते. या मध्ये सरासरीचा फायदा मिळतो कारण आपण मार्केट वर असताना तसेच खाली असताना (जेव्हा आपल्या गुंतवणुकीपोटी जास्त युनिट प्राप्त होतात व सरासरी होते) गुंतवणूक करत रहातो ज्यामुळे सरासरीचा लाभ मिळतो.

गेल्या २० ते २२ वर्षात या प्रकारे केलेल्या गुंतवणुकीवर अत्यंत आकर्षक परतावा मिळालेला आहे जो कि वार्षिक २२% चक्रवाढ दराने मिळालेला आहे, मात्र आपण गुंतवणूक करताना वार्षिक १५% दराने परतावा मिळेल असे समजून दीर्घ काळासाठी गुंतवणूक करावी.  बाजारात ठरविक अंतराने मोठी तेजी व पाठोपाठ मोठी मंदी येत असते व हे चक्र अव्याहत चालूच असते.  या प्रकारे गुंतवणुक दीर्घ काळ करत राहिले असता बाजारातील जोखीम जवळपास नष्ट होऊन जाते. म्युचुअल फंडाचे जवळपास सर्वच योजनेत एस.आय.पी. करता येते, मात्र आपल्या जोखीम स्वीकारण्याचे तयारीनुसार व किती काळ आपण गुंतवणूक करणार आहोत यानुसार योजना निवडावी.  तरुण व्यक्तीने शक्यतो मल्टी कॅप योजनेत व मिड कॅप योजनेत गुंतवणूक करावी, मध्यम वयाचे व्यक्तीने लार्ज कॅप योजनेत, बॅलन्सड योजनेत गुंतवणूक करावी, कर बचतीसाठी ELSS योजनेत एस.आय.पी. करावी








गुंतवणुक का करावी?




म्युच्युअल फंडात गुंतवणूक का व कशी करावी?

म्युच्युअल फंडात गुंतवणूक का करावी? उत्तर अगदी सोपं आहे, कारण अतिरिक्त संपत्ती निर्माण करण्यासाठी. फक्त एकच गोष्ट लक्षात असूद्या की, समभाग संबधीत म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करताना ही गुंतवणूक फक्त दीर्घ मुदतीसाठी असावी.   अल्पमुदतीत नफा किंवा नुकसान मोठ्याप्रमाणात होण्याची शक्यता अधिक असते दीर्घ मुदतीत एक तरी नफ्याची चांगली संधी उपलब्ध होण्याची शक्यता अधिक असते. अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करावयाची असल्यास डेट फंड योजनेत गुंतवणूक करावी. 

म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे फायदेः

अत्यल्प खर्च. तज्ञ फंड मॅनेजर्स तुमच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करतात. पारदर्शकता. गुंतवणुकीची किंमत रोजच्या रोज कळते. तरलता - पैसे केव्हाही काढता येतात - ज्यामुळे अपेक्षीत भांडवलवॄद्धी झाली असता किंवा गरज असेल तेव्हा पैसे काढता येतात. देशाच्या ग्रोईंग आर्थिक व्यवस्थात सहभाची संधी. जगाच्या तुलनेत भारतीय अर्थ व्यवस्था वेगाने वाढत आहे. गुंतवणूक अनेक कंपन्यांच्या शेअर्शमध्ये गुंतविली जात असल्यामुळे मर्यादित जोखीम. इक्विटी लिंक सेव्हींग स्कीम मध्ये गुंवणूक करून आयकर कलम ८०-सी खाली मूळ उत्पन्नात वजावट मिळण्याची सुविधा. 







गुंतवणूकदाराला मिळणारा फायदा.

१)      म्युच्युअल फंड हे गुंतवणूकीचे प्रभावी माध्यम आहे.

२)      प्रत्येकाच्या गरजेनुसार म्युच्युअल फंडाच्या विविध योजना गुंतवणूकीसाठी उपलब्ध असतात.

३)      म्युच्युअल फंडात जास्त जोखमीच्या तसेच जवळपास अजिबात जोखीम नसणा-याही योजना असतात.

४)      म्युच्युअल फंडाच्या कर बचतीच्याही योजना असून यातून आयकर कलम ८०-सी अंतर्गत सुट मिळते.

५)      म्युच्युअल फंडाच्या इक्वीटी योजनेत केलेल्या गुंतवणूकीवर एक वर्षानंतर मिळणारा सर्व फायदा करमुक्त असतो.

६)      म्युच्युअल फंडाच्या डेब्ट योजनेत केलेल्या गुंतवणूकीवर एक वर्षानंतर मिळणा-या उत्पन्नावर इंडेक्ससेशनचा फायदा घेऊन कर बचत करता येते.

७)      म्युच्युअल फंडात दिर्घकाळासाठी नियमीत दरमहा गुंतवणूक केली असता फार चांगला फायदा मिळण्याची शक्यता असते.

८)      तज्ञ व्यक्ती त्याच्या गुंतवणूकीची काळजी घेतात.

९)      शेअर बाजारातील दिर्घकालीन वाढीचा फायदा मिळतो.

१०)   नियमीत बचतीची सवय लागते.

११)   भविष्यातील आर्थीक गरजा भागवल्या जातात.

१२)   संपत्ती निर्माण होते.

१३)   त्याच्या गुंतवणूकीचा तपशील केव्हाही ऑनलाईन पहाता येतो.

१४)   केव्हाही पैसे काढण्याची सुवीधा असल्यामुळे गरजेला केव्हाही पैसे मिळू शकतात.

१५)   म्युच्युअल फंडाच्या योजनेत केलेल्या गुंतवणूकीतून कोणतीही कपात केली जात नसल्यामुळे संपुर्ण रक्कम गुंतवणूकीलाच जाते.


१६)   रिलायन्स, बिर्ला व आयसीआयसीआय या म्युच्युअल फंडाच्या योजनेत एसआयपी इंशुरन्सची सुवीधा घेता येते ज्यामुळे रु.२० लाखापर्यंत मोफत विमा मिळू शकतो ज्यासाठी कोणताही आकार (चार्जेस) लागत नाही, ह्यासाठीचा खर्च म्युच्युअल फंड कंपनी त्यांचे फायद्यातून सोसते.




गुंतवणुक का करावी?




म्युच्युअल फंडात गुंतवणूक का व कशी करावी?

म्युच्युअल फंडात गुंतवणूक का करावी? उत्तर अगदी सोपं आहे, कारण अतिरिक्त संपत्ती निर्माण करण्यासाठी. फक्त एकच गोष्ट लक्षात असूद्या की, समभाग संबधीत म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करताना ही गुंतवणूक फक्त दीर्घ मुदतीसाठी असावी.   अल्पमुदतीत नफा किंवा नुकसान मोठ्याप्रमाणात होण्याची शक्यता अधिक असते दीर्घ मुदतीत एक तरी नफ्याची चांगली संधी उपलब्ध होण्याची शक्यता अधिक असते. अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करावयाची असल्यास डेट फंड योजनेत गुंतवणूक करावी. 

म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे फायदेः

अत्यल्प खर्च. तज्ञ फंड मॅनेजर्स तुमच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करतात. पारदर्शकता. गुंतवणुकीची किंमत रोजच्या रोज कळते. तरलता - पैसे केव्हाही काढता येतात - ज्यामुळे अपेक्षीत भांडवलवॄद्धी झाली असता किंवा गरज असेल तेव्हा पैसे काढता येतात. देशाच्या ग्रोईंग आर्थिक व्यवस्थात सहभाची संधी. जगाच्या तुलनेत भारतीय अर्थ व्यवस्था वेगाने वाढत आहे. गुंतवणूक अनेक कंपन्यांच्या शेअर्शमध्ये गुंतविली जात असल्यामुळे मर्यादित जोखीम. इक्विटी लिंक सेव्हींग स्कीम मध्ये गुंवणूक करून आयकर कलम ८०-सी खाली मूळ उत्पन्नात वजावट मिळण्याची सुविधा. 







गुंतवणूकदाराला मिळणारा फायदा.

१)      म्युच्युअल फंड हे गुंतवणूकीचे प्रभावी माध्यम आहे.

२)      प्रत्येकाच्या गरजेनुसार म्युच्युअल फंडाच्या विविध योजना गुंतवणूकीसाठी उपलब्ध असतात.

३)      म्युच्युअल फंडात जास्त जोखमीच्या तसेच जवळपास अजिबात जोखीम नसणा-याही योजना असतात.

४)      म्युच्युअल फंडाच्या कर बचतीच्याही योजना असून यातून आयकर कलम ८०-सी अंतर्गत सुट मिळते.

५)      म्युच्युअल फंडाच्या इक्वीटी योजनेत केलेल्या गुंतवणूकीवर एक वर्षानंतर मिळणारा सर्व फायदा करमुक्त असतो.

६)      म्युच्युअल फंडाच्या डेब्ट योजनेत केलेल्या गुंतवणूकीवर एक वर्षानंतर मिळणा-या उत्पन्नावर इंडेक्ससेशनचा फायदा घेऊन कर बचत करता येते.

७)      म्युच्युअल फंडात दिर्घकाळासाठी नियमीत दरमहा गुंतवणूक केली असता फार चांगला फायदा मिळण्याची शक्यता असते.

८)      तज्ञ व्यक्ती त्याच्या गुंतवणूकीची काळजी घेतात.

९)      शेअर बाजारातील दिर्घकालीन वाढीचा फायदा मिळतो.

१०)   नियमीत बचतीची सवय लागते.

११)   भविष्यातील आर्थीक गरजा भागवल्या जातात.

१२)   संपत्ती निर्माण होते.

१३)   त्याच्या गुंतवणूकीचा तपशील केव्हाही ऑनलाईन पहाता येतो.

१४)   केव्हाही पैसे काढण्याची सुवीधा असल्यामुळे गरजेला केव्हाही पैसे मिळू शकतात.

१५)   म्युच्युअल फंडाच्या योजनेत केलेल्या गुंतवणूकीतून कोणतीही कपात केली जात नसल्यामुळे संपुर्ण रक्कम गुंतवणूकीलाच जाते.


१६)   रिलायन्स, बिर्ला व आयसीआयसीआय या म्युच्युअल फंडाच्या योजनेत एसआयपी इंशुरन्सची सुवीधा घेता येते ज्यामुळे रु.२० लाखापर्यंत मोफत विमा मिळू शकतो ज्यासाठी कोणताही आकार (चार्जेस) लागत नाही, ह्यासाठीचा खर्च म्युच्युअल फंड कंपनी त्यांचे फायद्यातून सोसते.


*_नियमित गुंतवणूक फायदे_*


सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP):


 हा एक बॅंकेचे रिकरींग डिपॉझिटला अतिशय चांगला पर्याय आहे. तसेच ज्या व्यक्ती पिग्मिमध्ये गुंतवणूक करतात त्यांनाही हा चांगला पर्याय आहे. नियमित ठरावीक मुदतीने एकाच चांगल्या स्कीम मध्ये गुंतवणूक करीत राहणे फारच उत्तम. ठरावीक मुदत ही शक्यतो दर महा, दर तीन महिन्यांनी अथवा वार्षिक आपल्या सोयीने ठरवता येते. या मध्ये सरासरीचा फायदा मिळतो कारण आपण मार्केट वर असताना तसेच खाली असताना (जेव्हा आपल्या गुंतवणुकीपोटी जास्त युनिट प्राप्त होतात व सरासरी होते) गुंतवणूक करत रहातो ज्यामुळे सरासरीचा लाभ मिळतो.

गेल्या २० ते २२ वर्षात या प्रकारे केलेल्या गुंतवणुकीवर अत्यंत आकर्षक परतावा मिळालेला आहे जो कि वार्षिक २२% चक्रवाढ दराने मिळालेला आहे, मात्र आपण गुंतवणूक करताना वार्षिक १५% दराने परतावा मिळेल असे समजून दीर्घ काळासाठी गुंतवणूक करावी.  बाजारात ठरविक अंतराने मोठी तेजी व पाठोपाठ मोठी मंदी येत असते व हे चक्र अव्याहत चालूच असते.  या प्रकारे गुंतवणुक दीर्घ काळ करत राहिले असता बाजारातील जोखीम जवळपास नष्ट होऊन जाते. म्युचुअल फंडाचे जवळपास सर्वच योजनेत एस.आय.पी. करता येते, मात्र आपल्या जोखीम स्वीकारण्याचे तयारीनुसार व किती काळ आपण गुंतवणूक करणार आहोत यानुसार योजना निवडावी.  तरुण व्यक्तीने शक्यतो मल्टी कॅप योजनेत व मिड कॅप योजनेत गुंतवणूक करावी, मध्यम वयाचे व्यक्तीने लार्ज कॅप योजनेत, बॅलन्सड योजनेत गुंतवणूक करावी, कर बचतीसाठी ELSS योजनेत एस.आय.पी. करावी.
@@@@@@@@@@@@@@@@##@

ClBIL SCORE काय असतंय ???

हा टॉपीक त्या मुलांसाठी अत्यंत कामी येऊ शकतो , जे नवीन नवीन मार्केटला येत आहेत .
बघा , आपण कित्येक ठिकाणी ऐकतो लोन घ्या , लोन घ्या सिबील चांगला नसला तरी लोन मिळेल , फेकूचंद असतात हे , पण असो .
हे सिबील स्कोर काय प्रकरण आहे ?
बघा मुळात माणसांच्या दोन प्रकारच्या सवयी असतात .
1) पै पै गोळा करून ठेवतील ( Depositing Habit) 
2) दुसऱ्या कडून घेतलेली पै न पै परत करतील ( Repayment Habit)
या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी अजिबात संबंध नाही .
पूर्वी लोक काय करायचे कि पन्नास बँकातून लोन काढायचे , एका बँकेला दुसऱ्या बँकेचा पत्ता नसायचा .
जे काही डॉक्युमेंट आवश्यक असायचे ते म्हणजे नो ड्युज सर्टीफिकेट .
आत्ता हा प्रॉब्लेम मोठा व्हायचा म्हणून 
या कंपनीची स्थापना झाली Aug 2000 मध्ये .
Credit Information Bureau Ltd . या कंपनीची स्थापना झाली .
आज या कंपनीचे नाव TransUnion CIBIL Ltd असे आहे .
ही कंपनी भारतातल्या सर्वच लहान मोठ्या बँका , वित्तीय संस्थांशी जोडली गेलेली आहे .
आणि यावर RBI ची मॉनीटरींग आहे .
समजा आपण बँकेत गेलो , आणि कर्जासाठी अर्ज दिला .
तर बँक म्हणते दोन . तीन दिवसांनी या ! 
आता या दोन तीन दिवसात बँक नक्की काय करते ? 
तर सर्वात अगोदर ती त्या व्यक्तीचा CIBIL रिपोर्ट मागावते .
आणि त्याची पेमेंट हिस्टरी , तसेच त्याचा CIBIL स्कोर चेक करते ?
जसं एखादा बाप आपली पोरगी देण्याअगोदर , नवऱ्या मुलाची सगळी हिस्टरी चेक करतो तसंच आहे हे़.
CIBIL स्कोर हा 
300- - - - - - - ते -- -- -- -- 900 
मध्ये मोजला जातो .
जर आपला स्कोर 750 ते 900 दरम्यान असेल तर आपल्याला लोन लगेच मिळेल .
पण जर स्कोर 650 च्या खाली असेल तर मात्र बँक म्हणते तुमचा CIBIL स्कोर नीट करून आणा ! 
कर्ज मिळतच नाही .
म्हणजे समजलं ! 
कि बँका कर्ज देणे का नाकारतात ? 
तर CIBIL Score नीट नसतो .
* CIBIL Score कमी का होतो ? *
1) कर्जाचा EMl वेळेवर न भरणे .
2) कर्जाची परतफेडच न करणे .
3) चेक बाऊन्स होणे 
4) क्रेडीट कार्डची पूर्ण लिमिट संपेपर्यंत वापरणे 
5) स्वतःवर असणारे कर्ज NPA मध्ये जाऊ देणे 
6) सतत वेगवेगळ्या बँकामधे कर्जासाठी अप्लाय करत रहाणे .
यामुळे CIBIL score वर वाईट परिणाम होतात .
बघा , मुळात बँकाचे बोर्ड बाहेरून जरी वेगवेगळे दिसत असले तरी , शेवटी आतून त्या एकच असतात , त्यामुळे त्या त्यांच्या कडील प्रत्येक ग्राहकाची माहिती स्वतः हून CIBIL ला कळवतात आणि तिथुन मग कोणतीही बँक ती माहिती चेक करू शकते .
याचा अर्थ असा कि , आजच्या या डिजिटल युगात आपण बँकांना मूर्ख बनवू शकत नाही . ( आता काही जण मल्ल्याचं नाव घेऊन , उलट सुलट चर्चा करतील , पण तशा केसेस वेगळ्या असतात ) .
बघा मुळात बँकाचा मेन व्यवसायच लोन देणे हा आहे , पण लोन अमाऊंट योग्य रित्या परत येईल का नाही याची खात्री बँक करत असते .
तर मग कसं काय करावं कि ज्यामुळे CIBIL score सुधारेल ?
1) EMI वेळेवर भरा , चुकवू नका किंवा उशीर करू नका .
2) कोणत्याच बँकेचे कर्ज बुडवू नका ( ही तर सगळ्यात वाईट गोष्ट )
3) Home Loan , vehicle Loan , Education Loan , personal Loan कसंही लोन असू दया , त्याचे हप्ते वेळेवरच गेले पाहिजेत , ही शिस्त सांभाळा
4) एखादी information बँकेकडून चुकीची गेली , समजा आपण 14 तारखेला हप्ता भरलाय पण बँकेने 16 तारखेत जमा केला , तरी तो दुरुस्त करून घ्या .
5) उद्या जर लोनची आवश्यकता भासणार आहे , तर सगळी जुनी कर्जे फेडून टाका ! त्याच्या शिवाय पर्याय नाही .
6) क्रेडीट कार्ड ची लिमीट समजा एक लाख रुपये आहे . तर पूर्ण लिमिट संपेपर्यंत कधीच वापरू नका , असे करून आपण स्वतःला Risky कस्टमर सिद्ध करत असतो त्यामुळे 30% पर्यंतच क्रेडीट कार्ड वापरा .
CIBIL स्कोर निव्वळच कमी असणे म्हणजे , आजपर्यंत आपण कधीही बँकींग लोन सिस्टीमचा वापरच केला नाही असं दाखवते .
या मध्ये 
NA - No Activity
NH - No History
असे पर्याय दिसू शकतात .
तर काय करा कि , एखादं छोटं पर्सनल लोन घेऊन वेळेवर परतावे भरा , अशा प्रकारे CIBIL मध्ये आपली History तयार होईल .
बँकींग सिस्टीम कशी काम करते ? याबाबत आपल्या मराठी पोरांमध्ये बऱ्यापैकी जागृती नाही , आपण बँकांना , त्यांच्या मॅनेजर्सला कर्ज का देत नाहीस ? म्हणून धारेवर धरतो .
बँकेसमोर बँड वाजवतो , आंदोलनं करतो , धरणे देतो .
पण राजे हो , कर्ज मिळण्या पाठीमागे 
एवढा सगळा पसारा असतो .
इथे सबकुछ CIBIL असतं .
त्याच्या बाहेर जाऊन कोणतीही बँक कर्ज देणार नाही .
म्हणून शासकीय योजना असो किंवा महामंडळा कडून घेतलेले कर्ज , 
बुडवू तर नकाच , परंतु वेळेत फेडा !
नाहीतर आपल्या वाईट काळात कोणतीही बँक सोबत उभी रहाणार नाही .

source : internet
@@@@@@@@@@@@@@@@@@@
*_स्वतःसाठी योग्य म्युच्युअल फंड कसा निवडावा_*




प्रथमतः तुम्ही स्वतःलाच खालील प्रश्न विचारा व त्यांची प्रामाणिक उत्तरे द्या

माझ्या वयात मी किती रुपयांची गुंतवणूक करावी? मी किती जोखीम पत्करू शकतो? दिर्घकाळीन फायद्यासाठी अल्पकालीन नुकसान झाले तर मी विचलित तर होणार नाही ना? मला किती काळानंतर गुंतवलेली रक्कम परत हवी? मला तत्काळ पैसे काढावे तर लागणार नाहीत ना? मी माझे पैसे किती काळ गुंतवून ठेवू शकतो? मला कर वाचवण्यासाठी गुंतवणूक करायची आहे का?

*_आता पुढील टप्पे पार पाडा_*


म्युच्युअल फंड कंपनीची निवड करा


म्युच्युअल फंड कंपनीची पार्श्वभूमी काय आहे? तुम्ही कंपनीचे नांव ऐकले आहे काय? त्याने मागील काही वर्षात योजनेच व्यवस्थापन कसे केले आहे? योजनेची कामगिरी समान उद्दिष्टाचे योजनेच्या तुलनेत कशी आहे? सेवा कशी दिली जाते? कामकाजात पारदर्शकता आहे का? फंड वारंवार आणि योग्यप्रकारे कामगिरी जाहीर करतो काय? वरील सर्व प्रश्नांची उत्तरे जर सकारात्मक मिळाली तर त्या फंडाची निवड करावयास हरकत नाही.


*_मागील कामगिरी तपासा_*

ज्या योजनेला किमान ५ वर्ष झाली आहेत व जी सतत मार्केट पेक्षा जास्त परतावा देत असेल तरच तिची निवड करा. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताना मागील कामगिरी हाच सर्वा महत्त्वाचा निकष असतो. आमचेशी फोन,  प्रत्यक्ष भेट अथवा ईमेल द्वारे संपर्क साधा.

*_योग्य गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्या._*


जेव्हा तुम्ही आजारी पडता तेव्हा चांगल्या डॉक्टर कडे जाता, जेव्हा तुम्हाला कायदेशीर सल्ला आवश्यक असतो तेव्हा प्रख्यात वकिलाकडे जाता त्याचप्रमाणे जेव्हा तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी गुंतवणूक करावयाची असते तेव्हा कोणाच्यातरी सांगण्यावरून अथवा स्वत:चे मानाने कोणत्यातरी योजनेत गुंतवणूक करण्यापेक्षा ज्या व्यक्तीला याबाबतीत चांगले समजते अश्या गुंतवणूक मार्गदर्शकाची तुम्ही जर मदत घेतलीत तर तुमचाच फायदा होईल.

आम्ही तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचे नियोजन व योग्य साधनाची निवड करण्यास मदत करतो. अधिक माहितीसाठी इमेल अथवा मोबाईलवर संपर्क करा.


*_योगेश पवार_*

म्युच्युअल फंड अॅडव्हायझर
      ८४ ८४ ८४ 32 2६
       9404822659
          अहमदनगर




🏃🏃‍♀ *व्यायाम करा* ,

📕📖📚 *वाचन करा*,

💰💵💶 *अर्थसाक्षर व्हा*
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
*_नियमित गुंतवणूक फायदे_*


सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP):



 हा एक बॅंकेचे रिकरींग डिपॉझिटला अतिशय चांगला पर्याय आहे. तसेच ज्या व्यक्ती पिग्मिमध्ये गुंतवणूक करतात त्यांनाही हा चांगला पर्याय आहे. नियमित ठरावीक मुदतीने एकाच चांगल्या स्कीम मध्ये गुंतवणूक करीत राहणे फारच उत्तम. ठरावीक मुदत ही शक्यतो दर महा, दर तीन महिन्यांनी अथवा वार्षिक आपल्या सोयीने ठरवता येते. या मध्ये सरासरीचा फायदा मिळतो कारण आपण मार्केट वर असताना तसेच खाली असताना (जेव्हा आपल्या गुंतवणुकीपोटी जास्त युनिट प्राप्त होतात व सरासरी होते) गुंतवणूक करत रहातो ज्यामुळे सरासरीचा लाभ मिळतो.


गेल्या २० ते २२ वर्षात या प्रकारे केलेल्या गुंतवणुकीवर अत्यंत आकर्षक परतावा मिळालेला आहे जो कि वार्षिक २२% चक्रवाढ दराने मिळालेला आहे, मात्र आपण गुंतवणूक करताना वार्षिक १५% दराने परतावा मिळेल असे समजून दीर्घ काळासाठी गुंतवणूक करावी.  बाजारात ठरविक अंतराने मोठी तेजी व पाठोपाठ मोठी मंदी येत असते व हे चक्र अव्याहत चालूच असते.  या प्रकारे गुंतवणुक दीर्घ काळ करत राहिले असता बाजारातील जोखीम जवळपास नष्ट होऊन जाते. म्युचुअल फंडाचे जवळपास सर्वच योजनेत एस.आय.पी. करता येते, मात्र आपल्या जोखीम स्वीकारण्याचे तयारीनुसार व किती काळ आपण गुंतवणूक करणार आहोत यानुसार योजना निवडावी.  तरुण व्यक्तीने शक्यतो मल्टी कॅप योजनेत व मिड कॅप योजनेत गुंतवणूक करावी, मध्यम वयाचे व्यक्तीने लार्ज कॅप योजनेत, बॅलन्सड योजनेत गुंतवणूक करावी, कर बचतीसाठी ELSS योजनेत एस.आय.पी. करा

@@@@@@@@@@@@@@@@@@@@
*_गुंतवणूक : कशी? कोठे?_*

उत्तम व्यवहाराद्वारे जोडलेले धन तसेच ठेवण्यात काय अर्थ आहे? ते वाढवायलाही हवे नाही. वाढत्या गरजा, महागाई आणि भविष्याचा विचार करता आपल्या धनात वृद्धी होणे ही खरोखरच गरजेची गोष्ट आहे. त्यासाठी वेगवेगळे पर्यायही उपलब्ध आहेत. आपल्याला जमेल तसे जमतील तितके पैसे गुंतवले पाहिजेत, बचत केलीच पाहिजे. रसाळ आंब्यांनी लगडलेली आमराई अस्तित्वात येण्यासाठी अनेक वर्षे लागतात. त्यासाठी योग्य नियोजन, चांगली रोपे, मशागत आणि निगराणी अशा अनेक गोष्टींची गरज असते. करणाऱ्या मेहनतीबरोबरीने चांगल्या हवामानाचीही साथ लागते. गुंतवणुकीचेही थोडेसे असेच असते. अपेक्षित लाभ मिळण्यासाठी आर्थिक नियोजन आणि त्याप्रमाणे शिस्तशीर कार्यवाही यांची आवश्यकता असते. योग्य तऱ्हेने गुंतवणूक केल्यास हाती असलेल्या शिलकी रकमेतूनही आपल्याला हवी तशी रक्कम जमवता येणे शक्य होऊ शकते. त्यासाठी काही तत्त्वे मात्र लक्षात ठेवणे जरुरीचे आहे.


*_ गुंतवणूक कशी? :-_*


*_१. लवकर सुरवात :-_*


गुंतवणुकीला जेवढी लवकर सुरवात करू तेवढा त्यावरचा लाभ अधिक मिळत जातो. वयाच्या २५ व्या वर्षी सुरू केलेली बचत वयाच्या ३० व्या वर्षी सुरू केलेल्या अधिक रकमेच्या बचतीपेक्षा जास्त होते. कारण गुंतवणूक जास्त काळ होते. 


२. चक्रवाढ व्याजाची करामत :-


लवकर बचत सुरू केल्यामुळे फायदा होण्याचे मुख्य कारण म्हणजे चक्रवाढ व्याज- व्याजावर व्याज मिळत जाते. त्यामुळे अधिक फायदा होतो. ३०व्या वर्षी १ लाख रुपये गुंतवले तर ६० व्या वर्षी (15 टक्केवारी दराने) 87.45 लाख होतात तर ५० व्या वर्षी 5 लाख रुपये त्याच दराने गुंतवल्यास ६० व्या वर्षी फक्त 22 लाख होतात.


*_३. नियमित गुंतवणूक :-_*


दर महिना सातत्याने गुंतवणूक केल्यास मिळणारा फायदा लक्षणीय असतो. एक हजार रुपये ३० वर्षे 15 टक्केवारी व्याजदराने गुंतवल्यास मिळणारी रक्कम 70 लाख होते. थोडक्यात लहान रक्कम दीर्घ काळ नियमितपणे गुंतवल्यास फायदा निश्चित आहे.



*_ गुंतवणूक कशात करावी? :_*


महागाईच्या दरापेक्षा अधिक दराने परतावा हवा असेल तर पारंपरिक गुंतवणुकीच्या साधनात करून लाभदायी ठरणार नाही. बॅंकेचे व्याजदर कमी झाले आहेत. पोस्टातील मासिक योजनेचा बोनस वाढला आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीवर 8 टक्केवारी पेक्षा अधिक व्याजदर मिळू शकत नाही. गेल्या २५ वर्षांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीवर मिळालेला वार्षिक सरासरी परतावा असा आहे (१९८०-२००४)


१. सोने : ५.७ टक्केवारी 


२. बॅंक मुदत ठेव : १०.३ टक्केवारी 


३. बीएसई सेन्सेक्स : १५.६ टक्केवारी (इक्विटी शेअर्स)


४. महागाई दर : ६.७ टक्केवारी 



५. म्युचअल फंड: १८ टक्केवारी


इक्विटी शेअर्समधल्या गुंतवणुकीवर मिळालेला परतावा सर्वाधिक आहे आणि तसे करण्यात जोखीम अर्थातच आहे. पण ज्याला जास्त परतावा हवा आहे त्याला योग्य ते व जबाबदारीने धाडस करायलाच हवे.*_यासाठी म्युच्युअल फंडाचा राजमार्ग खुला आहे._* जोखीम व्यवस्थापन अतिशय चांगल्या प्रकारे करण्याची सोय इक्विटी म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये आहे. सर्वसामान्य माणूस ५०० रुपये इतक्या कमी रकमेतून या योजनांत गुंतवणूक करू शकतो. त्यासाठी डिमॅट खाते लागत नाही. म्युच्युअल फंड व्यावसायिकरीत्या सर्वसामान्य जनतेचा पैसा जोखीम कमी करून भांडवल बाजारात गुंतवतात. ज्याचा लाभ गुंतवणूकदाराला मिळतो. भारतीय अर्थव्यवस्था प्रगतिपथावर आहे. वाढत्या विकासदराचा फायदा येथील कंपन्यांना होणार व त्याचा लाभ ते त्यांच्या भागधारकांना देणार.आपण म्युच्युअल फंडाद्वारे या लाभात निश्चित सहभागी होऊ शकतो. सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये (बॅंकेतल्या मासिक ठेव योजनेसारखे) सहभागी होऊन लवकरात लवकर इक्विटी म्युच्युअल फंडाच्या चांगल्या योजनेत गुंतवणूक करावी. त्या दीर्घ काळाचा विचार करावा. शेअर्सच्या बाजारभावातल्या वाढ-घटीने विचलित होऊ नये. कारण लक्षात ठेवा, इक्विटीमध्ये गुंतवणूक करणे जोखमीचे आहे तसेच न करणेही जोखमीचे आहे.'

@@@@@@@@@@@@@@@@@@@@


आपल्या आर्थिक अडचणीच्या वेळी आपण कर्ज घेतो आणि आपली निकड भागवतो. पण “कोणते कर्ज कोणत्या वेळी घ्यावे? कोणते कर्ज कमी लाभदायक आहे? व्याजदर काय आहे? कोणत्या बँकेकडून कर्ज घ्यावे? एकावर एक कर्ज घ्यावे का? आणि बरंच काय काय… अर्थशिक्षित व्यक्ती या सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि मगच कर्ज घेण्याचा निर्णय घेते. 
तुम्हीही अर्थसाक्षर होऊ इच्छिता? तर मग सर्वात महत्वाची पायरी म्हणजे तुमच्या समोर असणाऱ्या पर्यायांची तुलना करून बघा. या तुलनात्मक अभ्यासातून कोणते एक असं उत्तर येत नाही. प्रत्येकाच्या गरजा आणि अपेक्षा वेगवेगळ्या असतात. त्यानुसार प्रत्येकाने ठरवावे की त्यांना कोणते कर्ज घ्यायचे आहे. हो पण त्यासाठी आपल्याकडे असणाऱ्या पर्यायांमध्ये तुलना करून आपल्यासाठी योग्य काय हे ठरवणे महत्वाचे आहे. ते कसं? ते आपण या लेखात पाहू. 
टॉप अप कर्ज (वाढीव) आणि वैयक्तिक कर्ज 
आता अशा परिस्थितीची कल्पना करा की, तुम्ही आधीच एक गृहकर्ज घेतलेले आहे आणि काही कारणांनी तुम्हाला अजून थोड्या पैशांची गरज आहे आणि कर्ज काढणे हा पर्याय तुम्हाला योग्य वाटतो. आता अशा वेळी तुमच्याकडे २ पर्याय उपलब्ध आहेत- 
१. तुम्ही नेहमी प्रमाणे खाजगी कर्ज काढू शकता.
२. तुम्ही तुमच्या गृह कर्जावर टॉप अप कर्ज काढू शकता.
आता तुमच्या समोर असणाऱ्या या दोन पर्यायांची तुलना करूया-
वैयक्तिक कर्ज का चांगले आहे?
  • बँकांनी कर्ज देण्यासाठी नेहमीप्रमाणे काही अटी आणि प्रक्रिया ठरवलेली असते, त्या पात्रता आणि निकषांची पूर्तता तुम्ही करू शकत असाल, तर कर्ज मिळण्यास कुठलाच विलंब होत नाही.
  • हे कर्ज घेताना कोणतेही तारण ठेवण्याची गरज नाही.कर्ज प्रक्रिया अगदीच सोपी नाही किंवा अगदी कठीणही नाही. 
  • तुम्हाला जास्तीत जास्त ६० महिने म्हणजे साधारण ५ वर्ष कालावधीचे कर्ज मिळू शकते.
  • हे कर्ज तुम्ही कशासाठी काढत आहात हे बँकेला सांगण्याची गरज नाही.
 वैयक्तिक कर्जाचे तोटे काय आहेत?
  • या कर्जांचा व्याजदर उच्च असतो.
  • हे कर्ज मान्य होण्यासाठी पात्रता नियम फारसे कडक नसतात.
  • तुमचा क्रेडिट स्कोअर ७०० पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. 
  • हे कर्ज अल्प कालावधीसाठी दिले जाते.
टॉप अप होम लोनची वैशिष्ट्ये:
  • उत्पन्नाचे काही निकष पूर्ण केले तर बँका टॉप-अप होम लोन सहज मंजूर करतात.
  • हे कर्ज वैयक्तिक कर्जाच्या कमाल मुदतीपेक्षाही जास्त कालावधीसाठी दिले जाऊ शकते. म्हणजे तुमच्या दीर्घ कालावधीच्या आणि उच्च रकमेच्या कर्जासाठी हा उत्तम पर्याय आहे.
  • आपल्या मूळ गृहकर्जाइतके किंवा त्याहून जास्त रकमेची कर्जही घेऊ शकता.
  • हे कर्ज तुम्ही कशासाठी घेत आहात हे सांगण्याची गरज नाही.
  • वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत याचा व्याजदर कमी आहे.
  • तुम्ही बँकेचे आधीच एका कर्जासाठीचे कर्जदार असल्यामुळे बँक पुन्हा तुमचा संपूर्ण क्रेडीट इतिहास मागत नाही.
टॉप-अप होम लोन मधील त्रुटी-
  • बँक किती कर्जाची रक्कम मान्य करते हे तुम्ही बँकेकडे  ठेवलेल्या तारणाच्या मूल्यावर अवलंबून असते.
  • या प्रक्रियेत मूल्यमापन, तारण आणि संबंधित प्रक्रिया, इत्यादीसारख्या प्रक्रियांमुळे थोडा वेळ लागू शकतो.
 उत्तम पर्याय कसा निवडावा?
तुमच्यासाठी कोणता पर्याय चांगला आहे, हे तुम्हाला पुढील मुद्द्यांचा विचार करून ठरवावं लागेल. काही विशिष्ट प्रसंगी टॉप-अप कर्ज फायदेशीर ठरू शकतात.  
 १. अल्पकालीन गरजा: 
  • जेव्हा तुम्हाला कमी कालावधीसाठी कर्ज हवे असते, तेव्हा वैयक्तिक कर्ज हा चांगला पर्याय असतो. 
  • पण जर लग्नासाठी, शिक्षणासाठी, वैद्यकीय खर्चासाठी इ. कर्जाची आवश्यकता असेल, तर होम लोन टॉप अप हा एक चांगला पर्याय आहे.  
२.   व्याजदरः 
  • व्याजदराचा विचार कराल, तर टॉप-अप  होम लोन फायदेशीर आहे. कारण याचा व्याजदर तुलनेने कमी असतो.
  •  वैयक्तिक कर्जावरील व्याजदर जास्त असतो. 
३.   ईएमआय: 
  • जर तुम्ही टॉप-अप कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हला परत फेडीसाठी जास्त कालावधी मिळतो.  
  • त्यामुळे ईएमआयचा विचार केला, तर वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत टॉप-अप कर्ज फायदेशीर आहे.
४.  पात्रता: 
  • तुम्ही बँकेचे गृहकर्ज ग्राहक असल्याने तुमचे कर्ज तत्काळ मान्य केले जाते. टॉप अप होम लोन घेण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर किती असावा याची काही बंधन नाही. बँकेला आपला क्रेडिट इतिहास तपासावा लागत नसल्यामुळे ही प्रक्रिया जलद होते.
  • वैयक्तिक कर्जदाराला मात्र  ७०० च्या वर क्रेडिट स्कोअर असल्यास कर्ज मंजूर केले जाते. 
५.  कागदपत्रे: 
  • वैयक्तिक कर्जासाठी फारशी कागदपत्रे लागत नाहीत. 
  • टॉप-अप कर्ज घेताना मात्र तुलनेने बऱ्याच कागदपत्रांची जमवाजमव करताना तुमची थोडी कसरत होऊ शकते.
६.  हमीदार: 
  • वैयक्तिक कर्जासाठी हमीदाराची आवश्यकता असते. 
  • टॉप- अप कर्ज घेताना अशी काही आवश्यकता नाही.
  • @@@@@@@@@@@@@@@@

*_ मुलांसाठी गुंतवणूक करायचीय?_*


एकीकडे महागाईत वाढ होत असतानाच शैक्षणिक खर्चांत वाढ होत आहे. त्यामुळे आपल्या पाल्याच्या भवितव्याविषयी अनेक पालक चिंतातूर असल्याचे दिसून आले आहे. मुलांच्या भवितव्यासाठी बाजारात अनेक योजना असल्याने अनेकांचा निवडीचा गोंधळ उडत आहे. या पार्श्वभूमीवर काही खात्रीशीर आणि चांगल्या योजनांचा घेतलेला आढावा...
...
*_सुरक्षितता, चांगला परतावा आणि रोकड सुलभता असणारी तसेच जोडीला करसवलतही देणारी योजना म्हणजे चांगली योजना असे समजले जाते._* अनेक प्रकारच्या योजना सरकार, बँका, वित्तीय संस्था, विमा कंपन्या, म्युच्युअल फंडाच्या अॅसेट मॅनेजमेंट कंपन्या यांनी बाजारात आणल्या आहेत. दुर्दैवाने वरील सर्व अपेक्षा पूर्ण केल्या जातील अशी एकही योजना नाही. छोटे विभक्त कुटुंब, वाढती महागाई आणि शिक्षणावरील खर्चात दिवसेंदिवस होणारी वाढ यांमुळे अनेकांना मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने काहीतरी भरीव तरतूद आधीपासूनच करावी, असे कायम वाटते.
लोकांच्या या मानसिकतेचा विमा कंपन्या पुरेपूर फायदा घेत असून, मुलांच्या कल्याणासाठी म्हणून खास योजना त्यांनी बाजारात आणल्या आहेत. या योजना त्यांच्या दोन ते तीन योजनांची सरमिसळ असून, त्यातून मिळणारा परतावा सात टक्क्यांच्या आसपास आहे. योजना काळात विमाधारकाचे बरेवाईट झाल्यास करारात नमूद केलेले संरक्षण मिळते. म्हणून त्याला विमा योजना म्हणायचे एवढेच... तेव्हा अशा प्रकारच्या योजना या फारश्या आकर्षक नाहीत. माहीत असलेले मोजके पर्याय, एजंटचे नेटवर्क आणि त्यांनी केलेले भावनिक आवाहन यामुळे गुंतवणूकदार अशा योजना खरेदी करीत आहेत. त्यामुळे कोणती योजना अधिक चांगली, याबाबत इतरांच्या मनात गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून, अनेक पालक संभ्रमात आहेत. केवळ मुलींसाठी असलेली सुकन्या समृद्धी योजना ही एकमेव सरकारी योजना असून सध्या त्यावर वार्षिक ८.५ टक्के दराने व्याज मिळते. ही योजना फक्त १० वर्षांखालील मुलींसाठी असल्याचे तसेच यातील रक्कम फक्त मुलीला मिळत असल्याने त्याचा फायदा मर्यादित लोकच घेऊ शकतात.

*_मुलांसाठी गुंतवणूक कशासाठी?_*
- उच्च शिक्षणाचा खर्च : शिक्षण दिवसेंदिवस महाग होत आहे. कर्जाच्या सोयी उपलब्ध असल्या, तरी सर्वांचा कल हा काहीही करून शिक्षणास पैसे कमी पडू नयेत असा असतो. अधिक महागडे शिक्षण म्हणजे अधिक चांगले शिक्षण असा सर्वसाधारण कल आहे.
- लग्न : लग्न समारंभ अविस्मरणीय व्हावा अशी अनेकांची इच्छा असते. विविध मालिका, चित्रपट यातील भव्यदिव्य लग्नसमारंभ पाहून सर्वांना असा खर्च केला पाहिजे असे वाटत आहे. त्यामुळे यावर चढाओढीने अधिकाधिक खर्च केला जात आहे.
- घर घेण्यासाठी अंशतः मदत : घरांच्या वाढत्या किमतीमुळे नव्याने विकसित होत असलेल्या शहरातही घर घेणे परवडत नाही. जरी घर घेण्यासाठी कर्जाची सोय उपलब्ध असली, तरी त्यातील किमान गरजेच्या गोष्टी घेण्यासही बरीच रक्कम लागते. यासाठी काही मदत व्हावी असा यामागील हेतू आहे.
- व्यवसायासाठी भांडवल : मुलांनी काही व्यवसाय करायचा ठरवल्यास त्यासाठी लागणाऱ्या संभाव्य भांडवलाची गरज यातून भागवली जाईल असे पालकांना वाटते.
...
सर्वसाधारणपणे पालक गुंतवणूक करताना वरील गोष्टींचा प्रामुख्याने विचार करतात. त्यापूर्वी पालकांनी स्वतःचा पुरेसा मुदत विमा (वार्षिक उत्पन्नाच्या २०पट) आणि आरोग्य विमा (वार्षिक उत्पन्नाच्या २ ते ३ पट) काढणे आवश्यक आहे. जीवन विमा योजनेतून आपल्याला काय मिळेल, यापेक्षा आपल्या अनुपस्थितीत आपले कुटुंब, सध्याचा जीवनस्तर कसा सांभाळू शकेल? हे महत्त्वाचे आहे. यानंतरच उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांचा मुलांसाठी ठरवलेल्या वरील उद्दिष्टांसाठी कसा वापर करता येईल ते पाहुया...

*_- सार्वजनिक भविष्य निर्वाह_* निधी (PPF) : सोळा आर्थिक वर्षांसाठी हे खाते पोस्टात किंवा बँकेत काढता येते. ते स्वतःच्या किंवा अज्ञान पाल्याच्या नावे काढता येईल. यात वार्षिक किमान ₹५०० रुपयांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. हे पैसे सरकार वापरात असल्याने १०० टक्के सुरक्षित आहेत. यातील गुंतवणुकीवर आठ टक्के करमुक्त व्याज मिळते. शिवाय यावर प्राप्तिकर अधिनियम ८० सी खाली करसवलत मिळत असली, तरी ती सवलत अन्य गुंतवणुकीतून घेऊन अधिकाधिक रक्कम या योजनेत जमा करावी. सातव्या आर्थिक वर्षापासून दरवर्षी एकदा कोणत्याही कारणासाठी अंशतः रक्कम काढता येत असल्याने गरजेनुसार त्याचा आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी वापर करता येईल. या खात्याची मुदत पूर्ण झाली, तरी आपल्या इच्छेनुसार पाच वर्षे वाढवून घेता येते.

*_- म्युच्युअल फंडांच्या योजना :_* अशा योजना व्यक्ती किंवा त्यांची मुले यांच्यासाठी असल्या, तरी त्यात फार काही फरक नसतो. म्हणून आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी अशी गुंतवणूक करणार असाल तर त्यासाठी आपल्या नावावर वेगळा पोर्टफोलिओ निर्माण करून त्यात 'एसआयपी'च्या माध्यमातून नियमित गुंतवणूक करावी. इक्विटी योजनांतून दीर्घकाळात चांगला परतावा मिळू शकतो. करसवलत घ्यायची असल्यास 'ईएलएसएस'चा विचार करावा. सहज उपलब्ध आहे म्हणून त्याच्या निव्वळ मालमत्ता मूल्याचा फारसा विचार करू नये. आपल्याला पैशांची अंदाजे कधी गरज लागू शकेल त्याच्या दोन ते तीन वर्षे आधी योजनेतून मिळत असलेला परतावा पाहून, तो आपणास अपेक्षित किंवा असाधारण असेल तर 'एसआयपी' खंडित न करता पूर्ण रक्कम काढून लिक्विड फंडात वळवावी. याचा उपयोग आपल्या खऱ्याखुऱ्या गरजेनुसार करता येईल आणि बाजारातील अनिश्चतीचा त्यावर परिमाण होणार नाही. दहा वर्षांहून अधिक काळ सातत्याने गुंतवणूक करीत राहिल्यास चक्रवाढ व्याजाने किमान १५ टक्के परतावा मिळायला हरकत नाही. योजनेची निवड करण्यात काही अडचण वाटत असल्यास व्यावसायिक सल्लागाराची मदत घ्यावी.

वर सुचवलेल्या योजना चढत्या क्रमाने धोकादायक परंतु, अधिक परतावा देणाऱ्या आहेत. त्यामुळे आपल्या जोखीम घेण्याच्या तयारीनुसार त्यांचे एकत्रीकरण करून टक्केवारी निश्चित करता येईल. त्यामुळे आपल्या मुलांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुखकर आणि सुरक्षित करता येऊ शकेल.
                    उदय पिंगळे.
    @@@@@@#@@#@@@@@@@@@@

No comments:

Post a Comment