Pages

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

घरघुती टिप्स

🤔 *पावसाळ्यात दागिने काळे पडू नये, म्हणून काय काळजी घ्याल?*

*LetsUp | Tips & Tricks*

पावसाळ्यात वातावरणात असलेल्या गारव्यामुळे महिलांना दागिने काळे पडण्याची चिंता सतावत असते. तसेच खोटे दागिने पावसाळ्यात काळे पडतात, तर चांदीच्या दागिन्यांची चमक थोडी कमी होते. त्यामुळे दागिन्यांची कशी काळजी घेता येईल? यासाठी काही सोप्या ट्रिक्स पाहुयात...

*1.* चांदीचे दागिने काळे पडू नये म्हणून पाण्यात एक मोठा चमचा बेकिंग सोडा घालावा. त्यात दागिने थोडा वेळ ठेवा. थोड्या वेळात पाण्यातून दागिने बाहेर काढून ते साफ केल्यास दागिने पुन्हा चमकताना दिसतील.

*2.* खोटे दागिने कपड्यात गुंडाळून ठेवण्यापेक्षा ते कापसात गुंडाळून ठेवावे. यामुळे ते काळे पडत नाही.

*3.* जर तुम्ही ज्वेलरी बॉक्समध्ये तुमचे दागिने ठेवत असाल तर त्यात सिलिकाचे एक पॅकेट ठेवा. यामुळे दागिन्यांवर आलेला ओलावा निघून जातो आणि दागिने खराब होत नाही.

*4.* जर सिलिकाचे पॅकेट नसेल तर घरातील सूती कपड्यामध्ये तुम्ही दागिने ठेवू शकता. कारण सूती कपडा दागिन्यावरील ओलावर शोषून घेतो.

*5.* दागिने काळे पडत असतील तर त्यांना गरम पाण्यात टाकून साफ करा आणि त्यानंतर कॉटनच्या कपड्याने पुसा. मग थोडा वेळा त्या दागिन्यांना खुल्या हवेत सुकू द्या. त्यानंतर हे दागिने एका वेगळ्या बॉक्समध्ये ठेवा.

*6.* वापरात नसलेल्या टूथब्रशवर टूथपेस्ट घ्या. ती काळ्या पडलेल्या दागिन्यांवर घासा. नंतर थंड पाण्याने धुवा. तुमचे दागिने नव्यासारखे चमकतील.


सतत आनंदी राहण्यासाठी



* आज दिवसभर काहीतरी चांगल घडणार आहे ही सूचना सकाळी उठल्या उठल्या पाच-दहा वेळा मनाशी म्हणा.
* समोरच्या माणसातील चांगल्या गोष्टी दाखवून त्याला प्रोत्साहित करा. स्वत:बद्दल कमी बोला.
*दर दोन दिवसांनी एखादे गुलाबाचे फुल आणा व त्याला घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये योग्य स्थान द्या.
* आवडते गाणे पुन्हा पुन्हा ऐका व गुणगुणत रहा.
*चांगल्या विचारांचे एखादे छोटेसे पुस्तक स्वत:जवळ बाळगा व एखादा विचार घेऊन त्यावर मनन-चिंतन करा
* चालण्याची गती थोडी वाढवा व ताठ मनाने स्मित व्यक्त करत आवडत्या पेहरावात समाजात वावरा
*लहान मुलांमध्ये मिसळा व काही काळ त्याच्यासारखेच होऊन वावरा
*जास्तीत जास्त शुद्ध हवा शरीरात जाईल याची काळजी घ्या दिर्घ श्वसन करा
* स्वत:च्या चांगल्या पेहरावातील हसर्‍या चेहर्‍याचा फोटो नजरेला सतत पडेल असा ठेवा
*एखादी बाग, देऊळ नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी प्रसन्नता अनुभवत दहा पंधरा मिनिटे घालवा
* नकारत्मक शब्दांचा वापर पुर्णपणे टाळुन, उत्साहपूर्ण चांगल्या शब्दाचा वापर रोजच्या संभाषणात करा
*विनोदी सिरीयल पाहताना खळखळुन हसा व शरीराची हालचाल होऊ द्या.

* चार वर्षाचे बालक दिवसात साधरणत: पाचशे वेळा हसत असते तर एव्हरेज मनुष्य जेमतेम पंधरा वेळा, यामुळे स्ट्रेस वाढत जातो, याकरीता अधिकाधिक आनंद व्यक्त करण्याची संधी निर्माण करा.
*शरीरातील त्र्यैशी टक्के संवेदना ह्या डोळ्यांच्या माध्मातून होत असतात. या करीता भोवतालचे वातावरण प्रसन्नपूर्वक व प्रकाशयुक्त ठेवा.
*रिकामे मन सैतानाचे घर असते त्याकरिता स्वत:ला आवडत्या छंदामध्ये गुंतवा, सतत काहीतरी करत रहा.
*संगीतमध्ये उत्साह जागृत करण्याची शक्ती आहे, रोजचे काम करताना आवडीचे संगीत बॅकग्राउंडला चालु असुद्या.
*चिडचिडेपणा, डोक्याला आठ्या पाडणारा स्वभाव उखडून टाका. मनाला सतत शांत व प्रसन्न राहण्याची सुचना करा.
* विनोदाला जीवनात महत्वाचे स्थान द्या, कोणत्याही वातावरणात मोकळेपणा आणण्यास तो मदतगार ठरतो.



No comments:

Post a Comment