कृती संशोधन
जिल्हा परिषद उच्य प्राथमिक शाळा शिलोंडे येथील इयत्ता ३ री च्या
विद्यार्थ्यांना परिसर अभ्यासातील नकाशा वाचनात येणा-या
समस्यांचा अभ्यास करुन उपायांची
परिणामकता अभ्यासणे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
शालेय व्यवस्थाDपन पदविका अभ्यासक्रम
कृती संशोधन अहवाल
बी.पी.सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी
संशोधक
श्री.अमोल बाबासाहेब धायगुडे
एम.ए.,डी.एड
PRN NO.
मार्गदर्शक
प्रा. गुंड दिपक प्रकाशराव
एम. ए., एम. एड.,एम. फील.
अभ्यासकेंद्र
बी.पी.सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी
(६५०४ A)
ता.बार्शी, जि. सोलापुर
सन २०१६ -१७
प्रतिज्ञापञ
मी असे जाहीर करतो की, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक शिक्षणशास्ञ विद्याशाखेतील व्यवस्थापन पदविका शिक्षणासाठी “जिल्हा परिषद उच्य प्राथमिक शाळा शिलोंडे येथील इयत्ता ३ रीच्या विद्यार्थ्यांना परिसर अभ्यास विषयातील नकाशा वाचनात येणा-या समस्यांचा अभ्यास करुन उपायांची परिणामकता अभ्यासणे.” या विषयावरिल कृतीसंशोधन प्रकल्प अहवाल मी प्राचार्य श्री.गुंड दिपक प्रकाशराव यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केलेला असून सदर प्रकल्प अहवालामध्ये दिलेली माहिती मी स्वतः केलेली कृती ,वाचन, मनन, चर्चा आणि प्रत्यक्ष भेटीमधून संकलीत केलेली आहे.प्रकल्प अहवाल तयार करताना योग्य त्या संदर्भ स्ञोतांचा त्या ठिकाणी उचित नामनिर्देश केलेला आहे.
कायम नोंदणी क्रमांकः-
स्थळः- बार्शी
दिनांकः-
अध्ययनार्थी स्वाक्षरी
श्री.अमोल बाबासाहेब धायगुडे
मार्गदर्शक तज्ञांचे प्रमाणपञ
प्रमाणित करण्यात येते की , श्री.अमोल बाबासाहेब धायगुडे यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक शिक्षणशास्ञ विद्याशाखेत शालेय व्यवस्थापन पदविका या शिक्षणक्रमांतर्गत “जिल्हा परिषद उच्य प्राथमिक शाळा शिलोंडे येथील इयत्ता ३ रीच्या विद्यार्थ्यांना परिसर अभ्यास विषयातील नकाशा वाचनात येणा-या समस्यांचा अभ्यास करुन उपायांची परिणामकता अभ्यासणे.” या विषयावरिल प्रकल्प माझ्या मार्गदर्शनाखाली पुर्ण केलेला असून सदर प्रकल्प अहवालामध्ये आवश्यक ती माहिती संकलित केलेली असून , सदर प्रकल्प अहवालाचा आशय तांञिकदृष्ट्या परिपुर्ण आहे. प्रकल्प अहवाल तयार करताना सर्व संदर्भस्ञोतांचा योग्य निर्देश अहवालात करण्यात आलेला आहे.
स्थळः- बार्शी
दिनांकः-
मार्गदर्शक तज्ज्ञांची स्वाक्षरी
प्रा. गुंड दिपक प्रकाश
ऋणनिर्देश
कोणतेही कार्य व्यवस्थीत दर्जेदार गुणवत्तापुर्वक आणि वेळेत पुर्ण करण्यासाठी संशोधकाला अनेक व्यक्तीचे मार्गदर्शन , सहकार्य घ्यावे लागते.जीवनात कोण्त्याही क्षेञात यश संपादन करण्यासाठी उत्कंठा, इच्छा , प्रमाणिक प्रयत्न व योग्य मार्गदर्शन या चार गोष्टींची आवश्यकता असते. कृतीसंशोधन प्रकल्प पुर्ण करण्यासाठी ज्या अनेक व्यक्तींचे बहुमोल मार्गदर्शन लाभले त्या सर्वांचे ऋण व्यक्त करणे हे संशोधक आपले कर्तव्य समजतो.सदरचे कृती संशोधन करण्यासाठी अभ्यासक्रमात समावेश केला त्यामुळे संशोधकाला संशोधनासाठी ऊर्जा मिळाली त्याबद्दल मुक्त विद्यापीठाचे आभार.
संशोधकाला वेळोवेळी तात्काळ व मौलिक मार्गदर्शन करणारे व आपल्या सहजसाध्य विनोदी शैलीमुळे मनावरील ताण कमी करुन कार्याची सतत प्रेरणा देणारे प्राचार्य दिपक गुंड यांचे ऋण व्यक्त करणे संशोधक आपले कर्तव्य समजतो.
तसेच संशोधकाने सदर कृतिसंशोधन ज्या शाळेत राबविले त्या शाळेचे मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक वृंद आणि इयत्ता ३ री मधील विद्यार्थी यांनी संशोधन कार्य पूर्ण करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे मनःपुर्वक अभार व्यक्त करणे हे संशोधक आपले कर्तव्य समजते. तसेच संगणीकृत टायपिंग वेळेत करुन दिल्याबद्दल श्री.नितिन बाजीराव समुद्रे यांचा ही मी आभारी आहे.
संशोधक
श्री.अमोल बाबासाहेब धायगुडे
अनुक्रमणिका
मुखपृष्ठ I
अध्ययनार्थीचे निवेदन II
मार्गदर्शकाचे प्रमाणपञ III
ऋणनिर्देश IV
नुक्रमणिका V
प्रकरण पहिले
प्रस्तावना
१.१ प्रस्तावना
पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्याकडून इतर विषयाइतके परिसर अभ्यास विषयाला प्राधान्य दिले जात नाही. शाळेच्या वेळापञकातही या विषयाला गाळलेल्या जागा भरा असेच स्वरुप असते. इतर विषयाला जादा वेळ दिल्याने नकाशा वाचनाचा प्रश्न उपेक्षित राहिला. नकाशावाचन आल्याशिवाय परिसर अभ्यास विषयाचे व्यापक स्वरुप लक्षात येत नाही. आजच्या प्रगत युगात आपण क्षणात मोबाईलव्दारे आपल्या जपानमधील मिञाबरोबर संवाद साधतो.पण जपान देश पृथ्वीवर नेमका कोठे आहे किती दूर आहे यांचा आपण विचार करावयाचे ठरवले तर नकाशावाचन येणे महत्वाचे ठरते.
परिसर अभ्यास विषयाचे प्राकृतीक परिसर अभ्यास, प्रादेशिक परिसर अभ्यास, प्रात्यक्षिक परिसर अभ्यास व सामान्य परिसर अभ्यास असे भाग आहेत. परिसर अभ्यास च्या अभ्यासाची संकल्पना मानवी जीवनाचा दर्जा उंचवण्यासाठी, भौगोलिक परिस्थीचा उपयोग करण्यासाठी व ती सुधारण्यासाठी वापरली जाते.परिसर अभ्यासाच्या अभ्यासाव्दारे मानव व निसर्ग यांच्या परस्पर संबंधाची जाणीव होते. मानवाला आपले जीवन सुखी व समृध्द आणि सुरक्षित करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या परिसर अभ्यास समजून घ्यावा लागतो.
१.२ संशोधनाची गरज
विद्यार्थींना परिसर अभ्यास विषयाच्या अध्ययनामध्ये कोणत्या अडचणी येतात, कोणत्या समस्या येतात, ते कोठे कमी पडतात, कोणती गोष्ट त्यांना कळत नाही, अवघड वाटते जमत नाही हे जाणून जर त्यावर उपाययोजना केली तर परिसर अभ्यास चा सर्वांगीण अभ्यास होण्यास मदत होते. त्यातूनच मग विद्यार्थींच्या परिसर अभ्यासातील नकाशा वाचनात येणा-या अडचणी, समस्या व त्यांची कारणे शोधून उपाययोजना करण्याची गरज आवश्यकता संशोधकाला वाटली.
१.३ संशोधनाचे महत्व
प्रस्तुत नकाशावचनातील समश्यांमुळे मुले परिसर अभ्यासाच्या विषयात अभ्यासात मागे राहतात. त्यांना परिसर अभ्यास विषय अवघड वाटू लागतो पण या समस्या सोडवण्यासाठी जर उपाययोजना करुन राबवल्या तर नकाशावाचन सुलभपणे होऊ शकते. नकाशा वाचन करता आल्यामुळे मुलांना भूगोलाची निश्चितपणे आवड निर्माण होईल.
शिक्षणपध्दतीचे मुख्य ध्येय व उद्दिष्ट हे आहे.” विद्यार्थांचा सर्वांगीण विकास करणे.” या विकासात शारीरिक,मानसिक, भावनिक, बौध्दिक, क्रियात्मक या सर्वांचा समावेश होतो. यासाठी परिसर अभ्यास या विषयाचे अध्यापन करताना पारंपारिक पध्दतीपेक्षा आधुनिक पध्दतीचा वापर केला तर मनोरंजक होईल. यासाठी अध्यापन करताना शैक्षणिक साधनाचा वापर केला पाहिजे. यामध्ये नकाशे, तक्ते, चार्ट, प्रतिकृती, आलेख, चिञे, फोटो, आकृत्या प्रक्षेपण यंञे फळा ओ.एच.पी. व आकाशवाणी या सर्व साधनाचा समावेश होतो.या सर्व साधनाचा वापर करुन अध्यापन केले तर विद्यार्थींचा योग्य असा विकास होतो.
नकाशावाचन प्रकल्पद्वारे विद्यार्थांच्या शोधन प्रवृत्तीला व विचारशक्तीला चालना देऊन त्यांना कृतीप्रवन बनवता येते.
प्राथमिक शिक्षणात परिसर अभ्यास हा महत्त्वाचा विषय आहे. भावी आयुष्यात उच्य शिक्षणात कला शाखा , वाणिज्य शाखा व विज्ञान शाखेमध्ये तसेच जनरल नॉलेजची परिक्षा , सी.ई.टी (प्रवेश परिक्षा) या परिक्षेत परिसर अभ्यास विषयाचा उपयोग होतो.प्रस्तुत संशोधनामुळे विद्यार्थ्यांना परिसर अभ्यास विषयाबद्दल आवड निर्माण होण्यास मदत झाली.
१.४ समस्या विधान शीर्षक –
“जिल्हा परिषद उच्य प्राथमिक शाळा शिलोंडे येथील इयत्ता ३ री च्या
विद्यार्थ्यांना परिसर अभ्यासातील नकाशा वाचनात येणा-या
समस्यांचा अभ्यास करुन उपायांची
परिणामकता अभ्यासणे.”
१.५ कार्यात्मक व्याख्या
१) परिसर अभ्यास –
प्राथमिक शाळेतील विद्यार्थींना इयत्ता तिसरी पासून स्वतंञपणे शिकवला जाणारा विषय.
२) जि.प.उच्य प्राथमिक शाळा शिलोंडाः-
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषद मार्फत चालविली जाणारी शाळा.
३) इयत्ता ३ री चे विद्यार्थीः-
जिल्हा परिषद उच्या प्राथमिक शाळा शिलोंडे येथे शिकणारे व इयत्ता २ री पास होऊन पुढील इयत्तेत शिकणारे विद्यार्थी.
४) नकाशाः-
एखाद्या प्रदेशाची भौगोलिक माहिती थोडक्यात पण अचुकपणे दर्शवण्यासाठी स्थान, विस्तार, सीमा इत्यादीचा विचार करुन काढलेली प्रमाणबध्द आकृती.
१.६ संशोधनाची उद्दिष्टे –
१) नकाशावाचनातील विद्यार्थ्याच्या अडचणीची कारणे शोधणे.
२) विद्यार्थ्यांना अचुकपणे नकाशावाचन येण्यासाठी उपाय सुचवणे.
३) नकाशावाचनासाठी घेतलेल्या उपक्रमांची परिणामकता तपासणे.
४) नकाशा वाचन करताना वापरण्यात येणा-या शैक्षणिक
साधनांची परिणामकता तपासणे.
५) नकाशावाचन अचुकपणे येण्यासाठी वापरलेल्या उपायांची
परिणामकता तपासणे.
१.७ संशोधनाची व्याप्ती व मर्यादा –
प्रस्तुत संशोधनात पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद उच्य प्राथमिक शाळा शिलोंडा शाळेतील इयत्ता ३ रीच्या परिसर अभ्यास विषयातील नकाशा वाचनातील समस्या त्यावरिल उपाय आणि परिणामांचा अभ्यास केला आहे.
१) प्रस्तुत संशोधन परिसर अभ्यास विषयातील नकाशावाचनापुरतेच
मर्यादित आहे.
२) प्रस्तुत संशोधन जिल्हा परिषद उच्य प्राथमिक शाळा शिलोंडा
शाळेतील विद्यार्थ्यांकरिता आहे इतर शाळांचा विचार केला नाही.
१.८ गृहितके व परिकल्पनाः-
गृहितके
१) विद्यार्थ्याना नकाशाची थोडक्यात माहिती आहे.
२) विद्यार्थ्यांना नकाशावाचनात अडचणी येतात.
परिकल्पना
विद्यार्थ्यांच्या नकाशावाचनातील अडचणी शोधून त्यावर उपाययोजना केल्यास विद्यार्थी अचूकपणे नकाशावाचन करतील.
समारोपः-
प्रस्तुत प्रकरण क्रमांक १ मध्ये कृतीसंशोधनाची प्रश्नावली, संशोधनाची गरज, समस्याचे स्पष्टीकरण, व शिर्षक, महत्वाच्या संज्ञाच्या व्याख्या उद्दिष्ट्ये, गृहितके, व्याप्ती व मर्यादा यांचे विवेचन केले आहे.
प्रकरण दुसरे
संबंधित संशोधन साहित्याचा आढावा
२.१ प्रस्तावना
संबंधित संशोधन करण्यापुर्वी अथवा करत असताना जे जे संदर्भ साहित्य वाचले आहे. त्या संदर्भ साहित्याच्या धर्तीवरच या संशोधनाची दिशा ठरवली आहे. या संदर्भ साहित्याचा या संशोधनाला आधार मिळाला आहे.
२.२ संबंधित संशोधन साहित्याचा आढावा
०१) परिसर अभ्यास पाठ्यपुस्तक इयत्ता ३ रीः- महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने प्रकाशित केलेले हे पाठ्यपुस्तक या संशोधनासाठी अभ्यासले आहे. याचा संशोधन कार्यात संशोधकाने अभ्यास घटकाची मर्यादा निश्चित करण्यासाठी उपयोग झाला. यातील नकाशाच्या संदर्भाने हे संशोधन केले आहे.
०२) परिसर अभ्यास इयत्ता तिसरीः- महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचा परिसर अभ्यास विषयातील या घटकाची व्याप्ती समजण्यासाठी उपयोग झाला.
०३) कृती संशोधन पुस्तिकाल डी टी एडः- या संशोधनाला कृती संशोधन डी.टी.एड व्दितीय वर्ष या सुविचार प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकामुळे योग्य दिशा मिळाली. संशोधन कसे करावे हे समजण्यास मदत झाली.
०४) शैक्षणिक कृती संशोधनः- डॉ. प्रभाकर हकीम सरांनी लिहलेल्या शैक्षणिक कृती संशोधन या पुस्तकाचाही या संशोधन कार्यासाठी उपयोग झाला.
०५) नकाशा शास्ञ: प्रात्यक्षिक भूगोलः- नकाशावाचन या घटकाच्या संशोधनासाठी डॉ. एम. बी. शिंदे यांनी लिहलेल्या व फडके प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या नकाशा शास्ञ प्रात्यक्षिक भूगोल ( परिसर अभ्यास) या पुस्तकामुळे संशोधन घटकांची व्याप्ती व स्वरुप समजण्यास मदत झाली.
०६) प्रात्यक्षिक भूगोल (परिसर अभ्यास)- डॉ.अर्जुन कुंभार लिखित प्रात्यक्षिक भूगोल या संदर्भ ग्रंथाचा या संशोधनास फायदा झाला. नकाशाशिवाय कोणत्याही देशाचा, राज्यांचा, जिल्ह्याचा, तालुक्याचा, गावाचा प्रादेशिक अभ्यास शक्य नाही असे डॉ.अर्जुन कुंभार म्हणतात.
०७) पालघर जिल्हा नकाशाः- मेहता पब्लिशर्स (रजि) टी ४८५/१ बलजित नगर नई दिल्ली ११०००८ यांनी तयार केलेल्या पालघर जिल्ह्याचा नकाशा या संशोधनासाठी वापरला आहे.
०८) कृतीशोधः- जीवन शिक्षण कडून प्रकाशित कृतीशोधन या श्री विजय पाटील (संचालक म.रा.शै.सं. व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे) यांनी संपादन केलेल्या पुस्तकाचीही मदत झाली.
२.३. पुर्वी झालेल्या संशोधनाचा आढावाः-
“इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना भारताचा प्रदेशिक भूगोल या घटकाच्या अध्यापनाकरिता माध्यम संच तयार करणे व परिणामकारकता तपासणे.”
संशोधकः- रावसाहेब रामचंद्र पाटील, (एम.एड), शिक्षणनिष्णात पदविसाठी,
जानेवारी २००१.
उद्दिष्ट्येः-
१) भूगोल अध्यापनामध्ये पारंपारिक अध्यापनाची परिणामकता
तपासणे.
२) भूगोल अध्यापनाच्या संप्रेषणासाठी माध्यमसंच तयार करणे यामध्ये
नकाशे, आलेख, आकृत्या, चिञे, विविध सांख्यिकीय माहिती
तयार करणे.
३) माध्यमांच्या साह्याने केलेला अध्यपनाचा परिणाम तपासणे.
४) पूर्व चाचणी,अंतिमचाचणी, प्राविण्यचाचणी तयार करणे व घेणे.
५) भूगोलाचे पारंपारिक अध्यापन व माध्यमसंचाचा वापर करुन केलेले
अध्यापन या दोन्ही अध्यापन पध्दतीची तुलना करुन त्याची
परिणामकता तपासणे.
प्रत्यक्ष कार्यवाही
संशोधनाच्या तीन पध्दतीपैकी संशोधकाने प्रायोगिक पध्दतीचा वापर केला आहे. संशोधकाने इयत्ता ३ री तील ३२ विद्यार्थींची निवड केली आहे. संशोधकाने माध्यमसंच तयार करुन प्रायोगिक गटावर उपचार केले व परिणामकारकता पाहिली प्रमाण विचलन ही कसोटी व सहसंबंध या द्वारे मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया केली.
निष्कर्ष
१) माध्यमसंच पध्दतीने अध्यपन केले असता विद्यार्थ्यांना जास्त गुण प्राप्त झाले.
२) दुस-या माध्यमसंच पध्दतीने अध्यापन शिक्षकालाही प्रेरणादायी ठरते.
३) माध्यामसंचाद्वारे शिकवताना विद्यार्थ्यांना त्यात नाविन्य वाटत असल्याने व ते विद्यार्थी अध्यायनात रस घेत असल्याचे संशोधकाच्या निर्दशनास आले.
४) माध्यम संचाद्वारे तयार करावा लागल्यामुळे शिक्षकाची तयारी अधिक होते व भूगोल अध्यापनाची त्यांना अधिक गोडी वाटू लागते.
कु.उगले जयमाला भाऊसाहेब ( बी.ए., बी.एड)
समश्याः- “इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यांना भूगोल विषयातील नकाशांची अंगे या घटकाच्या अध्यापनाकरिता माध्यमसंच तयार करणे व त्याची परिणामकता तपासणे.”
उद्दिष्ट्येः-
१) भूगोल अध्यापनामध्ये पारंपारिक पध्दतीच्या अध्यापनाची परिणामकता तपासणे.
२) भूगोल अध्यापनाच्या इयत्ता ५ वीच्या नकाशावरुन या घटकांसाठी माध्यमसंच तयार करणे.
३) माध्यमसंचाच्या साह्याने केलेल्या अध्यापनाची परिणामकता तपासणे.
४) पूर्वचाचणी व उत्तरचाचणी तयार करणे व ती घेणे.
निष्कर्ष
१) पारंपारिक पध्दतीने अध्यापन केलेल्या गटाचे विषय संपादन प्राविण्य सरासरी ८.४३ होती तर माध्यमसंच या पध्दतीने अध्यापन केलेल्या गटाचे विषय संपादन प्राविण्य सरासरी पारंपारिक पध्दतीपेक्षा लक्षणीय होती.
२) माध्यमसंच साहाय्याने अध्यपन केले असता विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतात.
३) माध्यमसंच साह्याने अध्यापन केले असता विद्यार्थ्यांना पारंपारिक पध्दतीपेक्षा अधिक फायदेशीर ठरते.
४) प्रायोगिक गटाला माध्यमसंचाचा वापर केला असता त्यामुळे विद्यार्थी विषय घटक अध्यापन हे घटक अचल ठेवले व अध्यापन पध्दती बदलली असता माध्यमसंचाची परिणामकता १९.०३, ६६.४३, ११.४० सरासरीने वाढलेली दिसते.यावरुन माध्यमसंचाद्वारे अध्यापन परिणामकारक होते हे सिध्द होते.
५) माध्यम संच तयार करावे लागल्याने शिक्षकांची तयारी अधिक होते व गोडी वाढू लागते.
२.३ संशोधनाचे वेगळेपण व उपयुक्तता
पूर्वी झालेले संशोधन उच्य माध्यमिक स्तरावरील भूगोल विषयासाठी माध्यमांची परिणामकता याबाबत आहे. तर संशोधकाने संशोधन इयत्ता ३ रीच्या परिसर अभ्यास विषयातील नकाशा वाचन घटकाशी संबंधीत आहे. सदरच्या संशोधनाचे वेगळेपण हे आहे की परिसर अभ्यास विषयाची समस्या असून तो सोपा असताना देखील काही कारणांच्या अभावी तो त्यांना समजत नाही.
उपयुक्तताः-
१) हे संशोधन अनेक विद्यार्थांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
२) या संशोधनाचा अनेक शिक्षकांना फायदा होणार आहे.
३) या संशोधनामुळे विद्यार्थ्यांना नकाशावाचन योग्य प्रकारे
करता येईल
४) या संशोधनाने विद्यार्थांच्या नकाशा वाचनाच्या संदर्भात
समस्या दुर होण्यास मदत होईल.
समारोपः-
इयत्ता ३ रीच्या परिसर अभ्यास विषयातील नकाशावाचन या घटकाचे संशोधन पूर्वी कोणी न केल्याचे आढळले त्यामुळे हा घटक विद्यार्थ्यांना सहजपणे यावा तसेच या विषयघटकाच्या संशोधनामुळे विद्यार्थी निश्चितपणे परिसर अभ्यास विषयाचा अभ्यास आवडीने करतात असे अढळून आले आहे.
या संशोधनातून प्रथमच नकाशा वाचताना प्राथमिक स्तरावर अत्यंत कल्पकतापुर्वक प्रयोग केला आहे. या पायाभूत संशोधनाचा अनेकांना उपयोग होणार आहे. तसेच पुढील काळात या घटकाशी संबंधीत कोणाला संशोधन करावयेचे असल्यालस संदर्भ साहित्य म्हणून ही निश्चित उपयोग होणार आहे.
प्रकरण तिसरे
![]()
३.१ प्रस्तावना
मागील प्रकरणात आपण समस्याची गरज, स्पष्टीकरण, शीर्षक, शीर्षकातील महत्वाच्या शब्दांच्या व्याख्या संबंधित संशोधन व साहित्याचा आढावा याविषयी माहिती पाहिली आहे.
प्रस्तुत प्रकरणामध्ये संशोधन पध्दतीचा आढावा घेण्यात आला असून प्रायोगिक पध्दती का वापरली याची चर्चा केलेली आहे. दैनंदिन जीवनात शिक्षकाला अध्यापन कार्यामध्ये अनेक समस्या सोडविण्यासाठी अनेक साधनांची आवश्यकता असते. शिक्षक अशा साधनांचा उपयोग करुन समस्या सोडवितात. हि साधने संकलनासाठी उपयोगी ठरतात. संशोधनाची संख्याशास्ञीय व संशोधनाच्या प्रत्यक्ष कार्यवाहीचे वर्णन इत्यादी बाबींचा आढावा घेण्यात आला आहे.
प्रस्तुत प्रकरणामध्ये आपण संशोधनाची कार्यपध्दती याविषयी माहिती घेणार आहोत.
सदरील संशोधनासाठी तसेच सदरील संशोधनासाठी नमुना निवड करुन ३२ पैकी १८ विद्यार्थींची सहेतूक निवड केली जाणार आहे.
अशाप्रकारे या सदरील संशोधनाची कार्यवाही पार पडणार आहे . या प्रकरणात संशोधन कसे केले त्यासाठी काय केले या सर्व बाबी व्यवस्थीतरित्या मांडण्यात आलेल्या आहेत.
३.२ संशोधन पध्दताची निवड
संशोधन पध्दतीने खालिलप्रमाणे तीन गटात वर्गीकरण केले जाते.
०१) ऐतिहासिक संशोधन पध्दती.
०२) वर्णात्मक पध्दती.
०३) प्रायोगिक पध्दती.
या तीन संशोधन पध्दतीपैकी संशोधनासाठी संशोधकाने प्रायोगिक पध्दतीचा स्वीकार केला आहे
प्रायोगिक पध्दतीः-
प्रायोगिक पध्दती म्हणजे वर्तनावर परिणाम करणा-या विविध घटकापैकी एका घटकाशिवाय इतर घटक स्थिर ठेऊन फक्त एका घटकाबद्दल त्याचा वर्तनावर होणारा परिणाम पाहिला जातो.
प्रायोगिक पध्दतीची वैशिष्ट्येः-
1) विचारप्रणाली ही शिक्षणातील प्रयोगिक शिक्षण पध्दतीचा आत्मा आहे.
2) घटकांचे नियञंन करुन स्वतंञ चलांचा परतंञ चलावर होणारा परिणाम हे पध्दतीचे गमक आहे.
3) तुलनात्मक पध्दतीने अभ्यास करण्यासाठी ही पध्दत उपयुक्त आहे.
4) विशिष्ट प्रयोग केल्यानंतर उपक्रम रावबिल्यानंतर परिस्थितीत काय बदल घडेल हे प्रायोगिक पध्दतीने पाहिले जाते.
प्रायोगिक पध्दतीच्या अभिकल्पाचे प्रकारः-
प्रायोगिक पध्दतीने संशोधन करताना दोन अभिकल्प असतात.
०१) एकलगट अभिकल्प
०२) समतुल्य अभिकल्प
एकल अभिकल्पः-
एकल अभिकल्प शैक्षणिक कृतीसंशोधनासाठी फार उपयुक्त आहे. या प्रकारच्या अभिकल्पात एकाच गटाची प्रयोगासाठी निवड केली जाते. या एकाच गटाची प्रयोगपूर्व व प्रयोगानंतर पाहणी केली जाते. दोन भिन्न प्रक्रियांमधून एकाच गटाला जावे लागते.
![]()
एकलगट अभिकल्पः-
या संशोधनासाठी संशोधकाने प्रायोगिक पध्दतीमधील एकलगट अभिकल्प वापरला.
या प्रकारच्या अभिकल्पात प्रयोगासाठी फक्त एकच गट निवडलेला असतो. या गटाला एकच चाचणी किंवा समान चाचणी दोन भिन्न प्रसंगी दिली जाते व त्यातील फरकावरुन प्रायोगिक उपायाबाबत निष्कर्ष काढले जातात या अभिकल्पात प्रायोगिक गट व नियंञित गट असे दोन गट नसतात एकाच गटाला दोन भिन्न प्रक्रियेतून जावे लागते या भिन्न प्रक्रियांच्या फलांमधील फरकाचे निरिक्षण केले जाते.
एकलगट पूर्वौत्तर कसोटी अभिकल्प – स्वरुप व पाय-या-
गट निवड – चाचणी निर्मिती – पुर्वचाचणी – उपक्रम राबवण्याची
पूर्व तयारी – उपक्रमाची अंमलबजावणी – उत्तर कसोटी – तुलना.
चलेः-
०१) एकल चलः- उपाययोजना
०२) परतंञ चलः- नकाशाच्या अंगाचे संपादन
०३) नियंञित चलः- शालेय वर्ग वातावरण समान घटक
जिल्हा परिषद उच्य प्राथमिक शाळा शिलोंडा या शाळेतील सर्व १८ विद्यार्थी न्यादर्श म्हणून निवडले.
३.३ नमुना निवडः-
कृतीसंशोधनाच्या विषयाचे स्वरुप व त्यासाठी निश्चित केलेली उद्दिष्ट्ये यानुसार संशोधकास नमुना निवड ठरवावी लागते.
![]()
नमुना निवडीची वैशिष्ट्येः-
1) प्रातिनिधीकता ही सापेक्ष संज्ञा आहे. संशोधनाशी संबंधीत वैशिष्ट्येच प्रतिनिधीत्व नमुन्यास असला पाहिजे.
2) नमुना निवडीमुळे वस्तुनिष्टता येते.
3) नमुना निवडीमुळे संशोधक पूर्वग्रहांच्या परिणांमाच्या आपेक्षापासून दूर राहू शकतो.
4) नमुना निवडीस कमीत कमी ञुटी असतात.
5) नमुना शक्य होईल तेवढा मोठा असला पाहिजे . पण मोठा नमुना मिळवण्यासाठी माहितीचा नेमकेपणा व तिची अचूकता यावर अन्याय होता कामा नये.
प्रस्तुत संशोधनासाठी संशोधकाने जिल्हा परिषद उच्य प्राथमिक शाळा शिलोंडे मधील विद्यार्थांची नमुना निवड सहेतूक पध्दतीने केली आहे.
३.४ संशोधन संकलनाची साधने
संपादन चाचणीः-
नकाशा वाचन या घटकांच्या संपादनावर आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाचा परिणाम कसा व किती झाला यासाठी संशोधकाने पुर्व चाचणी व उत्तर चाचणी घेण्याचे निश्चित केले या दोन्ही चाचण्याच्या प्रश्नपञिका समान काठिण्यपातळीच्या तयार केल्या. सदर समस्याची संशोधन करत असताना संशोधकाने प्रथम नेहमीच्या पध्दतीने घटकांचे अध्यापन केले व पूर्व चाचणी घेऊन संपादणूकी च्या नोंदी घेतल्या नंतर आलेल्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी तयार केलेले विविध उपक्रम व साहित्याचा (नकाशाचा) वापर करुन निवडलेल्या नकाशावाचन या घटकाचे पुन्हा अध्यापन केले व नंतर उत्तर चाचणी घेतली.
पडताळा सूचीः-
संशोधकाला नकाशावाचन यातील संमश्येसाठी निवडलेल्या विषयाचे अध्यापन करत असताना विद्यार्थ्यामध्ये काही कौशल्ये विकसीत झाले की नाही ते कितपत विकसीत झाले याचा पडताळा घेणे आवश्यक वाटल्याने माहिती संकलनासाठी पडताळा सूचीचा वापर केला.
पदनिश्चयन श्रेणीः-
नकाशावाचन या संशोधनासाठी निवडलेल्या घटकाचा पुर्वचाचणी मधील आवड व हे उपक्रम राबवल्यानंतर त्यांच्या नकाशावाचनाच्या आवडीतील झालेल्या बदलांचे निरिक्षण करणे संशोधकाला गरजेचे वाटले म्हणून मग या आवडीचे निरिक्षण करण्यासाठी पंचबिंदू वर्णनात्मक पदनिश्चयन श्रेणीचा वापर केला.
३.४ माहिती विश्लेषणाची संख्याशास्ञीय तंञेः-
संकलित माहितीचा अर्थ लावण्यासाठी संशोधकाने पुढील तंञे वापरली.
मध्यमानः-
पुर्व चाचणी व उत्तर चाचणी मध्ये विद्यार्थानी संपादन केलेल्या गुणांची तुलना करण्यासाठी मध्यमान या तंञाचा वापर केला.
शेकडेवारीः-
पुर्व चाचणी तयेच उत्तर चाचणी मधील विद्यार्थ्यांना गुणांची टक्केवारी दर्शवण्यासाठी शेकडेवारीचा वापर केला गेला आहे.
आलेखः-
पुर्व चाचणी व उत्तर चाचणी मधील गुणांची टक्केवारी स्तभालेखाद्वारे तर गुणांचा तुलणात्मक अभ्यास दर्शवण्यासाठी रेषालेखाचा वापर केला.
३.५ संशोधनाची प्रत्यक्ष कार्यवाही
नकाशावाचन मुलांना अचुकपणे कसे करता येईल याचा विचार केला यामध्ये नकाशावाचनात समाविष्ट असलेल्या
०१) शीर्षक
०२) उपशिर्षक
०३) दिशा
०४) प्रमाण
०५) चिन्हे व सूची
या नकाशाच्या पाच अंगाचा विचार केला व त्यातूनच संशोधनाचा मार्ग तयार केला.
A) प्रत्यक्ष अनुभवः-
प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना नकाशा हाताळता यावा, त्याचा त्याला प्रत्यक्ष अनुभव यासाठी नकाशाच्या झेरॉक्स ( मोठ्या स्वरुपात ) प्रत्येकाला पुरविण्यात आल्या त्यामुळे प्रत्येक विद्यार्थाला तो पाहता व अनुभवता आला त्याच्या मिञाला व घरी दाखवता आला त्यामुळे आवड निर्माण झाली. शीर्षक व उपशीर्षक ओळखण्याचा सराव यातून झाला.
B) रंगीत नकाशेः-
मुलांची रंगाबद्दलची आवड लक्षात घेऊन मुलांना नकाशेसुध्दा वेगवेगळ्या रंगात दाखवले गेले त्यामुळे त्यांचे लक्ष आपोआप टिकून राहिले. उदाः- पालघर जिल्ह्याच्या नकाशातील प्रत्येक तालुका वेगवेगळ्या रंगाने दाखवण्यात आला त्यामुळे त्याला त्याची स्पष्ट कल्पना येण्यास मदत झाली.
C) मोठे व ठळक नकाशेः-
कोणतीही गोष्ट मोठ्या स्वरुपात पहायला मिळाली तर ती चटकन लक्षात राहते म्हणून मोठे व ठळक नकाशे अध्यापन करताना वापरले.
D) ज्ञानकनातून शिक्षणः-
नकाशावाचन हा घटक मुलांना ज्ञानकणाच्या माध्यमातून शिकवला. इयत्ता तिसरीच्या पुस्तकात पालघर जिल्ह्याचा नकाशा आहे. मग मुलांना या नकाशातील प्रत्येक तालुका कापून काढण्यास सांगितले व नंतर ते सर्व तालुके व्यवस्थीत जोडून पालघर जिल्हा नकाशा बनवण्यास सांगितले यातून मुलांना पालघर जिल्हा नकाशा पाठ झाला.
E) खेळाद्वारे नकाशावाचनः-
खेळातून दिलेले शिक्षण विद्यार्थ्यांना चांगले समजते व लक्षातही राहते याचा विचार करुन विद्यार्थ्यांना विशिष्ट ठिकाण दिलेल्या नकाशात शोधण्यास अथवा दाखवण्यास सांगणे. या सारख्या खेळामुळे तसेच इतरही अनेक गोष्टी नकाशात शोधण्याची मुलांना आवड निर्माण झाली. या खेळातून चिन्हे व सुची यांच्या जोड्या लावण्याचा फायदा झाला.
F) नकाशा वाचन स्पर्धाः-
वर्गातील मुलांचे गट पाडून अभ्यासात नकाशा वाचनात मागे असणा-या विद्यार्थांचे नकाशावाचन सुधारण्याचा प्रयत्न केला. तसेच गटागटांच्या नकाशावाचणाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यात अंतर काढणे, दिशा वर आधारित प्रश्न यांचा समावेश केला त्यामुळे विद्यार्थ्यांना नकाशातील प्रमाणाची कल्पना येण्यास मदत झाली.
G) नकाशा वाचून त्यात माहिती भरणेः-
नकाशा वाचनातील महत्वाचा भाग म्हणजे दिलेली माहिती नकाशात शीर्षक दिशा प्रमाण, चिन्हे व खुणा या नकाशाच्या अंगाचा विचार करुन त्यात योग्यप्रकारे भरणे.
या संशोधनाचा हा अत्यंत महत्वाचा भाग आहे कारण या सर्व संशोधनाअंती संशोधकाच्या असे लक्षात आले की जर मुलांना वैयक्तीकरित्या पुरवलेल्या नकाशात माहिती भरण्यास सांगितले तर ती माहिती विद्यार्थी नकाशाच्या अंगाचा विचार करुन भरतात यात त्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण मिळते. यातून त्यांच्या चुका चटकन लक्षात येतात व त्यावर उपाय किंवा उपचार योजण्यास शिक्षकांचा वेळ वाया जात नाही.
H) मुक्तोत्तरी प्रश्नः-
नकाशा वाचनावर देण्यात येणारा हा एक मुक्तोत्तरी प्रश्न आहे. उदा- मुलांना त्याच्या गावचा/ गल्लीचा / वार्डाचा नकाशा त्यांच्या पध्दतीने तयार करण्यास सांगणे. तयेच या नकाशात त्या गावातील घर , रस्ते, मंदिरे, शाळा इ. माहिती भरण्यासाठी वेगवेगळ्या चिन्हांचा वापर करण्यास सांगणे. यातून मुले स्वतः विचार करुन त्या गावचा नकाशा काढून त्यात माहिती भरु लागली. इतरही अनेक प्रश्न मुलांना घरी गृहपाठ म्हणून दिले गेले. या मुक्तोत्तरी प्रश्नांच्या माध्यमातून चिन्हे व सूची यांचा कार्यकारण संबंध जोडण्याचा सराव झाला.
I) नकाशात रंग भरणेः-
मुलांना रंगाविषयी आवड असते हे लक्षात घेऊन पुरवलेल्या नकाशात तुमचा तालुका गुलाबी रंगाने रंगवा तानसा अभयारण्याचा तालुका हिरव्या रंगाने रंगवा. कुर्झे धरणाचा तालुका लाल रंगाने रंगवा या नकाशआचे शीर्षक काळ्या रंगाने लिहा यामुळे विद्यार्थी कार्यप्रवण झाले व कृतीतून शिक्षण घेऊ लागले.
J) कार्ययोजनाः-
नकाशा वाचनासाठी सकाळी परिपाठात अगोदर जर एखादी तासिका जादा घेतली तर ते अधिक फलदायी ठरते हे संशोधनाअंती लक्षात आले. ही योजना यशस्वी होण्यसाठी मुलांकडून अधिकाधिक सराव होण्यासाठी त्यांना गृहपाठही दिले गेले तसेच नकाशा माहिती भरणे या उपक्रमाचा अधिक सराव घेण्यात आला. सदर संशोधनासाठी संशोधकाने खालिलप्रमाणे नियोजन केले.
प्रकरण चौथे
माहितीचे संकलन, विश्लेषन व अर्थनिर्वचन
प्रस्तावनाः-
संशोधकाने माहिती संकलनासाठी निश्चित केलेल्या विविध साधनाद्वारे माहितीचे संकलन केले. या प्रकरणामध्ये विविध कोष्टकाद्वारे माहितीचे तालिकीकरण तसेच संकलीत माहितीचे विश्लेषन व अर्थनिर्वचन केले आहे.
४.१ माहितीचे संकलन , सादरीकरण, कोष्टकीकरणः-
संकलीत केलेल्या माहितीचे सादरीकरण / कोष्टकीकरण खालिलप्रमाणे केले आहे.
माहिती संकलन
पूर्व व उत्तरचाचणीतील गुण व त्यांची शेकडेवारी
कोष्टक क्र. ४.१
![]()
कोष्टक क्र.४.२
पुर्व व उत्तर चाचणीतील गुणांची
वारंवारता (शेकडेवारीसह)
कोष्टक क्र.४.३
पुर्व व उत्तर चाचणी कौशल्य पडताळा
कोष्टक ४.४
पुर्व चाचणी व उत्तर चाचणीतील नकाशा वाचनाच्या आवडीचे पदनिश्चयन श्रेणीने ( तुलनात्मक ) मापन
४.२ माहितीचे विष्लेषन
४.२.१ मध्यमानः-
४.२.२ शेकडेवारीः-
४.२.३ आलेखः-
![]()
४.३ माहितीचे अर्थनिर्वचनः-
संशोधकाने माहितीचे विश्लेषन करण्यासाठी वापरलेल्या संख्याशास्ञीय तंञाच्या मदतीने जी अंतीम गुणवाढ पडताळून पाहिली त्यामध्ये पुर्व चाचणीत गुणांचे मध्यमान १३.२७ होते. तर गुणांची टक्केवारी ५३.११ होती यामध्ये वाढ होऊन चाचणीतील गुणांचे मध्यमान २१.८८ व गुणांची टक्केवारी ८७.५५ झाली.
विद्यार्थांच्या संपादणुकीत कमालीची वाढ झाल्याचे संशोधकाच्या लक्षात आले. ही संपादणुकीतील वाढ होण्यामागे संशोधकाने पुर्व चाचणीनंतर जे उपक्रम तयार करुन निवडलेल्या घटकाविषयीचे उपक्रमाद्वारे अध्यापन केले . त्याचाच परिणाम असल्याचे सिध्द होते.
वरिल उपक्रमामुळे खालिल परिणाम झाल्याचे दिसून आले.
i. पुर्व चाचणीतील मध्यमानापेक्षा उत्तर चाचणीतील मध्यमानात कमालीची म्हणजे ८.६१ इतकी वाढ झाली.
ii. पुर्व चाचणीचील संपादनापेक्षा उत्तर चाचणीतील संपादनात कमालीची वाढ झाली.
iii. स्तंभालेखावरुन गुणांच्या सरारसरीत ३४.४४ इतकी वाढ झाल्याचे स्पष्ट होते.
iv. स्तंभालेखावरुन विद्यार्थांच्या पुर्व चाचणीतील गुणांपेक्षा उत्तर चाचणीतील गुणांमध्ये कमालीची वाढ झाल्याचे स्पष्ट झाले.
v. अपेक्षित क्षमता प्राप्त न केलेल्या विद्यार्थींसाठी सरावाचा व अधिक रंगीत नकाशाचा उपक्रम विशेष उपयोगी ठरला.
प्रकरण पाचवे
सारांश निष्कर्ष व शिफारशी
५.१ सारांशः-
प्रास्ताविक -
संशोधकाने या प्रकरणात सारांशामध्ये मागील प्रकरण १ ते ४ मध्ये अहवाल लेखनाचा थोडक्यात समावेश केलेला आहे. तसेच अहवालावरुन काही निष्कर्ष काढून पुढील संशोधनासाठी कांही शिफारशी केल्या आहेत.
संशोधकाने निवडलेला विषय मानवाच्या दैनंदिन जीवनाशी अतिशय जवळचा संबंध आलेला आहे. त्यामुळे निवडलेल्या विषयाचे सखोल ज्ञान विद्यार्थास होणे गरजेचे आहे. संशोधकास अध्यापन करत असताना सदरच्या घटकाचे संपादन व्यवस्थित होत नाही याची जाणीव झाल्यानेच नकाशावाचन हा विषय निवडणे गरजेचे वाटले.
५.१ प्रकरण १ ले – संशोधन विषयाची ओळखः-
पहिल्या प्रकरणात संशोधनाची गरज , संशोधकाने निवडलेली समस्या , उद्दिष्ट्ये, कार्यात्मक व्याख्या , व्याप्ती व मर्यादा, परिकल्पना याविषयी माहिती दिली आहे.
प्रकरण २ रे – संबंधित सहित्याचा व संशोधनाचा आढावाः-
प्रकरण २ मध्ये संशोधकाने प्रत्यक्ष संशोधनासाठी वापरलेले संदर्भ ग्रंथ व त्यातील आवश्यक माहिती सारांश स्वरुपात दिली आहे.
प्रकरण ३ रे – संशोधनाची कार्यपध्दतीः-
प्रकरण ३ मध्ये संशोधकाने संशोधन पध्दतीविषयी माहिती दिली आहे. तसेच प्रस्तुत संशोधनाची कार्यवाहीची तपशीलवार माहिती दिली आहे.
संशोधनात वापरलेली माहिती संकलनाच्या साधनाविषयी माहिती या प्रकरणात विषद केलेली आहे.
प्रकरण ४ थे – माहिती संकलन , विश्लेषन व अर्थनिर्वचनः-
या प्रकरणात सकंलित माहिती तक्त्यामध्ये मांडून त्यावर संख्याशास्ञीय तंञाचा वापर केला आहे.
प्रकरण ५ वे – सारांश , निष्कर्ष व शिफारशीः-
या प्रकरणात संशोधकाने संपुर्ण संशोधनाचा सारांश दिला आहे . संशोधनावरुन संशोधकाने काढलेले निष्कर्ष व केलेल्या शिफारशी या प्रकरणात दिल्या आहेत . तयेच संशोधकाने पुढील संशोधनास आवश्यक विषय सुचविले आहेत.
५.२ निष्कर्षः-
1) इयत्ता तिसरीच्या विद्यार्थांसाठी या संशोधनात सूचविलेल्या विविध उपक्रमाची कार्यवाही केल्यास नकाशावाचन अचूकतेने होते.
2) या संशोधनातील उपक्रमाची कार्यवाही केल्यास विद्यार्थी नकाशावाचन नकाशाच्या विविध अंगाचा विचार सहजपणे करु लागतात.
3) रंगीत व मोठ्या नकाशाच्या वापरामुळे विद्यार्थ्यांना नकाशावाचनातील नकाशाच्या विविध अंगाचे महत्व समजले. व शिर्षक आणि उपशिर्षक सांगता येऊ लागले.
4) प्रत्यक्ष अनुभव व नकाशा वाचनाच्या स्पर्धा यामुळे विद्यार्थांची नकाशावाचनातील गोडी वाढली हे स्पष्ट झाले.
5) खेळाद्वारे नकाशावाचन व मुक्तोतरी प्रश्नाच्या उपक्रमामुळे चिन्हे व सूची याचा कार्यकारण संबंध विद्यार्थ्यांना जोडता येऊ लागला हे स्पष्ट झाले.
6) नकाशावाचनाच्या स्पर्घा घेतल्यामुळे नकाशातील प्रमाण व दिशा यांची स्पष्ट कल्पना विद्यार्थ्यांना आली.
7) सप्ताहातील एक तासिका नकाशावाचनासाठी ठेवल्याने विद्यार्थींना नकाशा वाचनाचे सखोल ज्ञान प्राप्त झाले.
8) नकाशा वाचनाबद्दल आवड व रुची निर्माण होण्यास अतिशय महत्वाची मदत झाली.
9) परिसर अभ्यासातील महत्वाचा घटक म्हणून विद्यार्थी नकाशा वाचन करु लागले.
१०) परिसर अभ्यासातील नकाशा वाचन घटकाचा वापर करुन विविध नकाशे समजण्यास मदत झाली.
५.३ शिफारशीः-
1) विद्यार्थांचे नकाशा वाचन सुधारण्यासाठी नकाशा वाचनाच्या विविध उपक्रमांच्या कार्यवाहीची आवश्यकता आहे.
2) नकाशा वाचन कौशल्य विकसीत करण्यासाठी प्रथम शिक्षकांनी नकाशा वाचन कौशल्य सुधारण्याचे तंञ स्वतः आत्मसात करावे. शिक्षकांनी नकाशा वाचन नकाशाच्या विविध अंगाचा विचार करुन शिकवावे.
3) नकाशा वाचन स्पर्धा आयोजित कराव्यात.
4) अद्यावत नकाशे शाळांना अधिक प्रमात पुरवावेत.
5) विविध ज्ञानात्मक भौगोलिक खेळाचे साहित्य शाळांना पुरवावे त्यामुळे भौगोलिक ज्ञानात भर पडून अध्यापनात रंजकता येईल. उदा. महाराष्ट्रातील जिल्हे जुळवून महाराष्ट्राचा नकाशा बनविणे.
6) मोठे रंगीत व ठळक नकाशांचा वापर अधिक प्रमाणात करावा.
7) नकाशाची प्रत प्रत्येक विद्यार्थ्यांना हाताळायला व माहिती भरण्यास द्यावी.
8) सप्ताहातील एक तासिका केवळ नकाशावाचनासाठी ठेवावी.
प्रकरण सहावे
![]()
६.१ प्रस्ताविक
कृती संशोधन करणे सध्याच्या काळात खूपच गरजेचे आहे. कारण अध्ययन करताना अनेक समस्या येतात. व त्या समस्या वेळीच सोडवल्या नाही तर मुलांना व्यवस्थीतरित्या समजत नाहीत. म्हणून कृती संशोधन करणे गरजेचे आहे.
परिसर अभ्यास हा अत्यंत महत्वाचा असा विषय आहे. मानवाला परिसर अभ्यास विषयाचा उपयोग जीवनाच्या प्रत्येक क्षेञात होतो. परिसर अभ्यासावर मानवी जीवनाचे नाट्य घडत असते. अन्न , वस्ञ, निवारा, व्यवसाय यासाठी मानवी जीवन परिसरावर अवलंबून असते. यामध्ये हवामान, रस्ते, नद्या, जंगले, पीके, वाळवंट इ. घटकाचा अभ्यास केला जातो. व हा अभ्यास आपण नकाशाद्वारे चांगला करु शकतो त्यासाठी नकाशावाचन अत्यंत महत्वाचे असते. नकाशावाचनामुळे आपल्याला विविध आराखड्याचा अभ्यास करता येतो.
६.२ निष्कर्षकांचा अन्वयार्थ व विमर्षी विचार
परिसर अभ्यास हा विषय मानवी जीवनास विविध अंगानी स्पर्श करतो. परिसर अभ्यास विषयाचे हेतू , उद्देश ध्येये यांचे केवळ पुस्तकी ज्ञान प्राप्त न करता त्यानुसार प्रत्यक्षपणे वागण्याची कुवत परिसर अभ्यास अभ्यासक्रमातून निर्माण होते.
आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. या युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेतच ज्ञान प्राप्त झाले पाहिजे. या प्राप्त ज्ञानाचा वापर त्यांना भावी जीवनात करता आला पाहिजे. विद्यार्थींना प्राप्त व्हाव्यात यासाठी कृतीसंशोधन महत्वाचे आहे.
जवळ जवळ ५० % विद्यार्थ्यांना नकाशा वाचन करताना अडचणी आल्या. सूचीचा वापर करुन नकाशा भरणे ही संकल्पना विद्यार्थ्यांना समजली नाही. विद्यार्थ्यांना नकाशावाचन करताना येणा-या अडचणींचा शोध घेता आला. नकाशावाचनात उपक्रमांच्या अंमलबजावणीमुळे विद्यार्थ्यांना नकाशावाचन करता आले. नकाशावाचनात नकाशा या शैक्षणिक साधनाचा वापर केल्यामुळे विद्यार्थ्यांना स्थान, दिशा, प्रमाण व नकाशावाचन पुर्वीपेक्षा चांगले करता येऊ लागले.
संशोधकास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने कृतीसंशोधन हा विषय ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांना घटकांवर अडचणी येतात त्या सोडवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे हे समजले. त्यामुळे विविध ग्रंथसंदर्भाचा अभ्यास संशोधकास करावयास मिळाला. त्यातून संशोधकाच्या ज्ञानात भर पडण्या मदत झाली. या ज्ञानाचा उपयोग संशोधनास पुढील अध्ययन – अध्यापन व शैक्षणिक घटकांचे अध्यापन करताना येणा-या अडचणी सोडविण्यासाठी संशोधक करणार आहे.
संशोधकाला असे वाटते की, परिसर अभ्यास विविषयातील विविध घटक हे वेगवेगळ्या पध्दतीने अध्यापन करुन त्यांचे दृढीकरण करण्याचा प्रयत्न संशोधकाचा राहणार आहे. कृतीसंशोधनामुळे विविध संदर्भ ग्रंथ पूर्वी झालेल्या संशोधनाचा व विविध निष्कर्षाचा अनुभव संशोधकास आला व त्याचा उपयोग नक्कीच अध्यापनासाठी होतो.त्यामुळे सदरच्या संशोधनामध्ये संशोधकास आत्माआनंद मिळाला आहे.
६.३ इतर शिक्षकांसाठी उपयोगीताः-
या समस्येची सोडवणूक झाल्यानंतर शिक्षकांना उपयोग होणार आहे. प्राथमिक स्तरापासून परिसर अभ्यास हा विषय आहे. विद्यार्थ्यांना नकाशावाचनात येणा-या चुका दूर करण्यासाठी या संशोधनाचा उपयोग होणार आहे.
तसेच नकाशा वाचनात होणा-या चुका परत होऊ नयेत यासाठी शिक्षकांनी नकाशाचे वेगवेगळे प्रकार व नकाशावाचनाचा योग्य व अचूक सराव लावून विविध युक्त्यांचा वापर करुन प्रभावी अध्यापन करु शकतील.
या संशोधनाचा उपयोग इतर शाळेतील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना होईल त्या दृष्टीने सदरचे संशोधन महत्वाचे वाटते.
६.४ पुढील संशोधनासाठी विषयः-
1. इयत्ता ४ थी च्या विद्यार्थ्यांना नकाशा घटक शिकविताना येणा-या समस्यांचा शोध घेवून त्यावर उपायोजना करणे.
2. इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यांना नकाशा घटक शिकविताना येणा-या समस्यांचा शोध घेवून त्यावर उपायोजना करणे.
3. इयत्ता ७ च्या विद्यार्थ्यांना नकाशा घटक शिकविताना येणा-या समस्यांचा शोध घेवून त्यावर उपायोजना करणे.
4. इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यांना लपाळघर जिल्याचा अभ्यास करताना येणा-या समस्यांचा शोध घेवून त्यावर उपायोजना करणे.
5. इयत्ता ६ वी च्या विद्यार्थ्यांना जीवावरणे घटक शिकविताना येणा-या समस्यांचा शोध घेवून त्यावर उपायोजना करणे.
6. इयत्ता ४ ,५,६,७,८,९,१०. वी च्या विद्यार्थ्यांना नकाशातील सूची हा घटक शिकविताना येणा-या समस्यांचा शोध घेवून त्यावर उपायोजना करणे.
समारोपः-
या प्रकरणामध्ये सारांश रुपाने आराखड्याचे विवेचन केले आहे. त्याचबरोबर कृतीसंशोधन कार्यवाहीतून निघालेले निष्कर्ष त्याचबरोबर शिक्षक, मुख्याध्यापक, शासन यांना सुचवलेल्या शिफारशी यांचा समावेश केला आहे. तसेच यामध्ये संशोधनामध्ये शिक्षकांची उपयुक्तता, संशोधकाची उपयुक्तता, संशोधन कार्यासाठी सूचवलेले विषय याबद्दल विवेचन केले आहे.
संदर्भ ग्रंथ सूची
1) म.रा. पाठ्यपुस्तक निर्मीती व संशोधन मंडळ, परिसर अभ्यास पाठ्यपुस्तक( २००४) इयत्ता तिसरी, म.रा.शिक्षण विभाग, पुणे.
2) म.रा. पाठ्यपुस्तक निर्मीती व संशोधन मंडळ, परिसर अभ्यास पाठ्यपुस्तक (२००८) इयत्ता तिसरी, म.रा.शिक्षण विभाग, पुणे.
3) म.रा. पाठ्यपुस्तक निर्मीती व संशोधन मंडळ, परिसर अभ्यास पाठ्यपुस्तक ( २०१४) इयत्ता तिसरी, म.रा.शिक्षण विभाग, पुणे.
4) स्वाती गाडगीळ, कृतीसंशोधन पुस्तिका (२००६), सुविचार प्रकाशन , पुणे.
5) हकीम प्रभाकर, शैक्षणिक कृतीसंशोधन, फडके प्रकाशन, पुणे.
6) एस.बी.शिंदे, नकाशाशास्ञः प्रात्यक्षिक भुगोल, फडके प्रकाशन कोल्हापुर.
7) कुंभार अर्जून, प्रात्यक्षिक भुगोल.
8) विजय पाटील, कृतीशोध (२००६) म.रा.शै.सं.प्र. परिषद, पुणे.
|
|
No comments:
Post a Comment