Pages

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

Sunday 8 September 2019

Motivational

*तिशीनंतरचे आर्थिक नियोजन – गुंतवणूक नियोजन*

गुंतवणूक नियोजन हा कोणत्याही आर्थिक नियोजनाचा पाया आहे. मागच्या लेखात आपण तिशीनंतरचे आर्थिक जीवन आणि नियोजन यासंबंधीचे काही मुद्दे पाहिले. या लेखात आपण आणखी काही मुद्द्यांचा व तिशीनंतर गुंतवणूक नियोजन कसे करायचे, याबद्दल माहिती घेऊ.

 *आपल्या वेळेची किंमत ओळखा.*

काहीही झालं तरी वेळ कुणासाठी थांबत नाही आणि एकदा गेलेली वेळ परत येत नाही. गुंतवणूक नियोजन करताना वेळेला अत्यंत महत्व असते.

आयुष्यात पैसा कितीही महत्वाचा असला तरी प्रत्येक वेळी तुम्ही आयुष्यातला भरमसाठ वेळ पैश्यासाठी खर्ची घातलाच पाहिजे असं नाही.

पैसा हे आयुष्यात सोयीसुविधा मिळविण्याचं माध्यम असलं तरी त्यापलीकडे पैशापेक्षा वेळ जास्त महत्वाची आहे.

गरजेपुरता पैसा मिळविण्यापुरतं काम झालं की उरलेला वेळ स्वतःच्या प्रगतीमध्ये म्हणजेच स्वतःसाठी वापरा.

 *योग्य गुंतवणूक पद्धतीनेच गुंतवणूक नियोजन यशस्वी करा*

आपल्यापैकी बरेच जण सामान्यत: लहान वयातच बचत करण्यास सुरवात करतात.
वाढत्या वयासोबत जे काही बाकी उरते त्यातून ते मोठे झाल्यावर गुंतवणूक सुरु करावी ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे, आयुष्यात बऱ्याच उशिरा गुंतवणूक करण्यास सुरुवात करणे ही काही गुंतवणूक करण्याची योग्य पध्दत असू शकत नाही.

यशस्वी गुंतवणूकीचे गमक म्हणजे आपल्या विशीच्या सुरूवातीसच गुंतवणुकीस प्रारंभ करणे.

आयुष्यात आपण जितक्या लवकर गुंतवणुकीस सुरुवात करू तितका जास्त वेळ आपल्याला आपल्या स्वप्नातली संपत्ती निर्माण करण्यासाठी मिळेल.

 *स्वत:चा आणि आपल्या प्रियजनांचा विमा उतरवून घ्या*

अापल्या आजूबाजूच्या लोकांकडून किंवा कधीकधी आपल्या स्वतःच्या अनुभवांवरून आपल्या लक्षात आलेच असेल की वैद्यकीय सोयीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत आणि भविष्यातही त्या उत्तरोत्तर वाढतच जाणार आहेत.

साहजिकच अनपेक्षितपणे उद्भवणाऱ्या लहानमोठ्या आजारांसाठी आणि त्यातून उद्भवणाऱ्या महाकाय खरचला सामोरे जाण्यासाठी आपल्या आणि आपल्या प्रियजनांच्या आरोग्य विम्याचे महत्व अधोरेखित होते.

 *आरोग्य विम्यामुळे गुंतवणूक नियोजन यशस्वी होण्यास मदत होते.*

 _दीर्घकालीन गुंतवणूकीचा विचार करा_

गुंतवणूक नियोजन करताना दीर्घकालीन गुंतवणूक नियोजन अवश्य करा.

बचतीच्या सोबतच गुंतवणुकीतूनही, त्यातही दीर्घकालीन गुंतवणुकीतून आपल्याला आपल्या अनेक उद्दिष्टांची पूर्ती करता येते. मग ते मनासारखे छंद जोपासणे असो, एकाद्या आवडत्या ठिकाणाला भेट देणे असो, किंवा काही नवीन उपक्रम सुरु करणे असो.

अशाप्रकारच्या क्रियाकल्पांना बऱ्याचदा एकरकमी पैशांची गरज पडते आणि अशावेळी केलेली गुंतवणूक कमी येते.
गुंतवणुकीचा उद्देश ठराविक काळासाठी ठेवलेल्या पैशांवर चांगला परतावा मिळविणे हा असतो. त्यामुळे बचत ही जरी अडी-अडचणीसाठी बाजूला काढून ठेवलेली रक्कम असली तरी गुंतवणूक ही वाढती रक्कम असते आणि ठराविक काळाच्या नियोजनातून त्यातून अपेक्षित अर्थप्राप्ती होऊ शकते.


नुकतेच लग्न झाले असेल आणि लहान मुले असतील किंवा येण्याच्या मार्गावर असतील, तर त्यांच्या भावी आयुष्यातील खर्चाचे नियोजन करण्याचा हाच योग्य काळ आहे.
त्यांच्या रोजच्या खर्चापासून ते त्यांच्या आजारपण आणि शिक्षणाच्या खर्चासाठी लागणारी रक्कम त्यासंबंधीच्या आर्थिक नियोजनातून अतिशय शिस्तबद्धरित्या उभी करता येऊ शकते.
 *आपल्या गुंतवणूकींमध्ये विविधता आणा*

इंग्रजीमध्ये एक म्हण आहे: “डोन्ट पुट ऑल युवर एग्ज इन वन बास्केट”. तेच सूत्र गुंतवणुकीच्या बाबतीतही लागू होते.
गुंतवणुकीच्या बाबतीत आणि त्यातून मिळणाऱ्या परताव्याच्या बाबतीत केवळ एकाच उत्पनाच्या स्रोतांवर अवलंबून राहणे बऱ्याचदा अनावश्यक आर्थिक धोक्याला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे आर्थिक क्षेत्रातले जाणकार बऱ्याचदा गुंतवणुकीमध्ये विविधता ठेवण्याचा सल्ला देतात.

उत्पन्नाच्या परताव्यामध्ये जरी विविधता आली तरी दुर्दैवाने एकाद्या उत्पन्न स्त्रोतामध्ये काही चढ उत्तर झाले तरी त्याचा परिणाम इतर ठिकाणच्या गुंतवणुकीमधून आणि त्यातून मिळणाऱ्या परताव्याच्या माध्यमातून भरून काढला जाऊ शकतो.


तिशीत प्रवेश करताना, साठीचा आणि त्यानंतरच्या जीवनाचा विचार करणेही क्रमप्राप्त आहे.
बरेचसे लोक तिशीत प्रवेश करताना त्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनाचे नियोजन सुरु करतात.
तुमच्या आर्थिक गरजा कशा आहेत, तुमचा जीवनमानाचा स्टार कसा आहे याच्या अनुरूप तुम्हाला निवृत्तीनंतर मासिक किती रक्कम लागेल आणि त्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल याचा विचार करून *आर्थिक तसेच गुंतवणूक नियोजन करा.*
*यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि माहिती भरा.*


तिशीमध्ये आयुष्यात अनेक आघाड्यांवर जरी धावपळ सुरु असली तरी त्याचबरोबर स्वतःच्या शरीराची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे हे स्वतःला पटवून द्या.

गेलेला पैसे पुन्हा उभा करता येतो पण शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जर राखता आले नाही, तर त्याचे केवळ आपल्या स्वतःवरच नाही, तर आपल्या कुटुंबातील सदस्यांवरही अनेक दूरगामी परिणाम होऊ शकतात.
या संकटातून पूर्ववत होण्यासाठी पुन्हा आर्थिक ताण पडून उपचार घ्यावे लागतात तो भाग वेगळाच.
त्यामुळे सतत उद्यमी राहणे जरी आवश्यक असले तरी आपले आणि आपल्या जवळच्या लोकांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपणे हि देखील आपली जबाबदारी आहे याचे भान असू द्या.


*मनव्यवस्थापन!*
  ☺

आहे त्याचा स्वीकार केल्यास नव्यान्नव टक्के चिंता पळुन जातात.
*वेदनांना विचारांपासुन तोडलं की चिंता पळुन जाते!*

*1) भुतकाळात घुटमळणे बंद करा –*

बसल्या बसल्या ना, आपल्या डोक्यात उगाच चक्र सुरु असते,
- “दहा वर्षांपुर्वी मी चांगला अभ्यास केला असता, तर आज मी ही खुप मोठ्ठा ऑफीसर राहीलो असतो.”
- “सात वर्षांपुर्वी मी प्लॉट घ्यायला हवा होता, तेव्हा मी सुवर्णसंधी सोडली.”
- “त्यावेळी मी त्यांच्याशी असे वागायला नको होते! खुप वाईट आहे मी!”
- “मी खुप कमी पगारावर काम करायला तयार झालो, मी असे नव्हते करायला पाहीजे.”
 व्हायच्या त्या घटना घडुन गेल्या,
टाईममशीनमध्ये जाऊन ते काही बदलता येणार नाही, तेव्हा आता त्यावर विचार करुन फक्त आणि फक्त, आपली बहुमुल्य उर्जा, फालतुमध्ये खर्च होणार, त्यापेक्षा
*भुतकाळातल्या, ह्या सर्व चांगल्या वाईट घटना, विसरुन गेलेलं, बरं!

*2)इथे प्रत्येक जण अद्वितीय आहे! –*

बहुतांश दुःखांच मुळ हे तुलनेत असतं,

*ह्या जगात प्रत्येक गोष्ट एकमेवअद्वितीय आहे,*
गुलाब दिसायला सुंदर असतो, पण म्हणुन मोगर्‍याचं महत्व कमी होत नाही, त्याचा सुगंध ही त्याची ओळख! त्या दोघात डावं-उजवं अशी तुलना करता होईल का? प्रत्येक फुल अद्वितीय आहे.
आता यात डावं उजवं करुन, कशाला दुःखी व्हायचं! प्रत्येकाचा चेहरा एक दुसर्‍यापासुन वेगळा आहे, म्हणुन ह्या जगातली प्रत्येक व्यक्ती एकमेव अद्वितीय आहे, तुम्हीपण!..

*3) ‘आयुष्य कशासाठी’ याचं उत्तर शोधा. –*

आयुष्य भगवंताने आपल्याला दिलेली अनमोल भेट आहे,
आयुष्य सतत आनंदी राहण्यासाठी आहे, आयुष्य उत्साहाने भरभरुन जगण्यासाठी आहे, आयुष्य भव्यदिव्य स्वप्नं बघण्यासाठी आणि ती स्वप्ने मनमुरादपणे जगण्यासाठी आहे,
*आयुष्य आपल्या आणि इतरांच्या चेहर्‍यावर हसु फुलवण्यासाठी आहे!*

जीवनाचा प्रत्येक क्षण निष्पापपणे बागडण्यासाठी आहे, मनातले सर्व अपराधी भाव, भुतकाळ-भविष्यकाळ, काल्पनिक जबाबदार्‍यांचे ओझे, सगळे सगळे फेकुन द्या, मोकळे आणि रिते व्हा, प्रत्येक क्षणाला, निरापराध वृत्तीने, निरागसपणे सामोरे जा!

माणसाला तीन गोष्टी जास्त त्रास देतात, प्रत्येक दुःखाच्या मुळाशी ह्या तीन गोष्टी सापडतील,

 अ) अपेक्षा
 ब) अपुर्ण स्वप्ने,
 क) ध्येयप्राप्ती नंतर येणारा रिक्तपणा!

*बहूदा आपण भला ऊसकी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसी ! याच विचारात असतो.*
तो कसा सुखी आहे,
ती कशी मस्त जगते,
त्याच आयुष्य आरामशीर आहे,  माझ्याकडे हे का नाही, या अपेक्षेने, तुलनेने दु:ख्खी होत तर नाही ना !

बघा! किती गंमतीशीर आहे हे, समजा, एखाद्याचे लग्न होत नाही, तेव्हा तो किती परेशान असतो, उठता-बसताना, जेवताना, झोपताना एकच ध्यास असतो, लग्न-लग्न-लग्न! नकळत हाच विचार, चिंता बनुन, त्याच्या आत्म्याला डाचु लागतो, त्याच्या दुःखाचं कारण बनतं, मग हास्य गायब होतं, चित्त थार्‍यावर राहत नाही, चिडचिड वाढते. स्वप्नप्राप्तीकडे रोज वाटचाल करायची पण मनावर जखम न होवु देता!, ह्याला म्हणतात, सुखी जीवन!

आणि समजा, एके दिवशी लग्न झालेच, (प्रत्येकाचे होतच असते,) मग अचानक आयुष्यातले थ्रील खतम! पुन्हा सप्पक आयुष्य सुरु, जॉब लागु दे, जॉब लागु दे म्हणुन तळमळलो, आणि जॉब लागला, आता थोड्याच वर्षात त्या जॉबचा कंटाळा यायला लागतो, एक प्रकारचा रिक्तपणा येतो,

*आयुष्य कशासाठी? जीवनाचा निर्भेळ आनंद घेण्यासाठी, मनाच्या आकाशात हे उत्तर जेव्हा गवसेल, तेव्हा नैराश्य, उदासीनता जवळपास फटकणार पण नाहीत!*

*4) सेवा करणार्‍याला आत्मिक समाधान मिळते. -*

बघा! किती मजेशीर आहे हे,

- अगरबत्ती स्वतः हवेत विरुन जाते, पण वातावरणात एक प्रसन्न सुगंध पसरवते,
- दिव्याची वात स्वतः नष्ट होते, पण तेजाने घर उजळुन टाकते.
काहीतरी बनण्यासाठी, काहीतरी प्राप्त करण्यासाठी आपण सकाळ संध्याकाळ धावत असतो, पण खरे समाधान कुठे आहे?
आपल्यात असलेल्या गुणांचा, शक्तीचा वापर आजुबाजुच्यांना, नातेवाईकांना, मित्रांना, अगदी अनोळखी लोकांना सुखी, आनंदी बनवण्यासाठी करणार्‍यांचं जीवन खरं सार्थ झालं, असं म्हणता येईल.

ह्याच चार सुत्रांचा मिळुन बनतो,
*लॉ ऑफ अट्रेक्शन!*
मनाच्या तळाशी जाऊन सुखाचा शोध घेऊ पाहणारया,
सगळ्यांचे आयुष्य, सुखी, समाधानी आणि समृद्ध होवो,
 ह्या मनस्वी प्रार्थनेसह,

*धन्यवाद आणि शुभेच्छा!*
*तुमच आयुष्य शुभ जावो*
🙏💐🙏



😊 मूल्यशिक्षण: मूल्य- *श्रमप्रतिष्ठा.*

✅ *करत राहा--होत जाईल.*

बर्याच वेळा कष्ट करूनही फळ मिळत नाही, अशी अनेकांची तक्रार असते. अभ्यास करतोय परंतु लक्षात राहत नाही, जास्त गुण पडत नाहीत अशी तक्रार आपण नेहमी आजूबाजूच्या परिसरात ऐकत असतो.
यावर उपाय एकच *'करत राहा—होत जाईल'.* *जी गोष्ट आपणाला मिळवायची आहे ती प्राप्त करण्यासाठी जिद्द, चिकाटी, सातत्य, संयम आणि आत्मविश्वासाची जोड प्रयत्नांना हवी.* एका घागरीने रांजन भरला जात नाही. सतत प्रयत्न करीत राहिल्याने *यश* नक्कीच मिळेल.

    *केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे.* तसेच जगज्जेत्या नेपोलियनच्या मते, जगामध्ये *impossible* असे काहीच नाही. हा शब्दच, हा महामंञ आपल्याला सांगत आहे. माञ गरज आहे ती *सकारात्मक* विचारसरणी करूण, *नियोजनबध्द कष्ट* करण्याची. Impossible या शब्दाची फोड करूण *I m possible* असे लिहून वाचले तर याचा अर्थ आपल्या लक्षात नक्कीच येईल.

       *Yes, I can/We can!* होय, *मी सुध्दा/आपण सुध्दा* *श्रमप्रतिष्ठेच्या*  जोरावर एक *यशस्वी* व्यक्ती होऊ शकतो.

चला तर मग (०१) कोणतेही *चांगले काम* करताना ते *प्रेमाने, कलेचा वापर करून आनंदाने करूया*.

(०२) *कार्यात सतत कार्यमग्न राहूया.*

(०३) *आळस* हा माणसाचा सर्वात मोठा *शञू* आहे हे लक्षात ठेवून कार्यात *सातत्य* ठेवूया.

(०४) *श्रमप्रतिष्ठेचे* महत्त्व स्वत: जाणून *कुटुंबातील व समाजातील* *इतर व्यक्तींना* समजावून सांगूया.

(०५) *इतरांना कामात मदत करूया.*

(०६) *स्वत:ची कामे दुसर्यांवर न लादता स्व:त करूया.*

(०७) *श्रम करणे हे कनिष्ठ, कमीपणाचे काम नाही तसेच कोणतेही सत्काम आनंदाने केल्यास हीन नसते ही बाब विचारात घेऊया.*

(०८) *श्रमिकांना निकृष्ठ न मानता त्यांचा आदर करूया,* त्यांना *प्रतिष्ठा* देऊया.

(०९) *बौद्धिक कष्टाइतकेच महत्त्व शारीरिक कष्टालाही देऊया* व तसेच *श्रमाचा व श्रम करणार्या व्यक्तींना महत्त्वपूर्ण व्यक्ती समजून/ माणून अशा व्यक्तिमत्त्वांचा आदर करूया. त्यांना सन्मान देऊया.*

(१०) *समाज हिताची* कामे करूया. जसे- *वृक्षारोपण करूण संगोपण करणे, थुंकून, केरकचरा टाकून विकृती दाखविण्यापेक्षा स्वच्छता ठेवून संस्कृती दाखविणे या उक्तीप्रमाणे सार्वजनीक ठिकाणी स्वच्छता ठेवणे, सार्वजनीक मालमत्तेचे रक्षण करणे आदि.*

सौजन्याने: *मूल्यसंस्कार* या पुस्तकातून.



🌹।। *मनापासून शांतपणे वाचा* ।। 🌹
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
१ )■ जिथं आपली कदर नाही, तिथं कधीही जायचं नाही. ज्यांना खर सांगितल्यावर राग येतो, त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. जे नजरेतून उतरलेत त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही.
_______________________________
२ )■ आपल्या हातून एखाद्याचे काम होत असेल तर ते निःस्वार्थ बुद्धीने आणि निःसंकोचपणे करा. नेहमी दुसऱ्याला मदत करा दुसऱ्याला त्रास होईल असे कदापि वागू नका.
_______________________________
३ )■ नेहमी स्वतःसोबत पैज लावा, जिंकलात तर *आत्मविश्वास* जिंकेल, आणि हारलात तर *अहंकार* हारेल.
_______________________________
४ )■ पाण्याने भरलेल्या तलावात *मासे* किड्यांना खातात, आणि जर तोच तलाव कोरडा पडला तर *किडे* माश्याना खातात. *संधी* सगळ्यांना मिळते. फक्त आपली *वेळ* येण्याची वाट पाहा_____!
_______________________________
५ )■ एखाद्या व्यक्तीजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर, त्याच्या ओठांवर थोडसं *हसू* आणि डोळ्यात थोडसं *पाणी* नक्कीच आलं पाहिजे____ !
_______________________________
६ )■ तुम्ही स्वतःच्या खांद्यावर डोके टेकून *रडू* शकत नाही आणि स्वतःच स्वतःला आनंदाने *मिठी* ही मारू शकत नाही______ !
*आयुष्य* म्हणजे दुसऱ्यांसाठी जगायची बाब आहे_______ !
_______________________________
७ )■ जगातील सर्वात सुंदर रोपटे *विश्वासाचे* असते आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या *मनात* रुजवावे लागते______ !
_______________________________
८ )■ वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते. प्रश्न असतो की, आपण त्यांच्याशी कशी *झुंज* देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.________ !
_______________________________
९ )■ जगातील कुठलीच गोष्ट *परिपूर्ण* नाही. परमेश्वराने *सोन* निर्माण केलं. चाफ्याची *फुल* सुद्धा त्यानीच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफयाचा *सुगंध*  नसता का देता आला ? अपूर्णतेतही काही मजा आहेच की._______ !
_______________________________
१०)■ दगडात मूर्ती असतेच. त्याचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. आणि मग ह्याच भावनेने माणसाकडे पहा. माणसातही नको असलेला भाग दूर करायला शिका.________!
_______________________________
११ )■ जेव्हा अडचणीत असाल तेव्हा *प्रामाणिक* रहा. जेंव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेंव्हा *साधे* रहा. जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा *विनयशील* रहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा *शांत* रहा.________ !
_______________________________
१२ )■ आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं, कारण अशा स्थळावरून परतताना माणूस *माणूस* राहत नाही. परतून येत ते *चैतन्य*__________!
_______________________________
१३ )■ *सोन्याची* एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीच *सोन* करा. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काहीजण त्यातून *मोती* काढतात, तर काहीजण त्यातून *मासे* काढतात तर काहीजण फक्त *पाय* ओले करतात. हे *विश्व* पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे *महत्त्वाचे* आहे._______!
_______________________________
१४ )■ तुम्ही कोणासाठी कितीही केले, तरी ते कोठेतरी कमीच पडते. कारण *सत्य* चप्पल घालून तयार होईपर्यत, *खोट* गावभर हिंडून आलेलं असत._________!
_______________________________
१५ )■ प्रेमळ माणस तुम्हाला कधी *वेदना* देतीलही, पण त्यांचा उद्देश फक्त आणि फक्त तुमची *काळजी* घेणं हाच असतो.
_______________________________
१६ )■ जगातील कटू सत्य हेच आहे की, *नाती* जपणारा नेहमी सर्वांपासून दुरावला जातो.________!
_______________________________
१७ )■ नेहमी लक्षात ठेवा की, " आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा *बडेजाव* करू नका. भरकटलेल्या जहाजात कितीही *पैसा* असला तरी पिण्याचे *पाणी* मिळत नाही. जमिनीशी जोडलेले राहा.____________!
_________________________
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🌸🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌸
•••••••••••••••••••••••••••••••••••••••.________!
______________________________

@@@@##################@@@@@@@
*🤔विचारांची पातळी वाढवा; कारण त्यावरच अवलंबून असतो तुमचा आत्मविश्वास*

🤵तुम्ही कसे दिसता, तुमचा पेहराव किंवा कुढल्या ब्रँडचे शूज घालता यापेक्षाही जास्त महत्त्वाचं म्हणजे तुम्ही विचार कसा करता यावरून तुमचा आत्मविश्वास अलंबून असोत. त्यामुळे जेव्हा तुमच्या वागण्या बोलण्यातून तुमचे विचार प्रकट होतात, तेव्हा लोकं तुमची पारख करतात..

▪जन्माला आलेली प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळेपण असतं. त्यामुळेच या जगातली प्रत्येक व्यक्ती ही महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण असते. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत प्रत्येकजण आपापल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर एका विशिष्ठ पातळी गाठण्याचा प्रतयत्न करत असतो. बुद्धीमत्ता आणि कष्टाळू वृत्ती या दोन बलस्थानांमुळे तुम्ही यशाची एक एक पायरी वर चढत जाता.

▪जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करते. प्रत्येकात निसर्गतः काहीतरी वेगळेपण असल्यामुळे सुंदरतेला वाव आहे. रंग, उंची ही सगळी परिमाणं मानवनिर्मित असतात. त्यामुळे दिसण्यापेक्षा तुमच्या असण जास्त महत्त्वाचं ठरतं.

▪तुमचं वागणं, बोलणं, भाषा, तुमची देहबोली आणि चेहऱ्यावरलं स्मितहास्य या सगळ्या गोष्टी तुमचा आत्मविश्वास वाढवण्यास कारणीभू ठरतात. यामुळे तुम्ही जसे आहात तसा स्वतःचा स्वीकार करा.

▪आत्मविश्वास, संभाषण कौशल्य, निर्णय क्षमता, कुठल्याही प्रसंगात शांत राहून मार्ग काढण्याची क्षमता या गोष्टी विकासीत करता येतात यावर तुम्ही विश्वास ठेवा. आणि हा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला विचारांची प्रगल्भता वाढवाली लागेल.




Success मंत्रा

👉 _*सक्सेस मंत्रा*_
यशाचे गमक काय?  सक्सेस मंत्रा काय आहे? आज त्याबद्दल जाणून घेऊयात...

1) _*स्वप्ने पहा*_ : पैशामागे धावायला नकोच. पण स्वप्ने पाहून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर त्याद्वारे पैसा कमावणे वाईट नाही. जीवनात ध्येय गाठणे फार गरजेचे आहे. केवळ स्वप्ने पाहून काही होत नाही, ती पूर्ण करण्यासाठी धोरण आखायला हवे. मग मार्ग आपोआप सापडतो.

2) _*कामामुळे मोठे व्हाल*_ : जेव्हा तुमचे काम बोलते तेव्हा इतर गोष्टी आपोआप शांत होतात आणि तुम्ही हिरो बनून समोर येता. बाजारात कंपनीची पत असेल तर कोणाच्या मदतीची गरज नसते.


3) _*कामाची भूक ठेवा*_ : शर्यत लावताना अर्ध्या रस्त्यात थांबणार्‍यांना यश मिळत नाही. आपण नेहमी ऊर्जा कायम ठेवायला हवी. कोणीही स्पर्धा अर्ध्यातून सोडता कामा नये. वेळ कोणाचीच वाट पाहत नाही. पण वेळ मिळाला आणि सर्वकाही ठिक असेल तर थोडं रिलॅक्स व्हायला काही हरकत नाही.

4) _*पैसा सर्वकाही नाही*_ : पैसा सर्वकाही नसतो, पण तो गरजेचा नक्की असतो. त्यामागे पळता कामा नये. वडिलांची ही गोष्ट मुकेश अंबानी यांनी कायम स्मरणात ठेवली.

5) _*मनाचे ऐका*_ : कोणताही निर्णय घेताना मन म्हणेल तो निर्णय घ्या, असे अंबानी सांगतात.

6) _*नेहमी सतर्क रहा*_ : जर तुम्ही परिस्थिती जाणून घेत आहात तर त्याचा फायदा तुम्हालाच होईल. ग्राहक नेहमी दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये अव्वल असणार्‍यांबरोबर डिल करतात. जर तुम्ही मार्केटमध्ये असलेल्या उत्पादनासारखेच दुसरे उत्पादन तयार करत असाल तर त्यात काहीतरी नवीन असणे गरजेचे आहे.

7) _*विश्‍वसनीयता गरजेची*_ : तुमची टिम आणि स्पर्धेत टिकण्यासाठी मार्केटची जाण असणे, त्यानुसार बदलणे आणि भविष्याची दृष्टी गरजेची असते. तुम्ही शांतपणे खुर्चीवर बसून रहाल तर सर्वात मोठे लूझर बनाल. कॅश इनफ्लो आणि आऊटफ्लो करण्यात विश्‍वसनीयता अत्यंत गरजेची असते.

8) _*टीमला प्रोत्साहन*_ : प्रगतीची पहिली पायरी म्हणजे शिकणे. काहीही शिकण्यासाठी तयार असावे. शिकायला फार उशीर झाला असा विचार करू नका. प्रत्येक क्षण कंपनीच्या फायद्यासाठी खर्च करा. आपल्या कर्मचार्‍यावर विश्‍वास ठेवा. आपल्या टिमवर विश्‍वास ठेवा आणि त्यांना प्रोत्साहन देत रहा.

9) _*अवलंबून राहू नका*_ : कंपनीच्या प्रमुख अधिकार्‍यांवर पूर्ण विश्‍वास असला तरी, ऐनवेळी अडचण नको म्हणून स्वतःला नेहमी तयार ठेवा. आपल्या व्यवसायाच्या सुरूवातीला सर्वकाही स्वतः शिकणे गरजेचे आहे, असे ते म्हणतात.

10) _*धोके पत्करून शिका*_ : प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून शिकत जे पुढे जातात ते ध्येय नक्की गाठतात. धोका घेऊन अपयश येणे शांत बसण्यापेक्षा चांगले.

🧐 *आत्मविश्वास वाढवायचाय? या टिप्स नक्की वापरा!*


'आत्मविश्वास' या शब्दातच यशाचे गमक दडलेले असते. जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट तुम्ही सहज मिळवू शकता. काही खास टिप्सचा वापर करून तुम्ही तुमचा आत्मविश्वास नक्की वाढवू शकता... 

1) *टेन्शन नही लेने का* : सतत हसत रहा. तुम्हाला कितीही टेन्शन असलं तरी ते चेहऱ्यावर दिसू देऊ नका. लोकांशी प्रेमाने बोला व वागा. अपयश आलं तरी त्याचा त्रास करून घेऊ नका. कारण टेन्शन घेतलं कि, आत्मविश्वास कमी होत असतो.

2) *पेहरावाकडे लक्ष द्या* : तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करता. त्याचा तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम होत असतो. चांगले दिसण्याने तुम्ही लोकांना आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकता. कारण चार-चौघात आपण कसे दिसतो? अशा शंकांमुळे न्यूनगंड निर्माण होत असतो. म्हणून पेहरावाकडे लक्ष द्या.

3) *यशस्वी लोकांकडे लक्ष द्या* : तुमच्या आसपास अशी काही लोक असतात. ज्यांना पाहून तुम्हाला वाटते ती व्यक्ती आत्मविश्वासाने पूर्ण आहे. अशा लोकांकडे लक्ष्य द्या आणि ती करत असलेल्या गोष्टी तुमच्या दैनंदिन आयुष्यात फॉलो करा. 

4) *प्रयत्न करा* : एखादी गोष्ट जमत नसेल तर तिला सोडून देऊ नका. ती पूर्ण करण्यासाठी निदान प्रयत्न तरी करा. कारण प्रयत्न केल्यावरही अपयश आलं तरी त्यातून मिळालेला अनुभव तुम्हाला खूप शिकवून जातो. म्हणून प्रयत्न करणं कधीही सोडू नका.

5) *तुलना नको* : स्वतःची दुसऱ्या व्यक्तीबरोबर कधीच तुलना करूच नका. कारण समोरचा कसा आहे? हे फक्त समोरून दिसत असते. त्याच्याबाबत पूर्ण सत्य आपल्याला माहिती नसते. म्हणून त्याच्याशी तुलना करू नका.

6) *मान्य करा* : बदल करण्यासाठी व आत्मविश्वास वाढण्यासाठी कोणतीही गोष्ट मान्य करायला पाहिजे. जसे कि, एखादी गोष्ट तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ती मान्य करा उगाच मिरवत बसू नका. 

7) *बिनधास्त बोला* : तुम्ही जर दबलेल्या आवाजात बोलत असाल. तर ते आजच बंद करा. कारण यामुळे आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो. म्हणून बिनधास्त बोला.

8) *स्वत:ची स्तुती करा* : दररोज सकाळी आरशासमोर उभे राहून तुमच्यात असलेले सर्व चांगले गुण आठवा व स्वतःची स्तुती करा. यामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.



🧐 *पालकांनो, मुलांशी संवाद साधायचं विसरू नका!*

*Letsup I Parenting*

हल्ली पालकांची मुलांविषयीची अति काळजी, अपेक्षा आणि स्पर्धेच्या नादात संवाद साधण्याऐवजी वादच जास्त घातला जातो. बऱ्याचदा मुलांना समजून घेण्याऐवजी त्यांच्यावर निर्णय थोपवले जातात. त्यातून अपेक्षित रिझल्ट नाही मिळाला कि मग आरडा-ओरड सुरु होते. जे चुकीचे आहे. असे होऊ नये म्हणून काय करता येतील? याचा विचार करू... 

1) मुलांना लक्षात न घेता किंबहुना पुरेसा संवाद न साधता त्यांच्यावर एखादा निर्णय थोपवणे कितपत योग्य आहे, याचा तुम्हीच विचार करा. कारण हा निर्णय तुमचा होता, पाल्याचा नाही.

2) निर्णय थोपवून तुम्ही चूक केलीत. मग त्याच्यावर आगपाखड का? या सर्व समस्येवर उपाय म्हणजे मुलांशी संवाद साधा. निखळ, पारदर्शी आणि विश्वासपूर्ण मैत्रीचे नाते निर्माण करा, सुसंवाद वाढवा.

3) मुलांना समजून घेण्यासाठी त्यांना वेळ देणे, प्रसंगी त्यांच्या विश्वात आपणही रममाण होणे आवश्यक आहे.

4) केवळ चुका दाखविणे, उपदेश करणे, स्वतःच्याच मतांचा आग्रह धरणे, असे न करता थोड्या वेगळ्या स्वरूपात (उदा."हेच काम किंवा अभ्यास तू जर थोड्या वेगळ्या सोप्या पद्धतीने केलास तर तू ते अधिक चांगले करशील, असा मला विश्वास आहे) सांगायला हवे.

5) प्रत्येक काम अधिकाधिक नेटके व यशस्वी करण्याची मुलांना सवय लावायला हवी. यातून अभ्यासूवृत्ती जोपासली जाते व पुढील आयुष्याच्या वाटचालीत कुठल्याही प्रसंगात आत्मविश्वास वाढवणारी ठरते.

6) मुलांची इतरांसोबत तुलना करत बसू नका. अशाने मुलं स्वतःला कमी समजू लागतात. तर कधी-कधी चिडखोर बनतात. हे लक्षात घ्या.

7) दिलेली वेळ व दिलेले काम यासाठी अधिक काटेकोर राहणे, स्वच्छता, वैयक्तिक कामांची जबाबदारी आदी गोष्टी लक्षात ठेवल्या तर साहजिकच असे योग्य संदेश घरातूनच मिळाल्याने मुले सक्षम होत जातात.

8) आपल्या आनंदात तसेच अडचणींमध्ये, यश-अपयश, संकटातही आपले पालक, कुटुंब सदैव आपल्याबरोबर आहे, ही आधाराची-स्थैर्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण करा.

*🌹आनंदी जीवनाची सोपी सूत्रं!🌹*
*************************
*🌷उद्योग रत्न मा.रतनजी टाटांनी लंडन मध्ये दिलेल्या व्याख्यानातील सुंदर ओळी!🌷*
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻 🌺🌻🌺🌻🌺🌻
✍🏻1. श्रीमंत होण्यासाठी तुमच्या मुलांना शिकवू नका तर त्यांना आनंदी राहण्यासाठी शिकवा ज्यामुळे मोठ झाल्यावर त्यांना वस्तूंचं महत्त्व आणि मूल्य कळेल किंमत नाही.
2. 🌷तुमचं जेवण तुम्ही तुमचं औषध समजून घ्या नाहीतर औषधच तुम्हाला जेवण म्हणून घ्यावं लागेल.
3. 🌷जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते ती तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही कारण तुम्हाला सोडून जाण्याची शंभर जरी कारणं असली तरीही त्या व्यक्तीला एकच कारण असं सापडेल की ज्यामुळे ती व्यक्ती तुम्हाला सोडून जाणार नाही.
4. 🌷मानव असणं आणि मानवता असणं या मध्ये खूप फरक आहे.
5. 🌷ज्या वेळी तुमचा जन्म होतो त्यावेळी तुमच्या वर प्रेम केलं जातं आणि ज्यावेळी तुम्ही मृत व्हाल त्या वेळी ही तुमच्या वर प्रेम केलं जाईल. मधील काळात तुम्हाला असच चालवून घ्यावं लागेल.
6. 🌷तुम्हाला वेगात चालायच असेल तर एकटं चाला पण दूरवर चालत जावे लागणार असेल तर एकत्र चाला.
7. 🌷जगातील सर्वात चांगले सहा डॉक्टर १) सूर्यप्रकाश २) विश्रांती ३) व्यायाम ४) योग्य आहार ५) आत्मविश्वास ६) मित्र.......
     आयुष्याच्या सगळ्या टप्प्यांवर यांना सांभाळा आणि आरोग्यदायी जीवन जगा.
8. 🌷जेव्हा तुम्ही चंद्र पाहता त्यावेळी तुम्ही देवाचं सौंदर्य पाहता, जेव्हा तुम्ही सूर्य पाहता त्या वेळी तुम्ही देवाचं सामर्थ्य पाहता,ज्यावेळी तुम्ही आरसा पाहता त्यावेळी तुम्ही परमेश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती पाहता.... म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा!
     आपण सगळे जण प्रवासी आहोत आणि परमेश्वर हा या प्रवासाचा प्रतिनिधी(एजंट) आहे त्यानं आपला सर्व मार्ग आणि आपला अंतिम मुक्काम आधिच ठरवलेला आहे म्हणूनच त्याच्यावर विश्वास ठेवा आणि हे जीवन ही एक सहल समजून आनंद घ्या!

🌹🌸🌹🌸🌹🌸



No comments:

Post a Comment