Pages

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

Wednesday 22 July 2020

शब्द कोडे उत्तरासाहित

[14/07, 9:57 AM] +91 86056 48865: 🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵

🔘 *शब्दकोडे* 

🔘उत्तराची सुरूवात  *पा*  या अक्षरानेच व्हावी.

🔘पाण्यात साखर घालून बनवितात- 
🔘पक्षी-
🔘डोक्याला बांधण्याचे वस्त्र-
🔘एका  हाताची बोटे-
🔘लाकडी आसन-
🔘शरीराचा एक अवयव-
🔘एखादी संख्या विशिष्ट पटीत म्हणणे- 
🔘याला जीवन म्हणतात- 
🔘वनस्पतीचे एक अवयव-
🔘झाडाभोवती बांधलेला ओटा-
🔘भिंतीवर राहणारा प्राणी-
🔘घोडा बांधण्याची जागा- 
🔘------वर पेन्सिलीने लेखन करतात-
🔘एक वाद्य-
🔘गणपतीची माता- 
🔘फुलांच्या असतात- 
🔘कावडीने पाणी भरणारा माणूस-
🔘काच  ----------असते- 
🔘उत्तीर्ण या शब्दाला इंग्रजी शब्द- 
🔘एक प्रकारचे रत्न- 

🔘  *संकल्पना व निर्मिती- नंदा परदेशी  जि. धुळे*

🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴
[14/07, 9:57 AM] +91 86056 48865: 🔶 *शब्दकोडे*
🔶  *उत्तराच्या शब्दाची सुरूवात (मो) या अक्षराने व्हावी.*

🔶 थुईथुई नाचणारा पक्षी -
🔶 सुंदर आकर्षक -
🔶 छोटे या शब्दाला विरुद्ध अर्थांचा शब्द  - 
🔶 लुब्ध होणे -
🔶 बंधनमुक्त - 
🔶 लाकडांची बांधतात -
🔶 आकर्षित करण्याची कला -
🔶 श्रीकृष्णाचे एक नाव -
🔶 एक सुगंधी फूल -
🔶 तुटलेले -
🔶 हा समुद्रातील शिंपल्यात तयार होतो  - 
🔶 गणपतीचा आवडता पदार्थं -
🔶 किंमत  -
🔶 पायात घालतात - 
🔶 एक रसदार फळ - 
🔶 कामाबद्दल दिली जाणारी रक्कम - 
🔶 एका रंगाचे नाव -
🔶 लाडूंचा एक प्रसिद्ध प्रकार - 
🔶 नाकात घालण्याचा एक दागिना - 

🔶 *संकल्पना व निर्मिती - नंदा परदेशी धुळे*
[14/07, 10:00 AM] +91 86056 48865: 🔶 *शब्दकोडे - उत्तरसूची*
🔶 *उत्तराच्या शब्दाची सुरूवात (मो) या अक्षराने व्हावी.*

🔶 थुईथुई नाचणारा पक्षी - *मोर*
🔶 सुंदर आकर्षक - *मोहक*
🔶 छोटे या शब्दाला विरुद्ध अर्थांचा शब्द  -  *मोठे*
🔶 लुब्ध होणे -  *मोहित*
🔶 बंधनमुक्त -   *मोकळा , मोकाट*
🔶 लाकडांची बांधतात -  *मोळी*
🔶 आकर्षित करण्याची कला -  *मोहिनी*
🔶 श्रीकृष्णाचे एक नाव - *मोहन*
🔶 एक सुगंधी फूल -  *मोगरा*
🔶 तुटलेले -  *मोडके*
🔶 हा समुद्रातील शिंपल्यात तयार होतो  -  *मोती*
🔶 गणपतीचा आवडता पदार्थं -  *मोदक*
🔶 किंमत  -  *मोल*
🔶 पायात घालतात -   *मोजे*
🔶 एक रसदार फळ -  *मोसंबी*
🔶 कामाबद्दल दिली जाणारी रक्कम -  *मोबदला*
🔶 एका रंगाचे नाव -  *मोरपंखी*
🔶 लाडूंचा एक प्रसिद्ध प्रकार -  *मोतीचूर*
🔶 नाकात घालण्याचा एक दागिना - *मोरणी*

🔶 *संकल्पना व निर्मिती - नंदा परदेशी धुळे*
[14/07, 10:03 AM] +91 86056 48865: 🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵

🔘  *शब्दकोडे* - *उत्तरसूचीसह*

🔘उत्तराची सुरूवात  *पा*  या अक्षरानेच व्हावी.

🔘पाण्यात साखर घालून बनवितात-  *पाक*
🔘पक्षी- *पाखरू*
🔘डोक्याला बांधण्याचे वस्त्र- *पागोटे*
🔘एका  हाताची बोटे- *पाच*
🔘लाकडी आसन- *पाट*
🔘शरीराचा एक अवयव- *पाय*
🔘एखादी संख्या विशिष्ट पटीत म्हणणे-  *पाढे*
🔘याला जीवन म्हणतात-  *पाणी*
🔘वनस्पतीचे एक अवयव- *पान*
🔘झाडाभोवती बांधलेला ओटा- *पार*
🔘भिंतीवर राहणारा प्राणी- *पाल*
🔘घोडा बांधण्याची जागा-  *पागा*
🔘------वर पेन्सिलीने लेखन करतात- *पाटी
🔘एक वाद्य- *पावा*
🔘गणपतीची माता-  *पार्वती*
🔘फुलांच्या असतात-  *पाकळ्या*
🔘कावडीने पाणी भरणारा माणूस- *पाणक्या*
🔘काच  ----------असते-  *पारदर्शक*
🔘उत्तीर्ण या शब्दाला इंग्रजी शब्द-  *पास*
🔘एक प्रकारचे रत्न-  *पाचू*

🔘  *संकल्पना व निर्मिती- नंदा परदेशी  जि. धुळे*

🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴
[17/07, 9:48 PM] +91 75889 59573: ♻ *शब्दकोडे*
♻उत्तराच्या शेवटी  *प*  हे अक्षर आले पाहिजे.

♻सरपटणारा प्राणी -  *साप*
♻संताप , राग -  *कोप*
♻अंग गरम होणे ,ज्वर-   *ताप*
♻वडील , जनक -  *बाप*
♻वरदान या शब्दाला विरुद्ध अर्थांचा शब्द - *शाप*
♻मार -  *चोप*
♻निद्रा -  *झोप*
♻दूधापासून बनविला जाणारा एक स्निग्ध पदार्थ  - *तूप*
♻जमिनीत  बीज अंकुरल्यानंतर तयार होते - *रोप*
♻भरपूर-  *खूप*
♻अजिबात न बोलणे -  *गुपचूप , चूप*
♻सौंदर्य  -  *रूप*
♻भरारी -  *झेप*
♻ नामशेष -  *लोप*
♻धान्य मोजण्याचे साधन -  *माप*
♻चहा पिण्याचे साधन -  *कप*
♻ दिवा , दीपक -  *दीप*
♻ पाणी साठवण्याचे  एक साधन  -  *पिंप*
♻ पुण्य या शब्दाला विरुद्ध अर्थाचा शब्द -  *पाप*

♻  *संकल्पना व निर्मिती - नंदा परदेशी धुळे*
[17/07, 9:48 PM] +91 75889 59573: 💟 *डी*  ची कमाल

💟आईने बाजारातून आज गुलाबी *साडी* आणली.
💟 *गाडी*  घेऊन बाबा कामाला गेले.
💟मेथीची  *जुडी* ताजी आहे.
💟वाचनाची *गोडी* लागल्यामुळे तो पुस्तके विकत घेऊ लागला.
💟विनाकारण कोणाची  *खोडी* काढू नये
💟बैलांची  *जोडी* शेतात राबत होती.
💟चंदन *वाडी*  आमच्या  घराजवळच आहे.
💟मृणालने पाण्यात कागदाची  *होडी* सोडली.
💟आंब्याच्या  *फोडी* गोडच गोड.
💟समीरने फुलांची  *कुंडी* उन्हात ठेवली.
💟फुलांची  *परडी* घेऊन आजी देवळात जातात.
💟आईने दुधात *थोडी* साखर घातली.
💟शंतनू भाषिक  *कोडी* सोडवितो.
💟हातातील *बेडी* तोडून चोर फरार झाला.
💟 *रानवेडी*  ही कविता खूप छान आहे.
💟पावसाने सध्या *दडी*  मारली.
💟शेतकरी अंगात  *बंडी* घालतात.
💟केशरी  *दांडी* असणारी पारिजातकाची फुले सुंदर दिसतात.
💟शाळेला  *दांडी* मारून घरी राहिल्यामुळे मनूचा अभ्यास मागे राहिला.
💟वारक-यांची  *दिंडी* पंढरपुरात पोहचली.
💟आईच्या *मांडी* वर बाळ खेळत होते.

💟  *नंदा परदेशी -धुळे*
[18/07, 9:45 AM] +91 86056 48865: 🔯 *शब्दकोडे*
🔯उत्तराच्या शब्दाची सुरुवात  *गा* या अक्षराने असावी.

🔯दूध देणारा प्राणी -
🔯ओझी वाहणारा प्राणी -
🔯गाणे गाणारी स्त्री -
🔯गाणे गाणारे पुरुष -
🔯एक कंद -
🔯सापाचा खेळ करणारा-
🔯एक प्रकारचा दगड -
🔯थंड -
🔯एक अवयव -
🔯ग्राम -
🔯लतादीदींना मिळालेली पदवी -
🔯एक आडनाव -
🔯एक आजार -
🔯गीत -
🔯चिखल , आकाशातून पडणारे बर्फाचे लहान खडे-
🔯अदृष्य -
🔯एका मोठ्या कपड्यात जास्त कपडे बांधलेले -
🔯नदीमधील ओली, मऊ माती - 
🔯चाळणी, गाळण्यासाठी उपयोगी -
🔯गावातील गुंडगिरी करणारा -
🔯मुलीचे नाव  -

🔯संकल्पना व निर्मिती - नंदा परदेशी धुळे
[18/07, 9:45 AM] +91 86056 48865: 🔯 *शब्दकोडे*
🔯उत्तराच्या शब्दाची सुरुवात  *गा* या अक्षराने असावी.

🔯दूध देणारा प्राणी -  *गाय*
🔯ओझी वाहणारा प्राणी -  *गाढव*
🔯गाणे गाणारी स्त्री -  *गायिका*
🔯गाणे गाणारे पुरुष -  *गायक*
🔯एक गोड कंद -  *गाजर*
🔯सापाचा खेळ करणारा- *गारुडी*
🔯एक प्रकारचा दगड -  *गारगोटी*
🔯थंड -  *गार*
🔯एक अवयव -  *गाल*
🔯ग्राम -  *गाव*
🔯लतादीदींना मिळालेली पदवी -  *गानकोकिळा*
🔯एक आडनाव -  *गायकवाड*
🔯एक आजार -  *गालगुंड*
🔯गीत -  *गाणे*
🔯चिखल , आकाशातून पडणारे बर्फाचे लहान खडे-  *गारा*
🔯अदृष्य -  *गायब*
🔯एका मोठ्या कपड्यात इतर कपडे बांधलेले -  *गाठोडे*
🔯नदीमधील ओली, मऊ माती -  *गाळ*
🔯चाळणी, गाळण्यासाठी उपयोगी -  *गाळणी*
🔯गावातील गुंडगिरी करणारा - *गावगुंड*
🔯मुलीचे नाव  - *गायत्री*

🔯  *संकल्पना व निर्मिती - नंदा परदेशी धुळे*
[20/07, 2:43 PM] +91 86056 48865: 💗  *शब्दकोडे*
💗उत्तराच्या शब्दाची सुरुवात  *चौ* या अक्षराने करावी.

💗थोडा उंच पाट - 
💗एक आडनाव -
💗चारही बाजू समान असणारी भौमितिक आकृती -
💗दाराला ही असते -
💗चार रस्ते ज्या ठिकाणी एकत्र येतात ते स्थान - 
💗एखाद्या संख्येला चारने गुणणे -
💗चार भाग असणारा रस्ता -
💗विचारपूस -
💗चार कोन व चार बाजू असणारी भौमितिक
 आकृती  -
💗चार रंगांनी युक्त -
💗दुस-याची वस्तू न विचारता घेणे -
💗साठ या संख्येत चार अंक मिळविल्यास ही संख्या येते -
💗क्रिकेटमध्ये एकाच वेळी मिळणा-या चार धावा -
💗वीस या संख्येतून सहा कमी केल्यावर मिळणारी संख्या -
💗गावाचे नाव -
💗प्रमाणशीर , नियमबद्ध - 
💗घोडा असा उधळतो - 
💗एक वाद्य - 

💗 *संकल्पना व निर्मिती - नंदा परदेशी धुळे*
[20/07, 2:43 PM] +91 86056 48865: 💗  *शब्दकोडे*
💗उत्तराच्या शब्दाची सुरुवात  *चौ* या अक्षराने करावी.

💗थोडा उंच पाट -  *चौरंग*
💗एक आडनाव - *चौधरी, चौबे, चौरे*
💗चारही बाजू समान असणारी भौमितिक आकृती - *चौरस*
💗दाराला ही असते - *चौकट*
💗चार रस्ते ज्या ठिकाणी एकत्र येतात ते स्थान - *चौक*
💗एखाद्या संख्येला चारने गुणणे - *चौपट*
💗चार भाग असणारा रस्ता - *चौपदरी*
💗विचारपूस - *चौकशी*
💗चार कोन व चार बाजू असणारी भौमितिक
 आकृती  - *चौकोन*
💗चार रंगांनी युक्त - *चौरंगी*
💗दुस-याची वस्तू न विचारता घेणे - *चौर्यकर्म*
💗साठ या संख्येत चार अंक मिळविल्यास ही संख्या येते - *चौसष्ट*
💗क्रिकेटमध्ये एकाच वेळी मिळणा-या चार धावा - *चौकार*
💗वीस या संख्येतून सहा कमी केल्यावर मिळणारी संख्या - *चौदा*
💗गावाचे नाव - *चौगाव*
💗प्रमाणशीर , नियमबद्ध -  *चौकटबद्ध*
💗घोडा असा उधळतो - *चौखूर*
💗एक वाद्य -  *चौघडा*

💗 *संकल्पना व निर्मिती - नंदा परदेशी धुळे*
[21/07, 10:56 AM] +91 86056 48865: 💙   *शब्दकोडे*
💚उत्तराच्या शब्दांची सुरुवात  *खो* या अक्षराने व्हावी.

💛असत्य -
💜नारळातील आतला गर - 
💗दुस-याच्या खोड्या काढणारा, व्रात्य  -
❤जमीन खणणे - 
💙झाडाचा एक अवयव - 
💚मनाला लागेल असे बोलणे - 
💛एक नैसर्गिक क्रिया, आवेग -
💜वस्तू ठेवण्यासाठी उपयोगी - 
💗एक मैदानी खेळ - 
❤विनाकारण भरणे, घेणे- 
💙मीठ या साधनाने गोळा करतात - 
💚उथळ या शब्दाला विरुद्ध अर्थांचा शब्द -
💜काम काही काळ थांबणे - 
💗नारळाचा कीस करणे - 
❤सुगरण पक्ष्याचे घरटे  -
💙गवताने शाकारलेली लहानशी झोपडी -

💚  *संकल्पना व निर्मिती - नंदा परदेशी  धुळे*
[21/07, 10:56 AM] +91 86056 48865: 💙   *शब्दकोडे*
💚उत्तराच्या शब्दांची सुरुवात  *खो* या अक्षराने व्हावी.

💛असत्य - *खोटे*
💜नारळातील आतला गर -  *खोबरे*
💗दुस-याच्या खोड्या काढणारा, व्रात्य  - *खोडकर*
❤जमीन खणणे -  *खोदकाम*
💙झाडाचा एक अवयव -  *खोड*
💚मनाला लागेल असे बोलणे -  *खोचक*
💛एक नैसर्गिक क्रिया, आवेग -  *खोकणे*
💜वस्तू ठेवण्यासाठी उपयोगी -  *खोके*
💗एक मैदानी खेळ -  *खोखो*
❤विनाकारण भरणे, घेणे-  *खोगीरभरती*
💙मीठ या साधनाने गोळा करतात -  *खोरे*
💚उथळ या शब्दाला विरुद्ध अर्थांचा शब्द -  *खोल*
💜काम काही काळ थांबणे -  *खोळंबा*
💗नारळाचा कीस करणे -  *खोवणे*
❤सुगरण पक्ष्याचे घरटे  -  *खोपा*
💙गवताने शाकारलेली लहानशी झोपडी -  *खोपट*

💚  *संकल्पना व निर्मिती - नंदा परदेशी  धुळे*