Pages

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

मी दत्ता नामदेव बांबळे माझ्या ब्लॉगवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

Monday 9 September 2019

डॉक्टर जगन्नाथ दीक्षित डाएट प्लॅन

*डॉ दीक्षित यांचा जीवन मंत्र काय सांगतो. काही महत्त्वाचे पॉईंट असे*
👇🏽 
 *५५ मिनिटात जेवा*
 *४५ मिनिटे चला*
 *दिवसात २ वेळाच जेवा.*

 *डॉ दीक्षित यांचा जीवन मंत्र काय सांगतो.काही महत्त्वाचे पॉईंट असे*
👇🏽
*1⃣ स्वतःचा मधुमेह किंवा स्वतःचे वजन कमी किंवा कंट्रोल मध्ये ठेवायचे आहे हे फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकता दुसरे कोणी नाही हे आधी मान्य करा व पक्के करा जे काही करायचे आहे ते मनापासून करायचे आहे.*

*2⃣ मधुमेह कधीच बरा होऊ शकत नाही असे म्हणणे चुकीचे असून फक्त दोन वेळा दिवसातून जेवल्यास वजन तर कमी होतेच शिवाय मधुमेह पळ्वुन लावु शकतो.*

*3⃣ भूक लागेल तेव्हाच खायचे आणि तेही दिवसातून दोनवेळा.*

*4⃣ एक जेवण 55 मिनिटाच्या आत पूर्ण करायला हवे.*

*5⃣ दोन जेवणामध्ये किमान 8 तासाचे अंतर असायला हवे.*

*6⃣मधल्या आठ तासात काहीच खाऊ नये. डायबेटीक लोकांनी आधे मधे फक्त पाणी प्यावे.*

*7⃣नॉन डायबेटिक लोकांनी अधुनमधून ताक घेतले तरी चालेल. एखाद्या वेळेस कोरा साखर नसलेला चहा (ब्लॅक टी) किंवा ग्रीन टी चालेल.*

*8⃣हा काही डाएट प्लॅन नाही तर जीवनशैली आहे. जैन धर्मात ब्या आसन ही आदर्श जेवण पद्धती हेच सांगते.*

*9⃣ सतत थोडे थोडे खाण्यामुळे शरीरात सतत इन्सुलीन तयार होत राहते व इन्सुलीन वाढल्यामुळे शरीरात नैसर्गिकपणे तयार होणारे ग्लुकॅगॉन हे हार्मोन काम करीत नाही त्यामुळे चरबी जळत नाही ही चरबी तशीच साठून राहिल्यामुळे लठ्ठपणा निर्माण होतो. तेव्हा अधे मधे काही खाउ नका.*

*1⃣0⃣ घरी महिला जेवण करताना झालेल्या जेवणाची चव बघतात ते सुद्धा नको – चव पाहयाची असेल तर मग पुढील ५५ मिनिटात जेवण आटपा.*

*1⃣1⃣ अन्न कितीही खा, किती खावे, काय काय खावे यावर कोणतीच बंधने नाहीत. एका वेळी कितीही खावे व काहीही खावे पण ते 55 मिनिटाच्या आत संपवावे.*

*1⃣2⃣काही खा म्हटले असले तरी ज्यांना मधुमेह, बीपी, युरिक एसीड, पित्त अशा तक्रारी आहेत ते व त्या सिद्ध झाल्या आहेत तर अशा व्याधींना वर्ज्य असलेले अन्न व अन्न पदार्थ खाणे टाळा, कमी करा.*

*1⃣3⃣दोन वेळच्या जेवणामध्ये कटाक्षाने 8 तासाचा फरक असणे आवश्यक आहे.*

*1⃣4⃣नाष्टा किंवा जेवण एक काहीतरी ठरवा*

*1⃣5⃣सकाळी नाष्टा, दुपारी जेवण नंतर संध्याकाळी काही तरी चटपटीत, नंतर रात्रीचे जेवण अशी सवय आपण लावून घेतली आहे ही सवय आता सोडून द्या*

*1⃣6⃣भुकेच्या दोन वेळा ओळखा. त्याच वेळा कायम पाळा. १०-१५ मिनिटे ईकडे तिकडे ओके पण भुकेच्या वेळीच जेवा. वेळ गेली तर मात्र एसेडीटी सारखे त्रास होऊ शकतो.*

*1⃣7⃣ज्यांना सकाळी भूक लागते त्यांनी नाष्टाच्या जागी सकाळी जेवणच करावे व संध्याकाळी ७-८ च्या दरम्यान दुसरे भरपेट जेवण घ्यावे.*

*1⃣8⃣ज्यांना हे शक्य नसेल त्यांनी सकाळी उठल्यापासून दुपारपर्यंत फक्त पाणी प्यावे. दुपारी भरपेट जेवण घ्यावे व त्यानंतर आठ तास फक्त पाणी व रात्री ९-१० च्या दरम्यान दुसरे जेवण घ्यावे.*

*1⃣9⃣ही जीवनशैली फक्त ९० दिवस पाळा. फरक पडला तरच फॉलो करा.*

*2⃣0⃣बदलत्या जीवनशैली मुळे गेल्या काही वर्षात विविध आजारांनी लोकांना ग्रासले आहे. ही त्यांची स्थिती टप्प्या टप्प्यांनी बिघडत राहिली तशी टप्प्या टप्प्यानी चांगलीही करता येते व स्वतःच्या स्वतः तुम्हीच करू शकता – दुसरे कोणी नाही हे समजून घ्या.*

*2⃣1⃣फक्त ९० दिवस संयम राखा लागेल, फरक बघा, मगच ठरावा, या ९० दिवसात जर काही सकारात्मक बदल जाणवला तरच हा डाएट प्लॅन पुढे चालवा.*

*2⃣2⃣फक्त स्वत:चे ऐका स्वत:ला बरे वाटेल असेच करा*

*2⃣3⃣पोटाचा घेर कमी होईल ह्या जीवनशैलीचा सकारात्मक परिणाम सुरु झाला आहे लगेचच जाणवेल एकतर वजन कमी होईल व पोटाचा घेर कमी झाल्याचे जाणवेल.*

*2⃣4⃣दिवसातून 45 मिनिटे जलदगतीने चालले पाहिजे म्हणजे 4 ते 5 कि. मी. अंतर चालावे. पाच-सात योगासनं किंवा पाच ते पंचवीस सूर्यनमस्कार घाला.*

*2⃣5⃣ तीन वेळा जेवी तो रोगी हे ध्यानात घ्या.*

*2⃣6⃣ एकवेळा जेवतो तो योगी, दोनवेळा जेवतो तो भोगी तर तीनवेळा जेवतो तो रोगी असे संतांचे वचन असेल तर अन दिवसभर रवंथ करीत राहतो त्याला महारोगी म्हणावे लागेल.*

*2⃣7⃣ डाळ/मासे भरपूर खा, आहारात प्रथिन म्हणजे प्रोटिन्स जास्त प्रमाणात असायला हवे त्यामुळे भात आणि पोळी कमी करा, पण डाळ आणि मासे भरपूर खा, असा सल्ला त्यांनी दिला.*

*2⃣8⃣ प्रथिने हवी असतील तर मोड आलेली कडधान्य, डाळी, सोयाबीन, शेंगदाणे आदी खा.*

*2⃣9⃣ चिकन मटन खाऊ शकता पण त्यापासून काही व्याधी झाले असतील तर मात्र टाळा किंवा कमी खा.*

*3⃣0⃣ दारु पिणाऱ्या मंडळींनी पिणे ते जेवणे सर्व काही ५५ मिनिटात हे विसरू नये. दारू पाडून काही व्याधी असल्यास दारुस राम राम केलेला बरा.*

*3⃣1⃣ धुम्रपान (सिगारेट, तंबाखू) करणारा कधीच म्हातारा होत नाही तर तो त्या आधीच मरतो.*

*3⃣2⃣ कायम ऑफीस मध्ये बसून काम करणारे व एसी कारमधून फिरणार्यानी, एसी केबीन मध्ये बसून बौद्धीक काम करणाऱ्यांनी आपणास तहान लागली आहे की भूख हे ओळखावे. ९९% वेळा तहान असते पण भूख समजून काही खाल्ले जाते व तेही बाहेरील मागवून (वडा, भजी, डोसे आदी) व ईथे खरे प्रॉब्लेम सुरू होतात.*

*3⃣3⃣ फिरतीचे काम करणार्यानी २ वेळाच जेवायचे आहे, अधे मधे काही नाही, भुके वेळीच जेवयाचे आहे, जकंफूड खायचे नाही हे पक्के ठेवावे.*

*3⃣4⃣ नाही म्हणायला शिका : काही जणांना विविध ठिकानी भेटी द्यायची कामे असतात अशा वेळी खाण्या पिण्याचा आग्रह होतो अशा वेळी दीक्षित प्लॅन सुरू आहे सांगावे-आग्रह होत नाही.*

No comments:

Post a Comment