Pages

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

आध्यत्मिक

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*हनुमानाच्या मूर्तीला शेंदूर फासण्याचं काय कारण आहे?*

*हनुमानाची मूर्तीही शेंदूरचर्चित असते. बहुतांश मारुती मंदिरात हनुमानाच्या मूर्तीला शेंदूर चढवलेला असतो. संपूर्ण मूर्तीलाच शेंदूर फासण्याचं काय कारण आहे?*

*हनुमानाला शेंदूर एवढा का प्रिय आहे याचं उत्तर ‘रामचरित मानस’ मध्ये मिळतं.*

*एकदा हनुमानाने सीतेला आपल्या भांगात शेंदूर भरताना पाहिलं. या गोष्टीचं हनुमानाला खूप आश्चर्य वाटलं. असं शेंदूर लावण्याचं कारण हनुमानाने सीतामाईला विचारलं. त्यावर सीता माई उत्तरल्या, “माझे पती श्रीराम यांच्या दीर्घायुष्यासाठी मी हा शेंदूर भांगात भरते. धर्मशास्त्रानुसार असा शेंदूर लावल्याने आपल्या स्वामींचं आयुष्य वाढतं. त्यांना कुठलेही विकार होत नाहीत.”*

*सीतेचं हे उत्तर ऐकून हनुमंताने विचार केला, जर चिमुटभर शेंदुराने प्रभू श्रीरामांचं आयुष्य वाढणार असेल, तर जर मी सबंध शरीरावरशेंदूर फासला तर प्रभू रामचंद्र अमर होतील. हाच विचार करून बजरंग बली हनुमानाने आपल्या संपूर्ण शरीरावर शेंदूर चढवण्यास सुरूवात केली आणि त्यामुळेच हनुमानाला शेंदूर चढवण्याची पद्धत निर्माण झाली. हनुमानास शेंदूर चढवणं हे श्रीरामांचंच पूजन असतं. त्यामुळे असा शेंदूर चढवण्याने हनुमान प्रसन्न होऊन आपल्या  मार्गातील अडथळे दूर करतात.*

*संकलन :- सतीश अलोणी @*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@


-----------------------------------------------
*पूजेच्या वेळी आसन कसे असावे*
-----------------------------------------------



धार्मिक कार्ये करताना किंवा नित्यपठन, जप करताना बसण्यासाठी आसनाचा वापर करण्याची परंपरा वैदिक काळापासून रूढ आहे.
पूजापाठ, धार्मिक कार्ये घरामध्ये असोत, किंवा एखाद्या मंदिरामध्ये असोत, जमिनीवर बसून पूजा करायची असल्यास आसानाचा वापर करणे अगत्याचे मानले गेले आहे.
धर्मशास्त्रांमध्ये प्रत्येक कार्याकरिता निरनिराळ्या आसनांचा उपयोग सांगितला गेला आहे.
पण नित्याच्या पूजेच्या वेळी आसन कसे असावे, याची माहिती फारशी सर्वश्रुत नाही.

*पूजेसाठी आसन असणे आवश्यक आहे किंवा नाही, आसन कसे असावे, इत्यादी सर्व बाबी जाणून घेऊ या.*

धर्मशास्त्रांच्या अनुसार जपाला बसताना नेहमी आसन असणे आवश्यक आहे. आसनाविना केवळ जमिनीवर बसून जप केल्याने दुःख प्राप्ती होत असल्याचे म्हटले जाते.
तसेच पूजेसाठी जे आसन अंथरले जाते, ते बांबूचे नसावे (चटई).
बांबूचे आसन दारिद्र्याला कारणीभूत ठरत असल्याची मान्यता आहे. त्याचप्रमाणे दगडी फरशीवर किंवा दगडावर बसून पूजापाठ करू नये. दगडी फरशीवर किंवा दगडावर बसून पूजा केल्याने त्याची योग्य फलप्राप्ती होत नसल्याचे म्हटले जाते.
त्याचप्रमाणे लाकडी आसनावर बसून पूजापाठ करणेही अशुभ फलदायी मानले गेले आहे. तसेच गवतापासून तयार केलेल्या आसनावर बसून पूजा केल्याने यश आणि कीर्ती नष्ट होत असल्याचे म्हटले जाते. पर्णींपासून, म्हणजेच पानांपासून तयार केल्या गेलेल्या आसनावर बसून पूजा केल्याने चित्त विचलित रहात असल्याचे म्हटले जाते.
घरामधील कोणत्याही शुभकार्यासाठी आसन वापरताना ते रेशमी, लोकरीचे बनलेले, मृगचर्म, काष्ठ किंवा तालपत्राचे असावे. तसेच श्राद्धकर्म विधींसाठी शास्त्रांमध्ये आसने कशा प्रकारची असू नयेत हे ज्याप्रमाणे सांगितले गेले आहे, त्याचप्रमाणे पूजा करताना आसन कसे असावे हे देखील सांगितले गेले आहे. घरामधील कोणत्याही शुभकार्यासाठी आसन वापरताना ते रेशमी, लोकरीचे बनलेले, मृगचर्म, काष्ठ किंवा तालपत्राचे असावे. तसेच श्राद्धकर्म विधींसाठी आसन वापरताना शमी, श्रीपर्णी, कदंब, खेर इत्यादींपासून तयार केलेल्या आसनांचा वापर सांगितला गेला आहे.
कोणत्याही प्रकारची सिद्धी प्राप्त करण्यासाठी केल्या गेलेल्या जप-तपासाठी व्याघ्रचर्म वापरण्याची पद्धत प्राचीन काळामध्ये अस्तित्वात होती, तर ज्ञानप्राप्तीसाठी मृगचर्म वापरले जात असे.
सुती वस्त्राचे साधे स्वच्छ आसन रोगमुक्ती देणारे असल्याने नित्याच्या पूजेसाठी हे आसन उत्तम समजले गेले आहे.
------------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोणी @*
------------------------------------------------


☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘
*जाणून घ्या महादेवांशी संबंधित रहस्यांची उत्तरे*

*☘१)"महादेव गळ्यात साप धारण का करतात?*
*महादेव जेवढे रहस्यमयी आहेत तेवधेच त्यांचे वस्त्र आणि आभूषण विचित्र आहेत. संसारिक लोक या गोष्टींपासून दूरच राहतात. महादेव त्याच गोष्टी स्वतःजवळ बाळगतात. भगवान शिव एकमेव असे देवता आहेत, जे गळ्यात साप धारण करतात. वास्तवामध्ये साप एक धोकादायक प्राणी आहे, परंतु तो कोणालाही विनाकरण दंश करत नाही. साप परिस्थितिक तंत्राचा महत्त्वपूर्ण जीव आहे. लाईफ मॅनेजमेंट दृष्टीकोनातून पाहिल्यास महादेव गळ्यामध्ये साप धारण करून असा संदेश देतात की, जीवनचक्रात प्रत्येक प्राण्याचे विशेष योगदान आहे. यामुळे कधीही हिंसा करू नये.*

*☘२)"महादेवाच्या हातामध्ये त्रिशूळ का आहे?*
*त्रिशूळ हे भगवान शिवाचे प्रमुख अस्त्र आहे. त्रिशूळाकडे पाहा... तीन तीक्ष्ण टोक दिसतात. तसे पाहिले तर हे अस्त्र संहाराचे प्रतीक आहे. परंतु वास्तवात त्रिशूळामागे फार मोठा गूढ अर्थ दडला आहे. या जगात तीन प्रकारच्या प्रवृत्ती आहेत. सत, रज आणि तम. सत म्हणजे सत्यगुण, रज म्हणजे सांसारिक आणि तम म्हणजे तामसी अर्थात निशाचरी प्रवृत्ती. प्रत्येक माणसात या तीन्ही प्रवृत्ती आढळून येतात. फक्त या प्रवृत्तींचे प्रमाण प्रत्येकात वेगवेगळे असते. त्रिशुळातील तीन टोक या तीन प्रवृत्तींचे प्रतिनिधीत्व करतात. भगवान शिव आपल्याला संदेश देतात की, या तीन्ही गुणांवर आपले नियंत्रण आहे. हा त्रिशूळ तेव्हाच उचला जेव्हा कठीण परिस्थिती असेल. तेव्हा या तीन्ही गुणांचा आवश्यकतेनुसार वापर करा"*

*☘३)"महादेवाला का प्यावे लागले विष?*
*समुद्र मंथनातून निघालेले विष भगवान शिव यांनी आपल्या कंठात धारण केले. विषाच्या प्रभावाने त्यांचा कंठ निळा झाला आणि ते निळकंठ नावाने प्रसिद्ध झाले. समुद्र मंथनाचा अर्थ आहे, विचारांचे मंथन. मनामध्ये असंख्य विचार आणि भावना असतात, त्यांचे मंथन करून चागले विचार आचरणात आणावेत. आपण जेव्हा आपल्या मनाचे मंथन करू तेव्हा सर्वात पहिले वाईट विचार बाहेर पडतील. हेच विष असून हे वाईटाचे प्रतिक आहे. महादेवाने हे आपल्या कंठात धारण केले, त्याचा प्रभाव शरीरावर होऊ दिला नाही. महादेवाचे विष प्राशन आपल्याला असा संदेश देतो की, वाईट गोष्टींचा प्रभाव आपल्यावर न होऊ देणे. वाईट गोष्टींपासून नेहमी दूर राहावे."*

*☘४)"महादेवाचे वाहन नंदी (बैल) का आहे?*
*महादेवाचे आवाहन नंदी आहे. बैल अत्यंत कष्टाळू प्राणी आहे. हा प्राणी शक्तिशाली असूनही अत्यंत शांत आणि भोळा आहे. महादेवसुद्धा परमयोगी, शक्तिशाली आणि परम शांत स्वभावाचे तसेच एवढे भोळे आहेत की यांचे क नाव भोलेनाथ सर्व जगात प्रसिद्ध आहे. महादेवाने ज्याप्रकारे कामदेवाला भस्म करून त्यावर विजय प्राप्त केला होता, त्याचप्रमाणे त्यांचे वाहनसुद्धा कामी नाही. त्याचे काम वासनेवर पूर्ण नियंत्रण राहते. या व्यतिरिक्त नंदीला पुरुषार्थाचे प्रतिक मानले जाते. खूप कष्ट करूनही बैल कधीही थकत नाही. हा प्राणी सतत आपले कर्म करत राहतो. याचा अर्थ आपणही सदैव आपले कर्म करत राहावे. कर्म करत राहिल्यामुळे ज्याप्रमाणे नंदी महादेवाला प्रिय आहे, त्याचप्रकारे आपणही महादेवाची कृपा प्राप्त करू शकतो."*

*☘५)"महादेवाच्या मस्तकावर चंद्र का आहे?*
*महादेव भालचंद्र नावानेसुद्धा प्रसिद्ध आहेत. भालचंद्रचा अर्थ मस्तकावर चंद्र धारण करणारा. चंद्राचा स्वभाव शीतल असतो. चंद्राच्या प्रकाश शीतलता प्रदान करतो. लाईफ मॅनेजमेंट दृष्टीकोनातून महादेव आपल्याला असा संदेश देतात की, आयुष्यात कितीही मोठे संकट आले तरी मन, बुद्धी शांत ठेवून कार्य करावे. बुद्धी शांत असल्यास कोणत्याही समस्येतून सहजपणे मार्ग काढला जाऊ शकतो."*

*☘६)"महादेवाला तीन डोळे का आहेत?*
*धर्म ग्रंथानुसार सर्व देवतांना दोन डोळे आहेत, परंतु महादेवाला तीन डोळे आहेत. तीन डोळे असल्यामुळे यांना त्रिनेत्रधारी असेही म्हणतात. लाईफ मॅनेजमेंट दृष्टीकोनातून पाहिल्यास महादेवाचा तिसरा डोळा प्रतीकात्मक आहे. डोळ्यांचे काम आहे मार्ग दाखवणे आणि रस्त्यामध्ये येणाऱ्या अडचणींपासून सावध करणे. आयुष्यात विविध संकट येत राहतात, जे आपण लवकर ओळखू शकत नाहीत. अशावेळी विवेक आणि धैर्य एका उत्तम मार्दर्शककाप्रमाणे आपल्याला योग्य-अयोग्य गोष्टीमधील फरक सांगतात. हा विवेक प्रेरणारुपात आपल्यामध्ये असतो. फक्त तो जागृत करण्याची आवश्यकता आहे"*

*☘७)"महादेवाचे संपूर्ण शरीरावर भस्म का लावतात?*
*आपल्या धर्मशास्त्रात सर्व देवी-देवता अलंकार, वस्त्र, दागीने यांनी सुसज्जित असे दाखवले गेलेले आहेत. तर, महादेव फक्त मृगचर्म (हरणाचे कातडे) गुंडाळलेले आणि भस्म लावलेले असतात. भस्म महादेवाचे प्रमुख वस्त्र आहे, कारण महादेवाचे संपूर्ण शरीर भस्माने झाकलेले असते. संतांचे सुद्धा भस्म हेच एकमात्र वस्त्र आहे. अघोरी, संन्यासी आणि इतर साधू आपल्या शरीरावर भस्म लावून फिरतात. महादेवाच्या भस्म लावण्यामागे वैज्ञानिक तसेच अध्यात्मिक कारण आहे. भस्माचा एक विशेष गुण आहे. भस्म शरीरातील रोमांचित करणा-या छिद्रांना बंद करते. भस्म शरीरावर लावल्याने गरमीमध्ये गरमी आणि थंडीमध्ये थंडी जाणवत नाही. भस्म त्वचासंबंधी रोगांमध्ये औषधाचे काम करते. भस्म धारण करणारे महादेव हा संदेश देतात की, परिस्थितीनुसार स्वतःला बदलने हा मनुष्याचा सर्वात मोठा गुण आहे."*

*☘८)"शिवलिंगावर भांग, धोत्रा धोतरा का अर्पण करतात?*
*धार्मिक मान्यतेनुसार महादेवाला भांग प्रेमी सांगण्यात आले आहे. शिव चरित्रामध्ये विविध रोचक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, परंतु त्यामध्ये सामावलेल्या असाधारण संदेशांमुळेच महादेव पूजनीय आहेत. यामध्ये विशेषतः विषपान, बिल्वपत्र, धोत्रा यासारख्या कडवट सामग्री प्रिय असणे यामागे एक शिकवण आहे. वास्तविकतेमध्ये सुखासाठी शक्ती संपन्न होण्यासोबतच परोपकार, त्याग आणि संयम या गोष्टींद्वारे वाईट सवयी किंवा परिस्थिती स्वरूपातील कडवटपणा गोडव्यामध्ये बदलण्याची शिकवण आहे. याच कारणामुळे शिवलिंगावर भांग, धोत्रा आणि रूटीचे फुल यासारख्या विषारी गोष्टी विशेष मंत्राचा उच्चार करून अर्पण करणे शुभ मानले गेले आहे. या विशेष मंत्राच्या स्मरणाने अपयश स्वरूपातील दुःख समाप्त होऊन सुख आणि यश प्राप्त होईल."*

*☘९)"महादेवाला बेलाचे पान का अर्पण करतात?*
*विविध ग्रंथांमध्ये महादेवाला बेलाचे पान अर्पण करण्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. तीन पान असलेले एक बिल्वपत्राचा लाईफ मॅनेजमेंट दृष्टीकोनातून विचार केल्यास, बिल्वपत्राचे तीन पानं चार पुरुषार्थामध्ये तिघांचे प्रतिक आहे - धर्म, अर्थ व काम. हे तिन्ही निस्वार्थ भावनेने महादेवाला समर्पित करणाऱ्या व्यक्तीला चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष प्राप्त होतो."*

*☘१०)"भगवान शिव यांना स्मशानाचे निवासी का मानले जाते?*
*महादेवाला संपूर्ण कुटुंब असलेले देवता मानले जाते, परंतु तीरीही ते स्मशानात निवास करतात. भगवान शिव संसारिक असूनही ते स्मशानात निवास करतात यामागे लाईफ मॅनेजमेंटचे एक गूढ सूत्र दडलेले आहे. हा संसार मोह-मायेचा प्रतिक असून स्मशान वैराग्याचे. महादेव सांगतात की, या संसारात राहून आपले कर्तव्य पूर्ण करावेत, परंतु मोहमायेपासून दूर राहावे. कारण हा संसार नश्वर आहे. कधी न कधी हे सर्व नष्ट होणार आहे. यामुळे संसारात राहून कोणताही मोह न बाळगता आपले कर्तव्य पूर्ण करत वैरागीप्रमाणे आचरण करावे.*

*☘११)"भूत-प्रेत महादेवाचे गण का आहेत?*
*महादेवाला संहाराची देवता मानण्यात आले आहे. म्हणजेच, जेव्हा मनुष्य आपल्या सर्व मर्यादा तोडू लागतो तेव्हा महादेव त्याचा संहार करतात. ज्या लोकांना आपल्या पाप कर्माचे फळ भोगावे लागते तेच प्रेतयोनी प्राप्त करतात. या सर्वांना महादेव दंडित करतात, कारण शिव संहार देवता आहेत. या कारणामुळे यांना भूत-प्रेतांचा देवता मानले जाते. वास्तवामध्ये जे भूत-प्रेत आहेत ते केवळ एक सूक्ष्म शरीराचे प्रतिक आहेत. महादेवाचा यामागे असा संदेश आहे की, प्रत्येक प्रकारचा जीव ज्याची सर्वजण घृणा करत किंवा त्याला घाबरतात तोसुद्धा महादेवाजवळ पोहोचू शकतो, अट केवळ एवढीच आहे की त्याने स्वतःचे सर्वस्व महादेवाला समर्पित करावे."*

*संकलन :- सतीश अलोनी*
☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘



🔯 *आध्यात्मिक भोजन कसे करावे*🔯

🔯आपण जे भोजन करतो, ते आपणव स्वतः ग्रहण करत नाही. ते आपल्या देहात स्थित असलेल्या परमात्म्याला आपण अर्पण करतो. त्यामुळे समस्त सृष्टि तृप्त होती.*

🔯भोजन याच भावनेने भोजन मंत्र बोलून परमात्म्यास अर्पण करुन मगच भोजन करावे.*

🔯देहाचे दोन हात, दोन पाय आणि मुख ही पाच अंगे धुवूनच मग भोजन करावे.*

 🔯हातपाय धुतल्याने आयष्य वाढते. चांगले आरोग्य लाभते.*

 🔯सकाळी आणि सायंकाळी भोजन करण्याचा नियम आहे.*

🔯पूर्व किंवा उत्तर दिशेला मुख करुन भोजन करावे.*

🔯दक्षिण दिशेला मुख करुन भोजन केल्यास ते भोजन प्रेतास प्राप्त होते.*

🔯पश्चिम दिशेला मुख करुन भोजन केल्यास त्यामुळे रोगाची वृद्धि होते.*

🔯शैय्या, अंथरूण, बेडवर, हाथावर, जुने पुराने ताट भांडयामध्ये भोजन करु नये.*

🔯कलह, भांडणाच्या वातावरणात, पिंपळाच्या, वडाच्या झाडाखाली भोजन करु नये, तसेच लघवीला जोरात आली असेल तर भोजन करु नये.*

🔯वाढलेल्या भोजनाची कधीही निंदा करु नका, भोजना अगोदर अन्नपूर्णा मातेची स्तुति करा व सर्व भूकेल्याना भोजन प्राप्त होवो अशी देवाकडे प्रार्थना करा व मग भोजन करा.*

🔯स्वैयपाक तयार करणाऱ्याने अगोदर स्नान करावे व शुध्द मनाने, नामस्मरण करत भोजन बनवावे आणि सर्वात पहिल्यांदा तीन पोळ्या बाजूला काढाव्यात १.गायीला २.कुत्र्याला ३.कावळ्याला नैवेद्य ठेवून मग घरातील देवास व अग्निदेवास नैवेद्य दाखवून घरातील सर्वानी भोजन करावे.*

🔯इर्षा, भय, क्रोध, लोभ, रोग, दीन भाव, द्वेष भावाने केलेले भोजन कधी पचत नाही. हे लक्षात ठेवा.*

🔯अर्धे भोजन सोडून उठल्यास परत भोजन करु नका. भोजन करताना मौन पाळा. भोजन चावून चावून खावा. रात्री पोटभर, तटस्थ जाई पर्यत खावू नका.*

🔯साधारण ३२ वेळा घास चावून खावेत.*

🔯भोजन करताना अगोदर कडू घास खा, नंतर खारट आणि तिखट, आंबट खा आणि शेवटी गोड खात जा. तसेच पहिले रसाळ, त्याच्यामध्ये जड पदार्थ त्यानंतर द्रव पदार्थ ताक वगैरे घ्यावे.*

🔯थोडे थोडे खाणार्यास आरोग्य, आयु, बल, सुख, सुन्दर संतान आणि सौंदर्य प्राप्त होते.*

🔯ज्याने प्रसिद्धीसाठी, जाहिरात करुन अन्नदान करत असेल तेथे कधीही भोजन करु नये. तसेच तामसिक भोजन करु नये.*

🔯कुत्र्याने स्पर्श केलेले, रजस्वला स्त्रीच्या हातचे भोजन करु नये. श्राध्दाचे भोजन, तोंडाने फुकलेले भोजन, अपमान, अनादर युक्त, अवहेलना करुन दिलेले  भोजन कधीही करु नये.*

🔯अध्यात्मात मांसाहार ग्राह्य नाही, म्हणून आध्यात्मिक मनुष्याने मांसाहार करु नये. त्यामुळे सेवेत आळस, त्या जीवाचे संचित दोष आपल्या मागे लागतात. ते दिसत नाही कारण ते दोष फार सुक्ष्म असतात. आध्यात्मिक माणसाने कधीही खाली मुंडी पाताळ धुंडी वागू नये व माळ वरती करुन दारु, भोजन करु नये.
   *!!शिवयोगीनी संतृप्ते तृप्तो भवती शंकरः!!*
*!!ततृप्तया तन्मयम् विश्वम् तृप्तमेती चराचरम् !!*
भः शिवयोगीनी म्हणजे जंगम जंगम तृप्त झाला की साक्षात शिव तृप्त होतो.शिव तृप्त झाला की संपूर्ण चराचर विश्व तृप्त होतो.असे *जगद्गुरु शिवयोगी शिवाचार्य वीरशैव धर्म ग्रंथ* सिध्दान्तशिखामणीत सांगतात.
ही पोस्ट कुणाला *आवडली नसेल तर त्यावर आपले मत व्यक्त करू नये तो आमच्या श्रध्देचा भाग आहे फालतू चर्चा नको अनुभुतीचा भाग आहे*



Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/DNelXpgGyKs7f0rXFxa0eV

🙏श्री गुरुदेव दत्त🙏                                                 *🙏काही प्रभावी तोड़गे🙏* 
        1)दररोज घरात
 श्री सूक्त पठन केले असता, त्या घरात धन-धान्याची कमतरता पड़त नाही.

 2)लाल रंगाच्या रिबिनमधे तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेश द्वारावर बांधल्यास घरात सुखशांति व धनाची वाढ होते.

3)प्रत्येक गुरुवारी तूळशीस दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो.

4)फ़क्त शनिवारी च पींपळ वृक्षाला स्पर्श करुण नमस्कार करुण दिवा लावावा व धनलाभ होण्यासाठी प्रार्थना करावी.

5) रविपुष्य् नक्षत्रावर काढ़लेली वेताची मुळी वादविवादात(न्यायालयात यश प्राप्त करुण देते.

6) घर परिवारात सुख-शांति साठी तथा समृद्धिसाठी प्रत्येक दिवशी भाकरीचे/पोळीचे चार समभाग करुण एक भाग-गाई ला, एक भाग-काळ्या कुत्र्याला, एक भाग-कावळ्या ला, एक भाग- घराच्या वरच्या बाजूस ठेवावा.

7) प्रत्येक दिवशी गरम तव्यावर (सुरवातीस) दुधाचा शिडकावा करावा,घरामधे रोगाचे प्रमाण कमी होते.

8) ज्या घरात स्त्रीया वारंवार आजारी असतात,त्या घरा समोर तुलसी चे रोप लावावे व त्याची काळजी घ्यावी, रोग नाहीसे होतात.

9) कर्ज मुक्तिसाठी,मोठ्या कर्जातुन मुक्त  होण्या साठी मंगळवारी शिव मंदिरात जाऊन मूठभर मसुराची डाळ वाहुन खालील म्हणावा, मंत्र- ।।ॐ ऋणमुक्तिश्वराय नमः।। या उपायाने कर्ज बाधा नाहीशी होते.

 10) मंगलवारी गहू च्या पिठात थोड़ा गुळ मिसळून त्याच्या छोट्या गोळ्या तयार करुण 40 दिवस तलावातील माश्यांना खाऊ घालाव्या कर्जमुक्ति लवकर च होते.                     🙏(प.पु.गुरुवर्य गुरुमाऊलींच्या अमृतमय ज्ञानगंगेतुन)                                       ।।गुरुमाऊली।।।                                                     🌹🙏🌹🙏🌹🙏🌹                                    ।।ॐ शक्ति पराशक्ति।।


🥏🥏🥏🥏🥏🥏🥏🥏🥏🥏🥏
*९६ कुळी मराठ्यांनी आप आपले देवक, कुळ आणि गोत्र जाणून घ्या.*

*1. गोत्र - आपला मुळ पुरुष म्हणजेच गोत्र. यांची संख्या ८ आहे. विश्वामित्र, जमदग्नी, भारद्वाज, गौतम, अत्रि, वशिष्ट, कश्यप आणि अगस्ती.*

*2. देवक -*
*ज्याच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करते ते देवक असते. वृक्ष, पर्ण, फुल, वेल, साळुंकी किंवा मोराचे पिस, शस्त्र, इत्यादी.*

*3. {वंश -क्षात्र समाजात 4 वंश आहेत.}*
*1. सुर्यवंश. 2 चंद्रवंशी .3 ब्रह्मावंशी. 4 नागवंशी.*

*यापैकी ज्या कुळांनी एकत्रित येवून आपला समूह निर्माण केला ती कुळे ९६ आहेत. या ९६ कुळानुसार त्याची विभागणी झाली आहे. [क्र. आडनांव, (Surname), वंश, गोत्र, देवक त्यानुसार वाचा]*

*१. अहिरराव Ahirrao सुर्य... भारद्वाज,  पंचपल्लव.*
 *२. आंग्रे Angre चंद्र.. गार्ग्य .. पंचपल्लव.*
 *३. आंगणे Angane चंद्र, दुर्वास, कळंब, केतकी,  हळद ,सोने.*
 *४. इंगळे Ingale चंद्र भारद्वाज, देव कमळ, साळूंखी पंख.*
 *५. कदम Kadam सुर्य भारद्वाज, कळंब, केतकी हळद... सोने.*
 *६. काळे Kale सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद, सोन, साळूंखी पंख.*
 *७. काकदे Kakade सुर्य कौंडिण्य कळंब, रुई, मोरवेल, सुर्यफूल.*
 *८. कोकाटे Kokate सुर्य काश्यप कळंब, हळद, सोने, रुई, वासनवेलस.*
 *९. खंडागळे Khandagale सुर्य , वसिष्ठ कळंब, सुर्यफूल.*
 *१०. खडतरे Khadtare चंद्र लोमेश पंचपल्लव.*
 *११. खैरे Khaire चंद्र मार्कंडेय पंचपल्लव.*
 *१२. गव्हाणे Gavane चंद्र कौशीक पंचपल्लव, साळूंखी पंख.*
 *१३. गुजर Gujar सुर्य शौनक पंचपल्लव.*
 *१४. गायकवाड Gaikawad चंद्र, गौतम पंचपल्लव, सुर्यफूल.*
 *१५. घाटगे Ghatge सुर्य कश्यप, साळुंखीपंख, पंचपल्लव.*
 *१६. चव्हाण Chavan सुर्य कश्यप, कळंब, वासुंदीवेल, हळद, सोने, रुई.*
 *१७. चालुक्य Chalukya च.स भारद्वाज, मांडव्य, उंबर, शंख.*
 *१८. जगताप Jagatap चंद्र, मांडव्य, पंचपल्लव, उंबर,वड, पिंपळ.*
 *१९. जगदाळे Jagdale चंद्र, कपिल, पंचपल्लव, धारेची तलवार.*
 *२०. जगधने Jagdhane चंद्र, कपिल, पंचपल्लव.*
 *२१. जाधव (यादव) Jadhav (Yadav) चंद्र कौंडिण्य,अत्रि, कळंब,पंचपल्लव, उंबर, पानकणीस, आंबा.*
 *२२. ठाकुर Thakur सुर्य कौशिक, पंचपल्लव.*
 *२३. ढमाले Dhamale सुर्य शौनल्य पंचपल्लव.*
 *२४. ढमढरे Dhamdhere सुर्य काश्यप कळंब.*
 *२५. ढवळे Dhavale चंद्र भारद्वाज, उंबर, शंख, धारेची तलवार.*
 *२६. ढेकळे Dhekale चंद्र वत्स कळंब, पिंपळ, उंबर.*
 *२७. ढोणे Dhone सुर्य भारद्वाज, कळंब, केतकी,हळद, सोने.*
 *२८. तायडे(तावडे) Tayade (Tawade) सुर्य, विश्वामित्र, कळंब, हळद, ताडपल्लव.*
 *२९. तावरे / तोवर Tovar सुर्य गार्ग्य उंबर.*
 *३०. तेजे Teje सुर्य कौंडिण्य कळंब, मोरवेल, रुई.*
 *३१. थोरात Thorat सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद, सोने, पिंपळ.*
 *३२. थोटे (थिटे) Thote सुर्य वसिष्ठ कळंब, सुर्यफूल.*
 *३३. दरबारे Darbare चंद्र कौशीक पंचपल्लव.*
 *३४. दळवी Dalavi सुर्य वसिष्ठ कळंब, पंचपल्लव.*
 *३५. दाभाडे Dabhade सुर्य शौनल्य कळंब.*
 *३६. धर्मराज Dharmaraj सुर्य विश्वामित्र, पंचपल्लव.*
 *३७. देवकाते Devkate चंद्र कौशीक पंचपल्लव.*
 *३८. धायबर Dhaybar चंद्र भारद्वाज उंबर, शंख.*
 *३९. धुमाळ Dhumal चंद्र दुर्वास हळद, आपट्याचे पान.*
 *४०. नलावडे Nalavade चंद्र वसिष्ठ, दुर्वास नागवेल.*
 *४१. नालिंबरे Nilabare चंद्र भारद्वाज उंबर, शंख.*
 *४२. निकम Nikam सुर्य पराशर, मान्यव्य कळंब, उंबर, वेळू.*
 *४३. निसाळ Nisal सुर्य वाजपेयी पंचपल्लव.*
 *४४. पवार (परमार) Pawar (Parmar) सुर्य वसिष्ठ, कळंब, धारेची तलवार.*
 *४५. प्रतिहार Pratihar सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद, सोने.*
 *४६. पानसरे Pansare चंद्र कश्यप कळंब.*
 *४७. पांढरे Pandhare चंद्र लोमेश पंचपल्लव.*
 *४८. पठारे Pathare सुर्य काश्यप कळंब, केतकी, हळद, सोने,वासुंदीवेल.*
 *४९. पालवे Palve सुर्य भारद्वाज कळंब.*
 *५०. पलांढ Palandh सुर्य शौनल्य कळंब, पंचपल्लव.*
 *५१. पिंगळे Pingale चंद्र भारद्वाज उंबर, शंख.*
 *५२. पिसाळ Pisal सुर्य कौशीक पंचपल्लव, वड.*
 *५३. फडतरे Fadatare चंद्र याज्ञवल्क्य पंचपल्लव, साळूंखी पंख.*
 *५४. फाळ्के Phalke चंद्र कौशीक पंचपल्लव.*
 *५५. फाकडे Fakade सुर्य विश्वामित्र पंचपल्लव.*
 *५६. फाटक Phatak चंद्र भारद्वाज कमळ.*
 *५७. बागल Bagal सुर्य शौनक कळंब,पंचपल्लव.*
 *५८. बागवर Bagvar चंद्र भारद्वाज उंबर्,शंख.*
 *५९. बांडे Bande सुर्य भारद्वाज कळंब, केतकी,हळद, सोने.*
 *६०. बाबर Babar सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद, सोने, साळूंखी पंख.*
 *६१. भागवत Bhagawat सुर्य काश्यप कळंब.*
 *६२. भोसले Bhosale सुर्य कौशीक पंचपल्लव.*
 *६३. भोवारे Bhovare चंद्र कौशीक पंचपल्लव.*
 *६४. भोगले (भोगते) Bhogale (Bhogate) सुर्य कौशीक पंचपल्लव.*
 *६५. भोईटे Bhoite सुर्य शौनक पंचपल्लव.*
 *६६. मधुरे Madhure सुर्य विष्णूवृद्ध, पंचपल्लव, सुर्यफूल.*
 *६७. मालपे Malpe चंद्र भारद्वाज.*
*६८. माने Mane चंद्र गार्ग्य शंख, गरुड पंख.*
 *६९. मालुसरे Malusare सुर्य काश्यप कळंब.*
 *७०. महाडीक Mahadik सुर्य माल्यवंत कळंब, पिंपळ.*
 *७१. म्हांबरे Mhambare चंद्र अगस्ति कळंब, शमी.*
 *७२. मुळीक Mulik सुर्य गौतम पंचपल्लव, सुर्यफूल.*
 *७३. मोरे(मोर्य) More (Morya) चंद्र भारद्वाज मयुर पंख, ३६० दीवे.*
 *७४. मोहीते Mohite चंद्र गार्ग्य कळंब, कळंबगादी, वासणीचा वेल.*
 *७५. राठोड Rathod सुर्य काश्यप सुर्यकांत.*
 *७६. राष्ट्रकुट Rashtrakut सुर्य कौशीक पंचपल्लव.*
 *७७. राणे Rane सुर्य जमदग्नी वड, सुर्यकांत.*
 *७८. राऊत Raut सुर्य जामदग्नी वड, सुर्यकांत, सुर्यफूल.*
 *७९. रेणुस Renuse चंद्र विश्वामित्र पंचपल्लव.*
 *८०. लाड Lad चंद्र वसिष्ठ वासुंदीवेल.*
 *८१. वाघ Wagh सुर्य वत्स, विश्वावसु कळंब, हळद, निकुंभ.*
 *८२. विचारे Vichare सुर्य शौनक पंचपल्लव.*
 *८३. शेलार Shelar सुर्य भारद्वाज, विश्वामित्र, कळंब,पंचपल्लव, कमळ.*
*८४. शंखपाळ Shankhpal चंद्र गार्ग्य शंख.*
 *८५. शिंदे Shinde सुर्य कौंडिण्य कळंब,रुई,मृत्ति केचावेल भोरवेल.*
 *८६. शितोळे Shitole सुर्य काश्यप वड, सुर्यकांत.*
 *८७. शिर्के Shirke चंद्र शांडील्य कळंब, आपट्याचे पान.*
 *८८. साळ्वे Salve सुर्य कौंडिण्य कळंब, रुई, मोरवेल.*
 *८९. सावंत Sawant चंद्र दुर्वास कमळ, कळंब, साळूंखी पंख.*
 *९०. साळुंखे Salunkhe सुर्य भारद्वाज पंचपल्लव, साळूंखी पंख.*
 *९१. सांबरे Sambare सुर्य मान्यव्य कळंब, हळद.*
 *९२. सिसोदे Sisode सुर्य कौशीक पंचपल्लव.*
 *९३. सुर्वे Surve सुर्य वसिष्ठ पंचपल्लव.*
 *९४. हंडे Hande सुर्य विष्णूवृद्ध पंचपल्लव, सुर्यफूल.*
 *९५. हरफळे Harphale चंद्र कौशीक पंचपल्लव.*
 *९६. क्षिरसागर Kshirsagar सुर्य वसिष्ठ कळंब.*
🥏🥏🥏🥏🥏🥏🥏🥏🥏🥏🥏


*🏵!!आयुर्वेदीक भिमसेनी कापूर!!🏵*
♨🌼♨🌼♨🌼♨🌼♨🌼

🚩👉♨हा कापूर कुठल्याही विशिष्ठ आकारात येत नाही. स्फटीकासारखा येतो , ह्याचे गोल, चौकोनी वडीत रुपांतर करता येत नाही कारण नेहमीच्या कापराप्रमाणे ह्यात मेण नसते.

♨👉सर्दी, खोकल्याकरीता एका पातेल्यात गरम पाणी करून मग त्यामध्ये हा कापूर चुरडून टाकावा व वाफारे घ्यावेत. नाकाला, कपाळाला, छातीला ही कापूर लावावा. लहान मुलांनाही लावला तरी चालेल.
♨👉 रूमालावर कापूर चुरडून तो हूंगावा किंवा एखाद्या लहानशा डबीत घेऊन सोबत ठेवावा. व्हीक्सची सवय टाळा.

♨👉पर्यटनाच्या वेळी बर्फाळ स्थानात किंवा उंचावर चढताना श्वास लागत असल्यास कापुर हुंगावा.

♨👉 तीळाच्या तेलातून तो सांध्यांना लावावा. तीळाच्या तेलाचा वास उग्र असल्यामुळे हे कापूरमिश्रीत तेल लावल्यावर कपड्यांना वास येतो त्यामुळे त्याची योग्यतोपरी काळजी घ्यावी .

♨👉केसातील कोंड्याकरीता : -
सतत सर्दी होत असेल तर त्यांनी तीळाच्या तेलात मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावे.
नाहीतर खोबरेल तेलात हा कापूर मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावे. शक्यतो शनीवारी किंवा रविवारी हा प्रयोग केल्यास उत्तम म्हणजे दुसरे दिवशी न्हाऊन तुम्ही कामावर जायला मोकळे

♨👉 नेहमीच्या कापरात मेण असते,
पण यात मेण नसते.
 त्यामुळे हा कापूर शूद्ध असल्यामुळे त्याचा वापर धार्मिक कार्यांत करावा. आरती करताना, गंध उगाळताना त्यात टाकावे, देवाला वीडा देताना कापूरमिश्रीत वीडा देतात तो हाच कापूर, दक्षिण भारतात तीर्थांत वेलची आणि भीमसेन कापूर वापरतात,
श्री बालाजी देवस्थान मधल्या सुप्रसिद्ध लाडवातही ह्याचा उपयोग केला जातो.

♨👉दाढदुखी करीता छोटासा खडा किडलेल्या दातात ठेवावा तो आपोआप विरघळतो व  लाळ पोटात गेल्यास काही अपाय होत नाही.

♨👉खोकल्याकरीता आयुर्वेदीक कंपनी ह्याच कापराचा उपयोग करतात.
 शेवटी हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे, ज्याचा त्याचा अनुभव व प्रारब्ध वेगवेगळे असते.
*संध्याकाळी ह्या कापराचे दोन लहान लहान तुकडे हातामध्ये घेऊन घराची दृष्ट काढावी व घराबाहेर जुन्या पणतीत किंवा एखाद्या जुन्या भांड्यात हा कापूर जाळावा, प्रयोग करायला हरकत नाही, पूर्वी दृष्ट काढयचो तशी दृष्टच काढीत आहोत वास्तूची आपण, कदाचीत योगायोगाने आपले काम होईलही,*

*🚩🏵‼कापराचे इतर ही काही उपयोग‼🏵*

♨👉१ प्रवासी बॅग / कपडे साठवण्याची बॅग मध्ये कपूर ठेवला तर कुबट वास किंवा ठेवणी चा वास न येता एक छान सुगंध येतो कपड्यांना कसर ,झुरळ लागत नाही
पावसाळ्यात विशेषतः कपडे चांगले सुकत नाहीत ओलसर राहतात मग असे कपडे बॅग मध्ये भरले की त्यांना कुबट वास येतो तो कापूर ठेवल्या जातो.

♨👉२ डास चावू नयेत म्हणून रात्री आपल्या सभोवती ठेवा डास फिरकत नाहीत च शिवाय इतर कीटक , उंदीर वगैरे लांब राहतात

♨👉३ कधी शेकोटी किंवा चूल पेटविणे जर त्रासदायक असेल तर काही कापराच्या वड्या ते काम सोपे करतात

♨👉४ रुमालात काही कापुराचे खडे रबर किंवा दोऱ्याने बांधून ठेवलेत तर रुमालाला सुगंध येतोच पण तो कापूर हुंगायला पण सोपे पडते. आणि चुकून रुमाल धुवायला गेला तरी हरकत नाही डाग नाही पडत आणि साबणाने तो विरघळत पण नाही

♨👉५ गुड नाईट किंवा इतर मॅट जाळायच्या यंत्रात गुडनाईट वडी किंवा लीक्वीड ऐवजी त्या वर कापूर ठेऊन चालू करा तो कापूर विरघळून हवेत सुगंध पसरेलच पण डास पण पळून जातील आणि गुड नाईट पेक्षा जास्त सुरक्षित

♨👉६ कापूर पायमोज्यात घालून ठेवा त्याचा कुबट वास आणि त्या मुळे पायाला येणारा कुबट वास नाहीसा होईल आणि शिवाय मोज्या मुळे जी खाज पायाला सुटते ती नाहीशी होईल

*♨कापूर पवित्र का मानला जातो.?♨*
🔆🌼🔆🌼🔆🌼🔆🌼🔆🌼
*🚩🔔जाणुन घ्या धार्मिक कारण*

🚩👉♨शास्त्रानुसार देवी- देवतांनसमोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमितपणे कापूर जाळला जातो, तेथे पितृदोष किंवा इतर प्रकारच्या दोषाचा प्रभाव रहात नाही.
♨कापूर लावल्याने घरातील वातावरण पवित्र आणि सुगंधित होते. अशा पवित्र वातावरणात देवता लवकर प्रसन्न होतात. कापराच्या प्रभावाने घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्या सुगंधाने आपल्या विचारातही सकारात्मकता येते.

*♨कापराचे वैज्ञानिक महत्त्व♨*
🔆🌼🔆🌼🔆🌼🔆🌼🔆🌼
🚩♨👉वैज्ञानिक संशोधनामुळे सिद्ध झाले आहे की,
*🌼‼कापराच्या सुगंधाने जीवाणू , विषाणू , लहान किटक नष्ट होउन वातावरण शुद्ध राहते व आजार दूर रहातात.‼🌼*

*🚩♨‼🌼कापूराचे अजून काही फायदे🌼‼♨*

🚩♨१) सर्दि-पडस व्हायची लक्षणे आसताना एका रूमालात ३-४ कापूर एकत्र करून त्याचा वास घेतल्याने सर्दि-पडसे होत नाही.
🚩♨२) कापूराचा सुगंध व्यवस्थित श्वासावाटे आत घेतल्याने तोंडाला घाण वास येत असल्यास निघून जातो.
🚩♨३) कपूराच्या वासाने आपल्या मेंदूतील लेकवस् नामक रसायन अधिक सक्रीय होते. याचा उपयोग आपल्याला निर्णयक्षमतेत होतो.
🚩♨४) कापूराचा रोज ३ वेळा सुवास घेतल्याने आपल्या नाकाची वास ओळखायची क्षमता वाढते.
🚩♨५) घरात कापूर रोज लावल्यावे अॉक्सिजन ९-११% टक्के ईतका वाढतो.
🚩♨६) मुठभर कापूर तव्यावर ४० सेकंद तापवून ते एका रूमालात बांधून त्याचा शेक गळ्याला दिल्यास , घसा बसला असेल तर बरा होतो. तसेच हा शेक भुवयांच्या वर दिल्याने चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते.
🚩♨७) मुठभर कापूर + दालचीनी + लसूण एकत्र एका सुती कपड्यात बांधून गाडीच्या बोनेट च्या आत ही पूडी ठेवल्याने काही वेळ तरी उंदीर व घूशी येत नाहीत.
*🚩♨८) पण कापूर हा उगाच अति जाळू नये. कारण अति धूराने डोळे झोंबतात आणि त्याचा वाईट परीणामा बुबुळाच्या पाठील टिशूस् वर होतो.*
🚩♨९) गरम पाण्यात मीठ व बराच कापूर टाकून त्यात पाय बुडवून ठेवल्याने पाय दुखणे कमी होते व फुगलेल्या शीरा खाली बसतात. *(५०शी ओलांडलेल्यांना अधिक उपयोगी)*
कापूराच्या सुगंधाने मनात एक नवचैतन्य निर्माण होते.

*♨‼आपल्या घरात नियमीतपणे कापुर वापरा व उत्साहित रहा‼♨*
                *♨कॉपी पेस्ट पोस्ट♨*
🔆🌼🔆🌼🔆🌼🔆🌼🔆🌼
*🏵🔔‼रामकृष्णहरि ‼🔔🏵*







No comments:

Post a Comment